नागनाथ माहात्म्य - हेगरस चरित्र

नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.


बरवी संतचरित्रे हो । पावन परम पविते हो ! ॥ध्रु॥

हेगरस हा सराफ कोणी मोहळगावी राहे ।

मानूरासी जाता सहजचि नागनाथपदे पाहे ॥१॥

अनुग्रहा संपादुनि गावा जाया निरोप मागे ।

आपुल्या आश्रमि स्वामी । येऊनि पवित्र कीजे अंगे ॥२॥

नागनाथ म्हणती, ’परि येतो ओळख राखी चित्ती ।

हेगराज विनवी तव, ’स्वामी ! मुके न औले स्वहिती ॥३॥

विसर पाडुनी एके दिवशी मोहळनगरा आला ।

कुश्चित विपरित वेश बीभत्स ऐसा ज्याने धरिला ॥४॥

गोचर्मावर साजुक ऐसे पांघरला उफराटा, ।

मस्तकि मासे भारा मध्ये मत्स्य भक्षितो वाटे ॥५॥

लक्ष मक्षिका घोंगाती वरी, पोर लागती पाठी ।

लोकामाजी हेगराज तो देखुनिया निजदृष्टी ॥६॥

ओळखिला निज सद्‌गुरु अपुला लोटांगण घे चरणा ।

जवळी भारा मस्तकि, घेऊनि नेला अपुल्या सदना ॥७॥

मंचक घालुनि वरि बसवूनी सेवा केली भारी ।

देखुनि स्वयाति वाळित टाकुनि हाड रोविले द्वारी ॥८॥
संभाषणी वर्ज म्हणोनी जवळि न येती कोणी ।

एके दिवशी निज स्वामीशी बोले विनोद वाणी ॥९॥

’श्राद्ध पित्याचे ब्राह्मण न येति कोणी जेवायासी ।

नागदेव म्हणताती ’स्थळ करि बाहेरी स्वयपाकासी ॥१०॥

सिद्धटेकडीवरुती वस्त्रे धरे हो । रचियेली ।

ओदन होता कुटुंब काळी पित्रा आज्ञा केली ॥११॥

आरीमांदो उतरिल तेथे मंत्रघोष बहु होती ।

गावकरी द्विज सकळ मिळाले कौतुक पाहाताती ॥१२॥

भोजन करुनी बाहिर येता जोशी देखे बापा ।

कोणी काका, कोणी नातू, कोणी आजा बापा ॥१३॥

सिद्धटेकडी धावा धावा मेली भेटी येती ।

एकमेका कंठी मिठिया घालुनि गृहासि नेती ॥१४॥

त्रिअहोरात्री केली भेठी गोष्टी मोठा झाली ।

चवथा प्रातःकाळहि होता जेथिल तेथे गेली ॥१५॥

नागदेव हा शंकर जाणुनि सकळी पूजीयेला ।

हेगराज हा स्थापुनि तेथे वडवाळेसी आला ॥१६॥

ऐका येथुनि अद्भुत तेणे पवाडा काय केला ।

वृक्ष वठोनी पडला होता वटभारे निजवी ला ॥१७॥

ऐसे अपार संत वर्णिता संशय सर्वहि जातो ।

आठविले ते एक्या भावे उद्धवचिद्धन गातो ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP