श्रीरामायनमः

॥ सदगुरुगणाधीशगजानन ॥ गोपालाश्रमरुपीदयाघन ॥ म्हणेगोसावीनंदनासावधान ॥ ऐकआतां ॥१॥

सच्छिष्यसद्गुरुचेंकरीभजन ॥ तेंकोणाप्रकारींजाण ॥ तयाचेंहिकीजेलनिरुपण ॥ सावकाश ॥२॥

महिमाजाणोनि अंतः करणीं ॥ बैसेमानसपूजेलागुनी ॥ नानासंकल्पविकल्पसोडुनी ॥ संसारिक ॥३॥

निश्चयसद्गुरुभजनीपूर्ण ॥ सर्वदासद्गुरुचेंअनुसंघान ॥ असेसद्गुरुभक्तीचाअभिमान ॥ जयालागीं ॥४॥

सद्गुरुगुणऐकेनिरंतर ॥ जोसद्गुरुआलिंगनासादरा ॥ सद्गुरुमूर्तिडोळांवारंवार ॥ न्याहाळितसे ॥५॥

प्रेमेंसद्गुरुचरणांगुष्ठचोखी ॥ त्यापुढेंअमृतहीफीकेलेखी ॥ सद्गुरुपदाब्जाविणआणखी ॥ सुगंधनघे ॥६॥

नित्यपढेगुरुगीतागुरुस्तोत्रें ॥ वर्णीसद्गुरुचीनानाचरित्रें ॥ मेळवूनिपूजाद्रव्येंविचित्रें ॥ अर्चनकरी ॥७॥

सद्गुरुलाकरीप्रदक्षिणा ॥ सद्गुरुपुढेंनाचेदणदणा ॥ सद्गुरुआज्ञेविणकरीना ॥ कांहीकर्म ॥८॥

निर्लज्जहोऊनियाआपण ॥ घालिसाष्टांगनमनलोटांगण ॥ उचंबळेप्रेमसागरपूर्ण ॥ तयेकाळीं ॥९॥

ज्यालासद्गुरुच्याप्रसादभक्षणें ॥ सद्गुरुपादोदककरीप्राशन ॥ म्हणेमीधन्यजालोंपावन ॥ येणेंकरुनि ॥१०॥

जेंकांहींकरणेंआणिभोगणें ॥ तेथेंनोहेसद्गुरुचेंविस्मरण ॥ म्हणेकर्ताभोक्तासद्गुरुविण ॥ नसेकोण्ही ॥११॥

परमनिष्ठाधरुनिअंतरीं ॥ गुरुपादुकातीर्थस्थापीघरी ॥ कुटुंबासहितत्यांचीबरी ॥ करीसेवा ॥१२॥

सद्गुरुपादुकापूजनाविणें ॥ नकरीसर्वथाजलप्राशन ॥ म्हणेसद्गुरुकारणींमाझाप्राण ॥ लागोंसुखें ॥१३॥

म्हणें ह्यासद्गुरुच्यापादुका ॥ वंद्यब्रह्मादिसुरवरादिकां ॥ कोण्यापुण्येपावलोंफुका ॥ हेंनकळें ॥१४॥

वस्त्रेंभूषणेंअन्नपानादिक ॥ जेंआपणांपाहिजेआवश्यक ॥ तेंआधींअर्पिततसेभावपूर्वक ॥ सद्गुरुला ॥१५॥

पोषणआपल्याकुटुंबाचेपरी ॥ सद्गुरुपरिवाराचेंकरी ॥ जोशाहणाज्याचात्यापरी ॥ व्यवहाररक्षी ॥१६॥

जरींआपणासीशक्तिहोईना ॥ तरीइतरासीबोधकरीनाना ॥ भलत्याप्रकारींसद्गुरुभजना ॥ लावितसे ॥१७॥

जैसीपूज्यआपणालामातापिता ॥ त्याहूनिअधिकमानीतत्त्वतां ॥ सद्गुरुआणिसद्गुरुचीकांता ॥ भक्तीनेंजो ॥१८॥

जेसदगुरुचेसांप्रदायीअसती ॥ बंधूपरीसत्यांच्याठाईप्रीति ॥ ह्नणेपरमार्थाचींसोयरीअसती ॥ कामायेतील ॥१९॥

ह्नणेसद्गुरुसांगेलतेंकरावें ॥ त्याच्यागुणदोषातेंनपहावें ॥ सदगुरुमहिमाबोलावयाधरावें ॥ सामर्थ्यकोणें ॥२०॥

बालकापरीसलगीनेंवर्तत ॥ राजभृत्याहूनिमर्यादाबहुत ॥ अत्यंतसात्त्विकसुशीलशांत ॥ विरक्तजो ॥२१॥

जोस्वयेंभक्तिकरुनिदाखवी ॥ इतरांलाबजनमार्गीलावी ॥ सदगुरुसंप्रदायवाढवी ॥ नानायत्नें ॥२२॥

म्हणेकांहींसदगुरुलाअर्पिलें ॥ तेअनंतब्रह्मांडासीपावलें ॥ मूळींजळघालितांफलेंफुलेंचांगलें ॥ झाडजैसें ॥२३॥

म्हणेपारनाहींयापुण्यास ॥ सदगुरुचेमुखीपडतांग्रास ॥ तेणेंचौर्‍यांशीलक्षयोनीजीवास ॥ तृप्तताहोय ॥२४॥

जेंकेवळपरब्रह्मनिर्गुण ॥ तेंससदगुरुपेंजालेंसगुण ॥ निश्चयेंभक्तांच्याउद्धाराकारणें ॥ अवतरलें ॥२५॥

सदगुरुईश्वरावतारसाक्षात् ॥ त्यासीमनुष्यह्नणतीजेभ्रांत ॥ तेस्वहितासीअंतरलेनिश्चित ॥ पडतीघोरी ॥२६॥

लज्जाटाकूनिसकलजनांची ॥ अहंतासांडूनिथोरपणाची ॥ करीस्वयेंसदगुरुच्याघरींचीं ॥ निजकार्ये ॥२७॥

जैसासमारंभहोयलग्नाचा ॥ तैसासदगुरुजयंतीचा ॥ मेळामिळवूनिहरिदासांचा ॥ उच्छावकरी ॥२८॥

मंडपवस्त्रगृहेंगुढिया ॥ बरवेप्रकारेंउभारुनिया ॥ मिरवीतआणीसदरुराया ॥ निजमंदिरा ॥२९॥

षोडशोओपचारींकरीपूजनें ॥ सदगुरुच्यानांवेंदेनानादानें ॥ सर्वसाधुसंतब्राह्मणमिष्टान्नें ॥ तृप्तकरीं ॥३०॥

म्हणेसदगुरुदेवआलाघरासी ॥ जोडानाहींआजपर्वकालासी ॥ कोटिदीपावलयादसरेआम्हांसी ॥ घडलींकीं ॥३१॥

ह्नणेआजींजीवित्वजालेंसफळ ॥ धन्यआमचेंकुळआणिशिळ ॥ सदगुरुपरब्रह्मकेवळ ॥ आलेघरा ॥३२॥

सदगुरुलाहोयमाझेंस्मरण ॥ ऐसीसेवाघडोकायावाचामनें ॥ तरीजन्माआलियापूर्ण ॥ सार्थकता ॥३३॥

जेणेंस्मरणहोयसद्गुरुला ॥ ऐसीसेवाकांहींघडोमजला ॥ तरीचनिश्चयेंसीआपला ॥ सफळजन्म ॥३४॥

जरीसदगुरुआलेग्रामांतरी ॥ सदांनिजध्यासतयांचाकरी ॥ गाईविणजैसेंवासरुंघरीं ॥ बांधलेंखुंटया ॥३५॥

गाईपाशींमनअसेवासराचें ॥ वासराचें ठाईलक्ष्यगाईचें ॥ तैसेप्रेमेंसच्छिष्याचें ॥ परस्परें ॥३६॥

सदगुरुचाग्रामअसेज्यादिशेसी ॥ तेदिशालक्षीडोळांअहर्निशी ॥ सदगुरुवियोगसाहेनामानसीं ॥ कष्टीहोय ॥३७॥

देखेकोणीगुरुमार्गेयेतां ॥ प्रेमेंधावोनिअलिंगीअवचितां ॥ पुसे सदगुरुचीआनंदवार्ता ॥ आवडीनें ॥३८॥

सदगुरुचीवार्षिकयात्राकरी ॥ कुटुंबासहीतबरव्यापरी ॥ म्हणेंहेंचिसार्थकआहेनिर्धारीं ॥ जन्मांआलिया ॥३९॥

सदगुरुनगरीतेचिकाशीपुरी ॥ सद्गुरुपादोदकधारागंगावरी ॥ केवळविश्वेश्वरसद्गुरुनिर्धारीं ॥ तारकब्रह्म ॥४०॥

ब्रह्माविष्णुशंकरात्मक ॥ निश्चयसद्गुरुचीअसेयेक ॥ येथेंवायांकरितीजेकुतर्क ॥ तेपूर्णदोषी ॥४१॥

ह्नणेसद्गुरुमहिमाअपार ॥ पार्वतीशींबोलिलाशंकर ॥ श्रृतिशास्त्रांहीअगोचर ॥ अवाच्यशेषा ॥४२॥

गुरुचरणाखालीलमाती ॥ अंगालागतांप्राणीउद्धरती ॥ म्हणऊनिअंगणींलोळेअती ॥ प्रेमेंकरुनि ॥४३॥

नानापरीविनवूनिसदगुरुसी ॥ घेऊनियेआपुल्याग्रामासी ॥ मेळवूनिइष्टमित्रजनांसी ॥ भक्तीसलावी ॥४४॥

स्वयेंसदगुरुचामहोत्साहकरी ॥ आणिकरवीघरोघरीं ॥ वाजतीटाळमृदंगझालरी ॥ कीर्तनहोती ॥४५॥

ऐसाजोकायावाचाआणिमनें ॥ जीवेंप्राणेंसर्वपदार्थेशरण ॥ तोचिजाणावासच्छिष्यधन्यधन्य ॥ गुरुभक्त ॥४६॥

म्हणेजरीपूर्णघडेनासेवा ॥ तरीचतुर्थाशदशांशअर्पावा ॥ परंतुसदगुरुसीनकरावा ॥ वंचनार्थ ॥४७॥

जरीहेंविशेषजालेंअसेज्ञान ॥ तर्‍हीतोसदगुरुआज्ञेविण ॥ कोण्हासीउपदेशनकरीजाण ॥ मर्यादारक्षी ॥४८॥

भलाभलाऐसेसदगुरुम्हणती ॥ तेव्हांविनवीमाझीनकीजेस्तुति ॥ मजपासूनिकांहीं स्वामींचीभक्ति ॥ घडलीनाहीं ॥४९॥

सदगुरुनेंद्यावाविशेषमान ॥ सर्वदांवाणावेमाझेगुण ॥ ऐसेंइच्छिनासर्वथाआपण ॥ प्राणगेल्या ॥५०॥

जाणेचातुर्यशास्त्रवित्पत्ति ॥ बोलावयासीदुसराबृहस्पति ॥ परीयोग्यतासदगुरुप्रती ॥ मिरवीना ॥५१॥

सदगुरुभक्तीनेकीर्तिव्हावी ॥ लोकांमध्येंप्रतिष्ठावाढवावी ॥ ऐसेंसर्वथाचित्तीनभावी ॥ स्वहितींरत ॥५२॥

ज्यालासदगुरुचीचर्चाआवडे ॥ त्यावेगळेंअन्यशास्त्रनावडे ॥ सदगुरुविरहितकोणीकडे ॥ चित्तनेदी ॥५३॥

म्यांसर्वस्वेंअर्पिलेंसंदगुरुसी ॥ ऐसेंउच्चारीनाकोणापासीं ॥ अभ्यासिलीविद्याठेवीमानसीं ॥ स्फीतीभेणें ॥५४॥

प्रपंचविषंईकृपणफार ॥ सदगुरुचेंठाईअत्यंतउदार ॥ असोनियापरमचतुर ॥ होयवेडा ॥५५॥

सदगुरुपासीचालेहळुवार ॥ जोनपाहेदृष्टिकरुनिक्रूर ॥ सद्गुरुदेखतांबोलेमधुर ॥ सुधावाक्य ॥५६॥

शरीरवाचामनेंकरुन ॥ सदगुरुघरीविक्षेपनकरणें ॥ ऐसादृढसंकल्पधरोनिजाण ॥ वर्ततसे ॥५७॥

नानाउपद्रवप्राप्तहोती ॥ तरीउचंबळेनाज्याचीवृत्ति ॥ लाभालाभआणिनिंदांस्तुति ॥ मानीसम ॥५८॥

गंभीरसमुद्राचियापरी ॥ बरेंवाईटठेवीअंतरीं ॥ असेऐसाक्षमेनेंनिर्धारी ॥ सद्रुरुपाशीं ॥५९॥

सकलासीअत्यंतप्रीयमाण ॥ नाहींआपपरअनुसंधान ॥ सद्गुरुपाशींनिष्कपटपणें ॥ रहाटेसदां ॥६०॥

ज्यालासदगुरुभक्तीचाड ॥ आणिककांहींनलागेगोड ॥ सदगुरुविषईंचेंकोड ॥ असेजया ॥६१॥

सदगुरुसंनिधमळिनपणें ॥ सर्वथाराहेनाजोआपण ॥ सर्वदांशुचिर्भूतपूर्ण ॥ बाह्यांतरीं ॥६२॥

नानाव्यवहारीदेहवर्ततां ॥ अनेकविक्षेपहिप्राप्तहोतां ॥ परीसद्गुरुपासूनियाचित्ता ॥ चळनोहे ॥६३॥

सर्वैद्रियेंनानापरी ॥ विषयांपासूनजोआवरी ॥ सर्वदांलावीबरव्यापरी ॥ सद्गुरुभजनीं ॥६४॥

जैसेंविषआणिवमिलेंअन्न ॥ तैसेविषयमानीसद्गुरुविण ॥ संसारापासूनियाउदासीन ॥ सहजची ॥६५॥

मीसद्गुरुचेंकरितोंभजन ॥ माझेनिसद्गुरुनिश्विंतपूर्ण ॥ ऐसाकांहींचनाहींअभिमान ॥ जयालागीं ॥६६॥

जन्ममृत्युजरा व्याधिदुःखदोष ॥ तेणेंपरमपावलोंमील्लेश ॥ ऐसावारंवारस्मरोनिनिःशेष ॥ सद्गुरुलाभजे ॥६७॥

कांतापुत्रगृहमित्रादिसर्वही ॥ जेथेंअणुमात्रज्याचीआस्थांनाहीं ॥ सद्गुरुविरहितज्यालाकांहीं ॥ गोडनवाटे ॥६८॥

सुखदुःखेंप्राप्तहोतांबहुत ॥ परीतेथेंजयाचेंसमचित ॥ सद्गुरुभजनीलागलाहेत ॥ तोपालटेना ॥६९॥

सद्गुरुविणप्रियकांहींनमानी ॥ कायावाचामनेंविनटेभजनीं ॥ येकदेवहाचिनिश्चयमनीं ॥ जयाचिया ॥७०॥

तीर्थैदेवस्थलेंगिरितपोवनें ॥ त्याहूनिविशेषसद्गुरुसदन ॥ ऐसेंमानूनिराहेनिशिदिन ॥ तयेठाई ॥७१॥

सद्गुरुब्रह्मसच्चिदानंदघन ॥ तयाचेंजोडल्याअखंडदर्शन ॥ हेंचनिश्चयेंसिआहेआत्मज्ञान ॥ ऐसेंमानी ॥७२॥

सद्गुरुजीवंतअसतांजाण ॥ तयाचेंपाळितसेवचन ॥ समाधिरस्थाजालियापिंडदान ॥ गयेसकरी ॥७३॥

नित्यतर्पणींगुरुनामउच्चारी ॥ प्रतिवर्षीश्राद्धबरेंकरी ॥ धरोनियासद्भावअंतरीं ॥ ऐसावर्ते ॥७४॥

समाधीचेठाईरचीवृंदावन ॥ लावीअश्वत्थादिनानावृक्षजाण ॥ स्थलदेखोनिपावेविश्रांतिमन ॥ साधुसंतांचें ॥७५॥

गुरुवारींसाधुसंतपाचारी ॥ गुरुनामेंत्यांचेंपूजनकरी ॥ क्षीरापतीवाटीघरोघरीं ॥ सकलांसी ॥७६॥

गुरुपुत्रअथवासच्छिष्यकोणी ॥ त्यासीसद्गुरुचापटदेऊनी ॥ परोपकारार्थरक्षितसेजनी ॥ सांप्रदाय ॥७७॥

जेठाईपूर्णभक्तिऐसी ॥ स्त्रीशूद्रादिअसोनिश्वयेंसी ॥ तेजाणब्रह्मज्ञानासी ॥ अधिकारीहोती ॥७८॥

ऐसागुरुभक्तजगींधन्यधन्य ॥ ब्रह्मादिकदेवांसिहीजोमान्य ॥ अखंडब्रह्मानंदेंतृप्तपूर्ण ॥ जीताचिमुक्त ॥७९॥

संपलेंषष्ठप्रकरण ॥ जेथेंगुरुभक्तिनिरुपण ॥ बोलिलागोसावीनंदन ॥ यथामतीं ॥८०॥

इतिश्रीज्ञानमोदकग्रंथेगणेशगोसावीनंदनसंवादे ॥ गुरुभक्तिनिरुपणंनामषष्ठप्रकरणंसमाप्तमभूत् ॥ श्रीसच्चिदानंदार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 28, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP