एक तूं ही निरंकार (१२१)
दनी तूच खजाना तूची गरीबांचा तू कैवारी ।
कृपा करूनी झोळी भरावी गुह्ना आपुले प्रगट करी ।
वाली सर्व जगाचा तूची तू गोविंद गुरु गोपाळ ।
पालनकर्ता तू जगताचा यौवन रूप आणिक माल ।
पावन तूची उत्तम जगती तू सृष्टी तूची करतार ।
भक्तजनांचा ठेवा तूची तूची आहे प्राणाधार ।
पूर्ण गुरु आहे जग कर्ता भ्रांत मनाची दुर करी ।
देऊन अपुली नाम ज्योती प्रकाश हृदयांपरी करी ।
मंदमती मी अजाण आहे चुकली वाट मला दावी ।
ज्ञानाचा दीपक लावूनी ज्योत मनाची उजळावी ।
बुद्धी गुण नाही मजपाशी अती नीच आहे अज्ञान ।
तुझ्या कृपेच्या छायेखाली आलो आहे श्रीभगवान ।
हात जोडूनी विनंती माझी करीती वारंवार प्रणाम ।
'अवतार' म्हणे हे विश्वपालका टाकी झॊळीत अपुले नाम ।
*
एक तूं ही निरंकार (१२२)
असे झोपडी राहण्या साधी कांदा भाकर खाई जरी ।
वस्त्र फाटकी अंगवरती करी मजूरी दिवस भरी ।
आदर कोणी करी न त्याचा जाईल जया ठिकाणाला ।
नसे रूप आणि धन काही प्रिय नसे जो कवणाला ।
संगे सोयरे कुणी न त्याला नाही कुणी संगी साथी ।
'अवतार' जगी या तो महाराजा ज्याची प्रभुसवे प्रीती ।
*
एक तूं ही निरंकार (१२३)
उघड मानवा मन चर्क्षूला व्यर्थ समय घालवू नको ।
आठ प्रहर मायेत राहुनी व्यर्थ मना भटकवू नको ।
विसरला तू जीवन दाता ज्याने तुजला सर्व दिले ।
व्याज अल्प ते दुर राहिले मुद्दल सारे घालविले ।
माय पिता सुत दारा दौलत जातील सोडून तुज अंती ।
एक दिवस हे मिळुन सारे भूत प्रेत तुजला म्हणती ।
जन्म, खेळणे, पालन, लटके लटीका अंतर्बाह्य तुझ्या ।
कर्म धर्म जे खरे समजशी लटका हा व्यापार तुझा ।
भोगवासनेमाजी रमूनी विसरलास अपुला करतार ।
मन हे निर्मळ कधी न होई सदगुरुवीण म्हणे 'अवतार' ।
*
एक तूं ही निरंकार (१२४)
ध्यान लावूनी लटकूनी उलटे अती शरीरा कष्टविले ।
नामाचा जप अखंड करुनी जीवन अपुले घालविले ।
कीतीकांनी व्रत रोजे करुनी शरीरासी दुबळे केले ।
कीतीकांनी गंगा स्नानाने जीवन अपुले घालविले ।
कितीकांनी तीर्थी जाऊनी धन संपत्ती लुटविली ।
कैक जणांनी समाधीवरी खोटी आस मनी धरीली ।
मंदीर पर्वत तीर्थस्थानी जाऊन प्रभुला आळविले ।
महानता तरी जगदीशा कोणी ना जाणू शकले ।
कोन आपुले आहे जगती वस्तु कोणती दुसर्याची ।
समय कुणाला नाही आली गुरु 'अवतार' विना याची ।
*
एक तूं ही निरंकार (१२५)
गुरुची महिमा गा तू प्राण्या दुःख क्लेश निघूनी जातो ।
गुरुची महिमा गा तू प्राण्या येईल तेज मुखावरती ।
गुरुची महिमा गा तू प्राण्या येईल जीवनी शीतलता ।
गुरुची महिम गा तू प्राण्या अमृत होईल विष सुद्धा ।
महिमा गान गुरुचे करता पापीही होईल पुनीत ।
गाईल जो सदगुरुची महिमा मुडदेही होतील जिवीत ।
पूर्ण गुरुची महिमा कोनी गुरु कृपेने गान करी ।
क्षणामाजी 'अवतार' गुरु हा मायेचा तम दूर करी ।
*
एक तूं ही निरंकार (१२६)
दगदग सारी जाय मिटूनी संत चरणराज जो लावी ।
काळही त्याचे मानील जगती चरणधुळीला जो लावी ।
दैवलेख जातील मिटूनी चरणधुळीला जो लावी ।
सर्व दोष जातील मिटुनी चरणधूलीला जो लावी ।
क्षणात होईल ज्ञान प्रभुचे चरणधुळीला जो लावी ।
सर्व भ्रमातून होईल सुटका चरणधुळीला जो लावी ।
नयनी हृदयी येईल शांती चरणधुळीला जो लावी ।
होईल वश ब्रह्मांड तयाला चरणधुळीला जो लावी ।
कमळा जैसा राहिल जगती चरणधुळीला जो लावी ।
काया पालट होईल त्याचा चरणधुळीला जो लावी ।
नाही भरोसा या देहाचा जाईल श्वास कधी काळी ।
'अवतार' म्हणे जर मिळेल चरनधूळ लावी भाळी ।
*
एक तूं ही निरंकार (१२७)
सदा रंगूनी राहे नामी ज्याने गुरुला तोर्षावले ।
जिवलग होई देव तयचा ज्याने गुरुला तोषविले ।
अभिमान जाईल धुऊनी ज्याने गुरुला तोषविले ।
निर्मळ तन मन निर्मळ वाणी ज्याने गुरुला तोषविले ।
सार्या वस्तू तयास मिळती ज्याने गुरुला तोषविले ।
कमळ मनाचे फूलुन जाई ज्याने गुरुला तोषविले ।
अहंकार जाईल फूलुन जाई ज्याने गुरुला तोषविले ।
सदैव मस्ती राहे चढूनी ज्याने गुरुला तोषविले ।
जीवा शिवाची होई भेटी ज्याने गुरुला तोषविले ।
'अवतार' तयाला काही ना कमी ज्याने गुरुला तोषविले ।
*
एक तूं ही निरंकार (१२८)
मनमार्गीची हीच निशाणी मायाधीन सदा राहे ।
मनमर्गीची हीच निशानी कर्मकांडी गुंतुनी राहे ।
मनमार्गीची हीच निशानी लोभ अती विषयी मरती ।
मनमार्गीची हीच निशाणी सदैव ते दुःखी असती
मनमार्गीची हीच निशाणी अभिमानातच राहे चुर ।
मनमार्गीची हीच निशाणी साधुपासून राहे दुर ।
मनमार्गीची हीच निशाणी कुंटूबावरी स्नेह अपार ।
मनमार्गीची हीच निशाणी विसरूनी जाती निराकार ।
क्षणोक्षणी दुःखी मनमार्गी हाय हाय सदैव करी ।
म्हणे 'अवतार' अमोल जाईल हरून जुगारापरी ।
*
एक तूं ही निरंकार (१२९)
नामधन ज्यापाशी नाही अंती पश्चाताप तया ।
नामधन ज्यापाशी नाही रडूनी घालवीतो समया ।
नामधन ज्यापाशी नाही लोभी तो अहंकारी ।
नामधन ज्यापाशी नाही पापी तो या संसारी ।
नामधन ज्यापाशी नाही दारिद्याचा तो भागी ।
नामधन ज्यापाशी नाही चांडाळ तो असे हतभागी ।
नामधन ज्यापाशी नाही बहु जन्माचा तो रोगी ।
नामधन ज्यापाशी नाही क्षणोक्षणी दुःखे भोगी ।
'अवतार' म्हणे गुरुपासुन ज्याने नामामृत सेवन केले ।
संतजनाच्या चरणधुळीने जीवन अपुले सार्थकीले ।
*
एक तूं ही निरंकार (१३०)
कणकणवासी देव पहाण्या वनामध्ये जातात किती ।
कणकणवासी देव पहाण्या भस्मांगी लावीती किती ।
कणकणवासी देव पहाण्या समाधीस्त होतीत किती ।
कणकणवासी देव पहाण्या गंगेमाजी नहाती किती ।
कणकणवासी देव पहण्या पूजापाठ करीती किती ।
कणकणवासी देव पहाण्या फकीरांना भजतात किती ।
कणकणवासी देव पहाण्या आपणांसी लुटवीती किती ।
कणकणवासी देव पहण्या ठोकर दर दर खाती किती ।
मात मनाचा त्यागुनी मानव शरण जाय जो साधुला ।
'अवतार' म्हणे सदगुरु कॄपेने मिळेल ठाय परी अपुल्या ।