मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|प्रल्हाद केशव अत्रे|झेंडूची फुले|
धोंडो - (जांभई देत ) का...

प्र.के.अत्रे - धोंडो - (जांभई देत ) का...

प्रल्हाद केशव अत्रे (१३ऑगस्ट १८९८ - १३ जून १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, चित्रपट कथाकार, चरित्र लेखक, शिक्षणतज्ञ, संपादक, पत्रकार, राजकारणी, हजरजबाबी वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक प्रमुख नेते होते.


धोंडो - (जांभई देत)

काम केव्हा सरे

गुंडो - (निःश्वास सोडून)

हाय! केव्हा ते सरेल?

वाटते, कंबर आताच मोडेल!

काय रे देवा ही आमुची स्थिती?

बरे आहे, चालू द्या! ना तरी मिळेल

येथून गचांडी ! छे, ते नको रे बाबा!

(अंगावर काटा आल्यासारखे करतो. इतक्यात शिपाई आणखी दोन फायली आणून ठेवतो.)

धोंडो - (स्फुंदत)

अंतच न देवा! का रे या फायलीलागून?

काम केव्हा सरे?

गुंडो (निःश्वास सोडून)

हाय! केव्हा ते सरेल?

धोंडो - (धीर करून)

बरे तर गुंडो, काढा एक विडी

गुंडो - (घाबरून)

छे, छे, नको रे राजसा असे तू करू!

धोंडो - (निश्चयाने)

काहीही म्हटले तुम्ही जरी आता

शिलगावतोच-

(विडी पेटवतो. तोच आतून साहेब येतो व धोंडोला विडी ओढताना पाहून त्याच्या पाठीत गुद्दा मारतो. धोंडो पळून जातो.)

धोंडो - (पळता पळता)

होऊ नये ते झाले!-

गुंडो - (स्वगत हसून)

व्हावे तेच झाले!

एकटाच विडी ओढतो लेकाचा!

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP