मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत वंकाचे अभंग|
तुळसी वृंदावनी उभा तो ब्र...

संत वंका - तुळसी वृंदावनी उभा तो ब्र...

संत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.


तुळसी वृंदावनी उभा तो ब्राह्मण । पुसे घरीं कोण आहे बाई ॥१॥

कोणाचें हें घर दिसतें साजिरें । मुलें आणि लेंकुरें काय आहे ॥२॥

ऐकोनी उत्तर चोखियाची कांता । प्रेमजळ नेत्रा भरियेले ॥३॥

म्हणे घरधन्यासी विठोबाचा छंद । आठविती गोविंद रात्रंदिवस ॥४॥

संसारी सुख नाहीं अणुमात्र । सदा अहोरात्र हाय हाय ॥५॥

पोटीही संतान न देखेची कांही । वायां जन्म पाहीं झाला माझा ॥६॥

वंका म्हणे ऐस बोलोनीयां मात । घाली दंडवत ब्राम्हणासी ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP