मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|संग्रह १|
सरळ नाक , गोरी पान , लाल ...

बालगीत - सरळ नाक , गोरी पान , लाल ...

आकाश अंगण होऊन येतं व ढगातले उंट, ससे, मोर यांचा खेळ रंगतो आणि या काव्यकथा मुलांना भावतात.


सरळ नाक, गोरी पान, लाल गाल, जिवणी छान

पिंगट केस, मऊ किती ! प्रोक्‍न राणी अशी होती -

मेजवान्या झडल्या, बँड आले, टेरियसचे लग्‍न प्रोक्‍नशी झाले

राणीला दुःख ठाऊक नव्हते, प्रोक्नचे सुख आभाळाहून मोठे -

एकदा काय झालं -

राणीच्या घरी पाहुणी आली, स्वागताची खूप धांदल झाली.

"फिलॉमेला आली ! फिलॉमेला आली !

राणीची धाकटी बहीण आली."

गाणी म्हटली, नृत्य झाले

फिलॉमेलाचे मन आनंदून गेले -

"ताई ग ताई !

निघू मी आता ? मन खूश झाले

आठ दिवस कसे भुर्रकन गेले !"

"अग पण थोडी थांबशील ना !

माझा महाल आवडला ना ?"

ताईचा आग्रह मोडायचा कसा !

फिलॉमेलाचा मुक्काम लांबला असा -

संध्याकाळी राजा महालात आला

फिलॉमेलाकडे बघतच राहिला.

"कोण बरं ही प्रोक्नहून छान ?

नितळ कांती, गोरी गोरी पान - "

"ही किनई फिलॉमेला !

थोडेसे हिला फिरवून आणाल ?

बागेत पुष्करणीवर नेऊन आणाल !"

फिलॉमेला निघाली नटून थटून

"खूप खूप फिरायचं बग्गीत बसून !"

"असं कर राणी -

तूही जरा फिरुन ये

सुंदर बनात जाऊन ये -"

राणीचा रथ वेगात निघाला

सारथ्याशी राजा काही बोलला -

फिरता फिरता रात्र झाली

राणीच्या महालाशी फिलॉमेला आली -

"प्रोक्‍न प्रोक्‍न !" उत्‍तर नाही

"कुठे आहे सांगा माझी ताई ?"

"तुला सांगू फिलॉमेला,

आत्‍ताच दूत येऊन गेला,

बातमी देऊन निघून गेला.

प्रोक्न राणी रथातून पडली

घोडयाच्या टापांखाली आली.

क्षणात तिचा जीव गेला

सारा प्रकार असा घडला - "

फिलॉमेला तेव्हा खूप रडली

सर्वांनी तिची समजूत घातली -

"जाते मी आता बाबांकडे

निळ्या डोंगराच्या पलीकडे -"

"फिलॉमेला, फिलॉमेला,

प्रोक्‍नची तू बहीण ना !

तिच्या जागी राहशील ना ?

तूच हो आता माझी राणी

तुझ्याशिवाय मला नाही कुणी !"

फिलॉमेलाने मग डोळे पुसले

आणि राजाला ’हो’ म्हटले.

लग्नाची घटका भरत आली,

प्रोक्‍नची दासी हळूच म्हणाली -

"फिलॉमेला, माहीत आहे तुला,

टेरियस राजा खोटे बोलला.

म्हणाला , ’प्रोक्न राणी मेली.’

तिला किल्ल्यात कोंडून ठेवली

मखमली हिरवळ संपते जिथे

प्रोक्‍न राणी वाट पाहाते - "

फिलॉमेला हळूच जायला निघाली

समोरुन टेरियसची स्वारी आली

(आता कसं करायचं ?)

गुपित फुटलं, घोटाळा झाला,

भेट घ्यायचा मार्गच खुंटला.

"फिलॉमेला, ऐक -

प्रोक्‍नला काही सांगायचं नाही

काय म्हणतो मी, समजलं नाही ?"

फिलॉमेला मुळी ऐकेच ना

"ताई ग ताई, आहेस ना ?" -

(असं काय ?)

राजाने तिची जीभच कापली

फिलॉमेला तेव्हा धावत सुटली

बहिणींची एकदा भेट झाली

दोघींची जोडी हळूच निघाली.

प्रवास त्यांचा सुरु झाला

राजा मागून मागून आला

पळता पळता दमछाक झाली

देवाला दोघींची दया आली.

प्रोक्न राणी चिमणी बनली

धाकटी बहीण नायटिंगेल झाली

फिलॉमेलाची जीभ अजून दुखते

करुण गाणे गात सुटते.

त्यांचा पाठलाग संपला का ?

छे ! मुळीच नाही !

ससाणा पक्षी पाहिलात का ?

N/A

References :

कवयित्री - सुलोचना घोटीकर

Last Updated : December 26, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP