एक तूं ही निरंकार (२७१)
अती नीच मी होती कामी आली दया असे तुजला ।
तुझी कॄपा जाहली म्हणोनी नवजीवन हे प्राप्त मला ।
ताटातुटी युगायुगाची तूच येऊनी जोडीयले ।
दो कर संकेताकरवी मज ज्ञानामृत हे पाजियले ।
मजवर केली दया गुरुने चरणी अपुल्या लावियला ।
क्षणामध्ये 'अवतार' गुरुने निराकार मज दाखविला ।
*
एक तूं ही निरंकार (२७२)
नाना कर्मे आचरिली मी अमाप ऐसे केले दान ।
धर्म जातीचे भूत शिरावर बहु केला ऐसा अभिमान ।
असून निरक्षर अन अज्ञानी समजत होतो मी विद्वान ।
नियम बद्ध मी कर्म करीतो ऐसा होता मज अभिमान ।
मुक्ति मार्ग मिळविण्यासाठी ग्रंथ नित्य वाचन केले ।
समजल्याविना पाहिल्याविना स्तवन बढाईने केले ।
मुक्तिमार्ग हा तीक्ष्ण सुरीपरी कठीण चालणे त्यावरती ।
तुष्ट होय 'अवतार' गुरु जर सहज शक्य होईल मुक्ती ।
*
एक तूं ही निरंकार (२७३)
कुणी म्हणे प्रभु आहे जवळी कोनी म्हणे अती दूर वसे ।
कुणी म्हणे हा गगन निवासी कोणी म्हणे जळांत वसे ।
जर नाही निर्मळ मन झाले अवगुण कधी ना होती नाश ।
नाम रंग जोवर ना लागे अशक्य होणे मनी प्रकाश ।
पूर्ण गुरुचा एक इशारा दुविधा सारी दूर करी ।
'अवतार' समर्पित सदा तयाला मिलाप जो हरिसवे करी ।
*
एक तूं ही निरंकार (२७४)
पूजा पाठ अन दान पूण्यही करिती कोणी जन्मभरी ।
जीवन हित समजूनी मानव रात्रंदिन तो दंड भरी ।
जनहित कारण शिरी आपुल्या अनेक दुःखे सहन करी ।
कष्ट सोसूनी अज्ञानी हा हरि नामाचा जाप करी ।
जोवर पुर्ण गुरु ना भेटे कार्य सफल होणे नाही ।
'अवतार' सदगुरु ज्यास मिळाला जन्म मरण त्याला नाही ।
*
एक तूं ही निरंकार (२७५)
कुणी धनाचा कुणी मनाचा कुणी तनाचा मान करी ।
दिले सर्व हे ज्या देवान ओळख त्याची कुणी न करी ।
चर दिंसाची काया मिळता विसरलास तु आपणाला ।
अखेर एक दिवस हे सारे सोडावे लागेल तुला ।
अनुतापे ना मिळणे काही ओळख या समयी तू करी ।
'अवतार म्हणे ये सदगुरु चरणी जीवनाचे कल्याण करी ।
*
एक तूं ही निरंकार (२७६)
जगदीश्वर जर असेल ध्यानी दुःख सुद्धा दुःख ना देई ।
जगदीश्वर जर असेल ध्यानी कमी नसे त्याला काही ।
जगदीश्वर जर असेल ध्यानी सफल तयाची कार्ये जाण ।
जगदीश्वर जर असेल ध्यानी निर्बल तो होई बलवान ।
जगदीश्वर जर असेल ध्यानी मृत्युची ना त्यास भीती ।
म्हणे,'अवतार' गुरु वाचोनी येई न हा स्वामी चित्ती ।
*
एक तूं ही निरंकार (२७७)
वचन गुरुचे पालन करता होईल गुरुची महिमा गान ।
सहजची होईल स्मरण प्रभुचे दूर होय सारे अज्ञान ।
गुरुवचन हे ज्ञान गुरुचे निरंकार हे याचे नाम ।
स्वयं तरुनी कुळी उद्धारी यमराजाही करी प्रणाम ।
ईश्वरी इच्छा सदैव मानी सदगुरुवर विश्वास धरी ।
म्हणे 'अवतार' सदा सुखी अन देवलोकी तो वास करी ।
*
एक तूं ही निरंकार (२७८)
अवगुण अपुले कधी न पाहे जगताला समजावीतो ।
जसे जुगारामाजी मानव जन्म हरूनी घालावीतो ।
तुला विसरूनी गेले त्यांना क्षमा करी हे दयानिधान ।
माया मान ग्रसित जीवांना द्यावे भक्तिचे वरदान ।
निज कर्माचे मिळे न मुक्ती पुर्ण गुरु करितो भवपार ।
'अवतार' गुरुला शरण येऊनी करी आपुला तु उद्धार ।
*
एक तूं ही निरंकार (२७९)
काय मानवा चिंता करूनी समय आपुला घालविशी ।
स्मरण हरिचे नित्य करी तूं राहिल हेच तुझ्यापाशी ।
सूर्य चंद्र पाणी धरतीवर आज्ञा ज्याची चालवते ।
दुनियेतील सार्या प्राण्यांवर हुकूम जयाचा चालतसे ।
ज्याच्या आज्ञेवाचून जगती पान एक ना हलु शके ।
ज्याच्या आज्ञेवाचून जगती तिळभर काही मिळू न शके ।
जो सारा संसार बनवूनी सर्व जीव पालन करीतो ।
स्वये रचुनी सर्व खेळ हा सांभाळही स्वंये करीतो ।
वाहील हाच तुझीही चिंता नाम तू याचे घेत रहा ।
म्हणे 'अवतार' गुरु भेटीने महिमा याची गात रहा ।
*
एक तूं ही निरंकार (२८०)
पूर्ण गुरुला शरण येऊनी सोडी तन मन धन अभिमान ।
ज्या देवाल शोधीत फिरशी क्षणात तो पाहे भगवान ।
गुरु दाता सर्वाहुनी मोठा देत असे जो देवी दान ।
गुरु केवळ भांडार दयेचे परिपुर्ण हे याचे धाम ।
बल बुद्धीचा स्वामी सदगुरु आत्म्याचाही हा स्वामी ।
आपण अपुल्या नामा जपवी हाच असे सदगुरु नामी ।
कृपावंत जर होय सदगुरु गरीबाला धनवान करी ।
कृपावंत जर होय सदगुरु सुखमय इह परलोक करी ।
गुरु कृपेने सदैव जीवन स्वर्गमयी होऊन जाई ।
'अवतार' म्हणे हा जीव गुरुवीणा क्षणोक्षणी ठोकर खाई ।