श्रीभगवानुवाच ।
जितेन्द्रियस्य युक्तस्य जितश्वासस्य योगिनः ।
मयि धारयतश्चेत उपतिष्ठन्ति सिद्धयः ॥१॥
प्राणापानजयो जयापासीं । इंद्रियजयो असे ज्यासी ।
यावरी उल्हास मद्भक्तीसी । चित्त अहर्निशीं मद्युक्त ॥३२॥
उद्धवा गा त्याच्या ठायीं । अनिवार सिद्धी उपजती पाहीं ।
ये अर्थी संदेह नाहीं । जे जे समयीं जें इच्छी ॥३३॥
ऐसें उद्धवें ऐकतां । चमत्कारू झाला चित्ता ।
समूळ सिद्धींची कथा । श्रीकृष्णनाथा पुसों पा ॥३४॥