एक तूं ही निरंकार (२५१)
म्हणेल कोनी बळे आपुल्या ईश्वर प्राप्ती करीन मी ।
पांचही वेळा नमाज पढूनी प्रसन्न अल्ला करीन मी ।
जप माळेचे मणी फिरवुनी पालटेन हे नशीब मी ।
पाठ पूजा आरती करूनी निज भाग्याला उजळीन मी ।
बळे आपुल्या काही न लाभे जोवर गुरुला तोषवीना ।
'अवतार' सदगुरु द्वारी येऊन पदर आपुला पसरीना ।
*
एक तूं ही निरंकार (२५२)
ज्ञानावाचून कर्माचरणे धन्यावीण मजूरी करणे ।
घराकडुनी उलत चालता दुरच त्या पासुन जाणे ।
भाकर भाकर म्हणत राहता भुकेस तीव्र अती करणे ।
प्रियकर नसता प्रीती करणे जळून जाणे विरहाने ।
पाहिल्यावीना प्रियकराला करिसी प्रीती कुणासवे ।
'अवतार' म्हणे सदगुरुच केवळ भेटवील या हरिसवे ।
*
एक तूं ही निरंकार (२५३)
वेष धरा उपदेश करा अन् पुजा पाठ वा दान करा ।
टिळा मस्तकी घंटी वाजवा किंवा तीर्थे स्नान करा ।
घर त्यागुन करा जागरणे कींवा वनात वास करा ।
करा तप उपवासी राहूनी पाहिल्यावीना ध्यान धरा ।
मूर्ख असे हे भटके ढोंगी बहु जन्म दुःखी होती ।
मार्गहीन 'अवतार' हे भोंदू अंती घोर नर्की पडती ।
*
एक तूं ही निरंकार (२५४)
गुरु नाही जो कर्म दाखवी प्रभुचे दर्शन घडवीना ।
गुरु मर्यादा शिकवी लोका शिष्य परि तो बनवीना ।
इतरांन उपदेश करीतो परि स्वयें तो आचरीना ।
समजावितो इतर जनांना ग्रहस्थ आपण आचरीना ।
ऐसे ढोंगी मानव जगती बहु जन्मी दुःखी होती ।
'अवतार' म्हणे चौर्याऐंशीमाजी पुन्हा पुन्हा धक्के खाती ।
*
एक तूं ही निरंकार (२५५)
गुरु नसे जो शिष्याकडूनी खतो वर भय दाखवीतो ।
सुंदर सुंदर भेट मिळावी म्हणुन शिष्या भ्रमवीतो ।
शिष्य नसे तो चतुराईने तोषवीन म्हणे गुरुला ।
तीर्थ व्रत नेमाचरुनी प्राप्त करीन मी मुक्तीला ।
कर्म एकची गुरुशिष्याचे समर्पित होणे गुरुला ।
'अवतार' गुरुचे काम हे इच्छीत पुरवावे निज शिष्याला ।
*
एक तूं ही निरंकार (२५६)
व्यापक सर्वही निराकार हा कानावाचून श्रवण करी ।
पार करी पायावीण पर्वत हातावाचुन काम करी ।
नासिकावीना सुगंध घेई राग आळवी मुखा विना ।
चर्मचक्षुवीण सारे पाहे विना उदर सेवी अन्न ।
अरुप ऐसा हा बहुरुपी अनंत रूपे अवतरतो ।
'अवतार' अगोचर परब्रह्माचे सदगुरु दर्शन करवीतो ।
*
एक तूं ही निरंकार (२५७)
रचिली सारी सृष्टी याने अती सुंदर रचना केली ।
केवळ एक दोन ना भुलले दुनिया ही सारे भुलली ।
धरती पाणी अन् अग्नीला कुणी समजली निर्माता ।
कूणी वायुचे पूजन करिती शब्द म्हणे कोणी कर्ता ।
पंचतत्व षड्रस त्रिगुणांनी रचिला सारा हा संसार ।
सर्वाभाजी व्यापुनी न्यारा लपून बसला हा निरंकार ।
परि प्रभुला तोची जाणे स्वये रूप दावी ज्याला ।
म्हणे 'अवतार' गुरु वाचोनी भेद कुनी नाही कळला ।
*
एक तूं ही निरंकार (२५८)
संत तोच प्रति श्वासामाजी हरिनामाचे स्मरण करी ।
संत खरा तोची परपीडा क्षणात एका दुर करी ।
संत खरा तो मानवास या साधनातुनी मुक्त करी ।
संत खरा तो क्षणात एका अंग संग दाखवी हरि ।
हरिला संतजनाहून न्यारा कधी कुणी म्हणू शके ।
'अवतार' साऊली नरा पासूनी दूर कधी ना राहु शके ।
*
एक तूं ही निरंकार (२५९)
सत युगात येऊनी याने प्रह्लादाला वाचविले ।
त्रेतामजी रावण वधीला द्वापरी कन्हैया म्हणविले ।
येऊनीया कलीयुगात याने नानक नामा धारीयले ।
रूप आपुले बदलूनी याने ज्ञान रोपटे लावियले ।
स्वय एक हा आदि अनादि निरंकार जय जय म्हणे ।
वचन गुरुचे स्वयंही ब्रह्म सदा सदा 'अवतार' म्हणे ।
*
एक तूं ही निरंकार (२६०)
चौर्याऐंशी योनीचे केले निर्मात्याने चार प्रकार ।
अंडज पिंडज स्वेदज उदभीज यामाजी सारा संसार ।
ज्यावर दया प्रभुची होई जन्म मानवाच मिळतो ।
होता सदगुरु कृपा तयावर ईश्वररूप स्वये होतो ।
साधुवाचून गुह्ना भेद हा जगी कुणी ना जाणु शके ।
गुरुवीना 'अवतार' प्रभुची भेट कूणी ना करवू शके ।