श्रीगणेशाय नमः
॥ श्रीगुरुभ्योनमः ॥ श्रीसच्चिदानंदायनमः ॥
जयजयश्रीगणनायका ॥ मंगळमूर्तिविनायका ॥ धर्मार्थकाममोक्षदायका ॥ नमोतुज ॥१॥
सिद्धि बुद्धिपतिसर्वोत्तमा ॥ स्वभक्तकामकल्पद्रुमा ॥ चिंतामणीअनंतधामा ॥ नमोतुक ॥२॥
एकदंतालंबोदरा ॥ भालचंद्रामोरेश्वरा ॥ धुंढिराजाविश्वंभरा ॥ नमोतुज ॥३॥
सकळविघ्नसंकटनाशना ॥ हेरंबातापत्रयनिवारणा ॥ अनन्यनिजभक्तसंरक्षणा ॥ नमोतुज ॥४॥
जयजयविद्याप्रकाशका ॥ जयजयअज्ञाननाशका ॥ अनंतकोटिब्रह्मांडनायका ॥ नमोतुज ॥५॥
तूंचिरेणुकाकुळदेवता ॥ गणेशातूंचि नागाईमाता ॥ तूंचिगोसावीनामेंपिता ॥ नमोतुज ॥६॥
तूंचिसद्गुरुरुपगणेशा ॥ स्वामीगोपाळाश्रमवेशा ॥ सच्चिदानंदास्वप्रकाशा ॥ नमोतुज ॥७॥
सद्गुरुगणेशापरात्परा ॥ सद्गुरुगणेशानिर्विकारा ॥ सद्गुरुगणेशासर्वार्थधरा ॥ नमोतुज ॥८॥
सद्गरुगुणेशानिर्गुणा ॥ सद्गुरुगणेशासगुणा ॥ सद्गुरुगणेशाचैतन्यघना ॥ नमोतुज ॥९॥
सद्गुरुगणेशानिरुपमा ॥ सद्गुरुगणेशानिः सीमा ॥ सद्गुरुअरुपाअनामा ॥ नमोतुज ॥१०॥
सद्गुरुगणेशाअचला ॥ सद्गुरुगणेशाअमला ॥ सद्गुरुगणेशागोपाला ॥ नमोतुज ॥११॥
भक्ततारावयागणपती ॥ धरिलीगोपाळाश्रमआकृती ॥ आतामजलाहेचि गमती ॥ अवयव ॥१२॥
प्रसन्नतातेचिशुंडासरळ ॥ ज्ञानविज्ञानगंडयुयुग्ळ ॥ लुब्धहोतीमुमुक्षुअलिकुळ ॥ तयेठाई ॥१३॥
अखंडनिजात्मश्रवण ॥ निगमागम द्वाराकर्ण ॥ तेचितुझेदोन्हीकर्ण ॥ विराजती ॥१४॥
शुद्धबोधाचातीक्ष्णबहुत ॥ कैसाझळकतोएकदंत ॥ सहजसुखअखंडित ॥ डुल्लसीतूं ॥१५॥
सच्चिदानंद पणें ॥ सकळविश्वहेंदेखणें ॥ तेचिअभेदत्वेंपूर्ण ॥ तिन्हीनेत्र ॥१६॥
चिदावका शअपार ॥ अंतःकरणतदाकार ॥ तेंचितुझेंलंबउदर ॥ विस्तारिलें ॥१७॥
त्यावरीअत्यंतसुंदर ॥ सोहंभावाचाफणिवर ॥ कैसाशोभेनिरंतर ॥ सहजची ॥१८॥
चतुर्विधआश्रमप्रचंड ॥ हेचिचारीभुजादंड ॥ यथाविधिजेअखंड ॥ विराजती ॥१९॥
सन्मार्गाचापाश ॥ सद्भावाचाअंकुश ॥ ऐंसीआयुधेंविशेष ॥ धरिसीतूं ॥२०॥
तृप्तकरायासकळिक ॥ जेआपलेभक्तलोक ॥ घेतलाब्रह्मानंदमोदक ॥ निजहस्तीं ॥२१॥
प्रपंचपरमार्थजाण ॥ हेतुझेदोन्हीचरण ॥ उभयऐक्यत्वेंचालणें ॥ घडेतुज ॥२२॥
जवळीभुक्तिआणिमुक्ति ॥ त्याचिसिद्धिबुद्धिशोभती ॥ अभयवरदागणपती ॥ गुरुवर्या ॥२३॥
स्वानुभवाचाउंदिर ॥ त्यावरीबैससीनिरंतर ॥ अंगीं निरहंकारसिंदूर ॥ घबघबीत ॥२४॥
कैसेंवैराग्याचेंवसन ॥ दिव्यझळकेविराजमान ॥ तैसींअनेकभूषणें ॥ कायवर्णू ॥२५॥
शुद्धसत्त्वाचामुगुट ॥ सत्कर्मरत्न लखलखाट ॥ स्वप्रकाशनिश्चयाचाप्रगट ॥ भाळींचंद्र ॥२६॥
सुखदुःखसमान ॥ तींचिकुंडलेंशोभायमान ॥ पुरुषार्थाचींकंकणें ॥ चौहस्तीं ॥२७॥
शमदमादिषट्क ॥ तेंचिषट्कोणपदक ॥ नवविधारत्नाचीअमोलिक ॥ माळागळां ॥२८॥
कटींशोभे मेखळथोर ॥ पांईवाजतीस्तवनाकार ॥ भक्तभावाच्यासुंदर ॥ घागरिया ॥२९॥
मैत्रीकरुणामुदिता ॥ आणिउपेक्षाभगवंता ॥ ऐशाशुभवासनातत्वतां ॥ मुद्रिकात्या ॥३०॥
अमानित्वादिसाधनें ॥ तींचिनानापरीसुमनें ॥ सत्कीर्तिकस्तुरीसंपूर्ण ॥ मधमगी ॥३१॥
क वळजेंसर्वाधिष्ठान ॥ पूर्णसुखाचेंसदन ॥ तेथेंक्रीडसीनिशिदिन ॥ समरसें ॥३२॥
सन्निधानकामधेनुउन्मनी ॥ अचिंत्यबोधचिंतामणी ॥ निर्विकल्पतोअंगणीं ॥ कल्पवृक्ष ॥३३॥
क्रोधादिदैत्यसंहारिसी ॥ जन्ममृत्यादिविघ्नेंहरसी ॥ संशयसंकटातेंनिवारिसी ॥ क्षणमात्रें ॥३४॥
जेव्हातुझीकृपाहोय ॥ तेव्हांअज्ञानदैन्यजाय ॥ मुक्तिलक्ष्मीघराये ॥ अनायासीं ॥३५॥
ऐसातूंसद्गुरुमंगळधामा ॥ बोलवेनातुझामहिमा ॥ गणेशागोपाळाश्रमा ॥ नमोतुज ॥३६॥
ऐसीकरितांस्तुति ॥ तेणेंसंतोषलागणपति ॥ प्रसन्नमंगळमूर्ति ॥ सद्गुरुरुपें ॥३७॥
कृपेनेंमस्तकींहातठेविला ॥ म्हणेआतांकरावेंग्रंथाला ॥ तुझामाझाजोसंवादझाला ॥ तोचिबोलावा ॥३८॥
जोकरिशीलतूंग्रंथ ॥ तोहोईलपरोकारार्थ ॥ हेंमाझेंवाक्यनव्हेव्यर्थ ॥ निश्वयेंसी ॥३९॥
ऐसादेऊनिपूर्णवर ॥ बुद्धींतप्रवेशलागणेश्वर ॥ बोलवीनानाशब्दाकार ॥ वाग्देवता ॥४०॥
त्याचाप्रसादलाधतां ॥ द्वैतभ्रांतिगेलीआतां ॥ जनींवनींपाहतां ॥ गजानन ॥४१॥
विश्वींविश्वात्माएकअसतां ॥ श्रोतावक्ताअनुमोदिता ॥ निंदकअणिस्तविता ॥ भेदकैंचा ॥४२॥
ज्ञानमोदकग्रंथमिषें ॥ गुरुआणिशिष्यवेषें ॥ स्वयेंप्रगटकेलागणेशें ॥ आपलामहिमा ॥४३॥
केवळब्रह्मानंदसागरीं ॥ स्फुरलीवाग्देवतालहरी ॥ हेंअभिन्नत्वेंनिर्धारीं ॥ जाणती संत ॥४४॥
गणेशगोसावीनंदनसंवाद ॥ जेथेंउपनिषदर्थविशद ॥ परिसतांजोडेपरमानंद ॥ श्रोतयांसी ॥४५॥
येथूनसंपलेंमंगळाचरण ॥ जेंबोलविलेंगजाननें ॥ तेंचिबोलिलागोसावीनंदन ॥ यथामतीं ॥४६॥
इतिश्रीज्ञानमोदकग्रंथे ॥ गणेशगोसावीनंदनसंवादे मंगलाचरणनिरुपणं नाम प्रथमोऽध्यायः ॥
श्रीगजाननार्पणमस्तु ॥ ओवीसंख्या ॥४६॥