ताईबाई, ताईबाई ग,
आता होणार लगीन तुमचं !
नखरा बिखरा सारा विसरा
धम्मक लाडू चारील नवरा
नवरा म्हणजे बागुलबुवा
घेऊन जाईल त्याच्या गावा
तिथे सिनेमा नाटक कुठचं ?
धुणी धुवा मग झाडून काढा
रांधा, वाढा, उष्टी काढा
निवडा तांदूळ, लाटा पोळ्या,
शिवा टिपा मग सदरे, चोळ्या
करा शेवया, भरा ग लोणचं !
सासूबाई करतील वटवट
दीर, नणंदा देतील चापट
मामंजींना दमा खोकला
जा पिकदाणी त्यांची उचला
सुख सरलं हो बापाघरचं !
गीत - ग. दि. माडगूळ्कर