एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


स्नानदानतपोऽवस्थावीर्यसंस्कारकर्मभिः ।

मत्स्मृत्या चात्मनः शौचं शुद्धः कर्माचरेद्‌द्विजः ॥१४॥

गर्भाधानादि अन्नप्राशन । ते बाल्यावस्था संपूर्ण ।

चौल तें कुमारावस्था जाण । ब्राह्मणपण उपनयनें ॥५१॥

कर्मभूमिकेलागीं स्नान । द्रव्यशुद्धीलागीं कीजे दान ।

वैराग्यलागीं तप जाण । कर्माचरण जडत्वत्यागा ॥५२॥

माझिया भजनीं दृढबुद्धि । त्या नांव जाण `वीर्यशुद्धि' ।

माझेनि स्मरणें `चित्तशुद्धि' । जाण त्रिशुद्धि उद्धवा ॥५३॥

ऐस‍ऐसिया विधीं । ब्राह्मण जे कां सुबुद्धी ।

सबाह्य पावावया शुद्धी । वेद उपपादी स्वकर्में ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP