मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बी|संग्रह १| वेडगाणे संग्रह १ आम्ही क्षणभर काव्यानंद बंडवाला बकुल बुलबुल एक संवाद यमदूतास नावात काय आहे कविनंदन प्रणयपत्रिका वेडगाणे प्रमिला पिंगा प्रणयप्रयाण माझी कन्या दीपज्योतीस वात्सल्य चाफा निवेदन वेडगाणे कवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे. Tags : kavi beepoemकवीकवी बी वेडगाणे Translation - भाषांतर टला-ट रीला-ई जण म्हणे काव्य करणारी. आकाशाची घरे त्याला प्रकाशाची दारे ग्रहमाळांच्या वर अडसरी ग, जन म्हणे काव्य करणारी. पाचूंच्या वेली न्हाल्या लावण्याच्या जली दारी उभ्या स्वर्गीय नरनारी-ग, जन म्हणे काय करणारि. उडुगणांच्या यानी बसुन विश्वाची राणी अनंताची प्रदक्षणा करी-ग, जन म्हणे काव्य करणारी. चंद्राचे हसणे वायूचे बरळणे सृष्टिसुरात सुर मी भरी-ग, जन म्हणे काव्य करणारी. मी न तुझी-त्याची मी न माझी-कुणाची ! ब्रह्मांडाच्या घडामोडी करी-ग, जन म्हणे काय करणारी. दिव्य भोगांच्या खाणी गाय मनोमय वाणि कशी वदेल राठ वैखरी-ग, जन म्हणे काव्य करणारी. टला-ट-रीला-री जन म्हणे काव्य करणारी N/A References : कवी - बी Last Updated : January 11, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP