एक तूं ही निरंकार (२८१)
शरणगंत मी त्या शिष्यांना ज्यांनी निभविली प्रीती ।
शरणागंत मी त्या शिष्यांना नसे मान ज्यांच्या चित्ती ।
शरणागंत मी त्या शिष्यांना तन मन जे अर्पण करिती ।
शरणागंत मी त्या शिष्यांना भवजल जे तरूनी जाती ।
गुरुशिष्य हे रूप गुरुचे गुरुला जे वाहुन घेती ।
आपण जपूनी नाम सदैव मार्ग जगाला दाखवीती ।
भक्त रूप धरूनी सदगुरु प्रगट जगामाजी होती ।
सुक्ष्म रूपे गुरु भक्तामाजी सदैव समावूनी राहतो ।
धन्य धन्य गुरु अन सेवक ते एकरुप होऊनी जाती ।
'अवतार' नाम तेची मिळवीती जे आपणाला मिटवीती ।
*
एक तूं ही निरंकार (२८२)
गुरुकृपेने शिष्यगणांची दुर्धरही कामे होती ।
गुरुकृपेने शिष्यगणांचे मन संशय सारे मिटती ।
सदगुरु कृपा गुरु शिष्याला पूर्णतया संतुष्ट करी ।
सदगुरु कृपा गुरु शिष्याला संपत्ती देई सारी ।
सदगुरु कृपा गुरु शिष्याला भीती पासुनी दुर करी ।
सदगुरु कृपा गुरु शिष्याला सारी दुःखें दूर करी ।
सदगुरु कृपा गुरु शिष्याला प्रगट होय वाणीतुनी ।
गुण आपुले स्वंयेची गाई नाम तूंही हे जपवूनी ।
कृपा गुरुची होय जयावर भाग्यवान तोची जगती ।
'अवतार' निराळे जीवन त्याचे गुरुकृपा ज्याच्या वरती ।
*
एक तूं ही निरंकार (२८३)
सदगुरुचा उपदेश मानीता अहंभाव संपूनी जाई ।
कामक्रोध अन् मोहातूनी मन हे बंध मुक्त होई ।
सदगुरुचा उपदेश मानीता धैर्य मानसी वास करी ।
सदगुरुचा उपदेश मानीता मन हरिच्छा स्वीकारी ।
सदगुरुचा उपदेश मानीता होत असे मन वैरागी ।
सदगुरुचा उपदेश मानीता मन हे होई तपी त्यागी ।
सदगुरुचा उपदेश मानीता स्मरणामाजी मन रमते ।
उठता बसता खाता पीता मन नामी रंगुनी जाते ।
पूर्ण सदगुरु ज्यास मिळाला भाग्यवान तो जगी असे ।
'अवतार' गुरुवाचोनी समजा अपूर्ण सारे काम असे ।
*
एक तूं ही निरंकार (२८४)
अहंभाव त्यागुनी देता मिळेल निराकार प्रभु ।
गुरुवचन जो मानी त्याला प्राप्त होय अवतार प्रभु ।
गुरुमत ज्याच्या वसे अंतरी अहंकार नाही तेथे ।
सत्काराची नुरे भावना अभिमान आहे जेथे ।
तन मन धन हे दिधले ज्याने जाण नरा तो हा निरंकार ।
मायेमाजी फसू नको तू जाणी जगताचा दातार ।
गुरुचरणी मस्तक ठेवियले तेव्हां हे दर्शन घडले ।
दर्शन याचे झाल्या उपरी मन माझे हर्षित झाले ।
ना मिळते जर गुरु चरण हे ना मिळता ऐसा सत्कार ।
ना मिळता 'अवतार' गुरु जर ना मिळता हा निरंकार ।
*
एक तूं ही निरंकार (२८५) (चाल- श्लोक )
तुझ्या आश्रये सर्व करीतो मी काम ।
स्वीकारी गुरु मम लाखो प्रणाम ।
साकार तुची निराकार तुची ।
महिमा तुझी नाही कळली कुणाला ।
तुजविण कोणी न जाणील तुजला ।
स्वीकार करिसी जो येईल चरणी ।
कुळ ग्राम याती मनासी न आणी ।
शरण मी आलो असे आज तुजला ।
घडवियला तूच 'अवतार' मजला ।
*
एक तुं ही निरंकार (२८६) ( चाल - श्लोक )
अपराध ज्याचे असता अपार ।
कृपेने तुझ्या होय क्षणी भवपार ।
हा रास काष्टाची ठिनगी जरासी ।
क्षणामाजी भस्म करीते तयासी ।
घनदाट अंधार जरी दाटलासे ।
क्षणी दुर हो दीपकाचे प्रकाशे ।
तैशपरी तव कृपेच्या प्रतापे ।
गेली जळोनी पतितांची पापे ।
'अवतार' पाहे जया कृपा दृष्टी ।
मृत्युची ही नाही त्यालागी भीती ।
*
एक तूं ही निरंकार (२८७)
गुरु जयाला प्रसना झाला तोटा नाही तया कसला ।
भीती तयाला नाही कशाची गुरु आधार असे ज्याला ।
सखा जयाचा होय सदगुरु काळ न त्याला त्रस्त करी ।
प्रसन्न केले गुरुला ज्याने द्वेष मनाचा दुर करी ।
कृपा गुरुची ज्यावर झाली भव बंधन त्याचे तुटती ।
प्रसन्न गुरु 'अवतार' जयाला जन्म मरण फेरे चुकती ।
*
एक तूं ही निरंकार (२८८)
नामरुपी धन ज्याच्या पदरी तो राजांचा महाराजा ।
नामरुपी धन ज्याच्या पदरी त्याला ना कसली पर्वा ।
नामरुपी धन ज्याच्या पदरी लाभच लाभ तया पदरी ।
नमरुपी धन ज्याच्या पदरी सर्वेच्छा होईल पूरी ।
नामरुपी धन पदरी ज्याच्या मार्ग सुगम त्याचा होयी ।
'अवतारी' म्हणे सदगुरुवीना मार्ग कुणीही ना दावी ।
*
एक तूं ही निरंकार (२८९)
अहंभावना त्याग करोनी जो आला गुरुच्या चरणी ।
सुख समृद्धी मिळे तयाला तॄप्त भावना येई मनी ।
ज्याने सदगुरु सेवा केली भाग्य तयाच्या येई घरी ।
शुभ्र स्वच्छ पोषाख तयाचा सेवन उत्तम अन्न करी ।
फकीर असो धनवान कुणीही असो भिकारी जन्मभरी ।
होईल मन त्याचे आनंदी मिळती तया सुखें सारी ।
जो नर येई सदगुरुपाशी जाणील तो हा निरंकार ।
सदैव देवासवे राहतो नाही दुर म्हणे 'अवतार' ।
*
एक तूं ही निरंकार (२९०)
वृक्ष आपुले फळ ना खाई फळ खाई सारा संसार ।
प्राशन करी ना सरिता पाणी वाहुन करते परउपकार ।
लाखो प्रेमी कष्ट सोशीती भगवंताला तोषविण्या ।
'अवतार' संत येती संसारी सर्व जगाला उद्धरण्या ।