मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बी|संग्रह १| क्षणभर संग्रह १ आम्ही क्षणभर काव्यानंद बंडवाला बकुल बुलबुल एक संवाद यमदूतास नावात काय आहे कविनंदन प्रणयपत्रिका वेडगाणे प्रमिला पिंगा प्रणयप्रयाण माझी कन्या दीपज्योतीस वात्सल्य चाफा निवेदन क्षणभर कवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे. Tags : kavi beepoemकवीकवी बी क्षणभर Translation - भाषांतर काटेरी वेलीचे जाळे रठ्ठ चर्म, गाठांनी भरले; अग्रावर पण निर्मळ ढवळे होते एकच कुसुम विकसले ! कृष्ण निशा; अंबोधर घोर ग्रसित करी गगनश्री सुंदर; परंतु होती एक शिरावर प्रसन्न तारा नयनमनोहर ! ते-ती असता एकएकटी सुसह होय ती भयाण सृष्टि; स्वर्गतिनिरयगतिप्रत्यय दे जी एका समयावच्छेदे. नित्य निराशेचे अवडंबर जीर्णाशेचे जाल निरंतर, करूनि तुज मन्मनी पुरःसर व्यथित जिवा सुख देती क्षणभर ! N/A References : कवी - बी Last Updated : January 11, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP