श्रीगणेशायनमः
मंगलमूर्तिगणेश्वरु ॥ गोपालाश्रमरुपीसद्गुरु ॥ म्हणेशिष्यलक्षणाचेंकरुं ॥ निरुपण ॥१॥
एकशिष्यप्रपंचींरात्रंदिवस ॥ रखडतांनमनीकदांत्रास ॥ सद्गुरुसेवनींकरीआळस ॥ तिकामानये ॥२॥
एकसंसारीआसक्तनिरंतर ॥ ज्यालास्त्रीपुत्राचालोभफार ॥ सद्गुरुविषईअत्यंतनिष्ठुर ॥ तोकामानये ॥३॥
एकवरीभक्तिदावी ॥ अंतरींकपटमहालाघवी ॥ सद्गुरुलामनुष्यापरीभावी ॥ तोकामानये ॥४॥
एकशिष्यघेऊनिउपदेश ॥ कांहींलाभजाल्यामानीसंतोष ॥ अलाभेंसद्गुरुलाठेवीदोष ॥ तोकामानये ॥५॥
एकशिकूनिमांडीपसारा ॥ तोशिष्यविद्याचोरजाणावाखरा ॥ सद्गुरुदेखतांधरीफुगारा ॥ तोका० ॥६॥
एकएकांतींचरणींडोईठेवी ॥ आणिसभेंतलाजेअंगचुकवी ॥ सद्गुरुपाशींप्रतिष्ठामीरवी ॥ तोका० ॥७॥
एकम्हणेआधींचमत्कारदाखवा ॥ मगतुमचीकरीनमीसेवा ॥ संतांपांईविश्वासनाहींबरवा ॥ तोका० ॥८॥
एकसद्गुरुलापुसिलेंचिपुसे ॥ नसांगतांक्रोधासयेतसे ॥ ज्यापाशींकांहीमर्यादानसे ॥ तोकामानये ॥९॥
एकशिकूनिपाखांडनानाकूटें ॥ याचाअर्थसांगाम्हणेहटें ॥ सद्गुरुचीछलनाकरीकपटें ॥ तोकामान० ॥१०॥
एकासीहाचिमोठमान ॥ जैसेंम्हणेतैसेंकीजेसद्गुरुनें ॥ ऐसाअत्यंतदुराग्रहीजाण ॥ तोका० ॥११॥
एकशिष्यसंसारीद्रव्यखर्चितां ॥ जोमागेंपुढेंपाहेनातत्त्वतां ॥ सद्गुरुचेठाईंधरीकृपणता ॥ तोका० ॥१२॥
एकह्नणेआह्मासीद्याभांडवल ॥ उदिमकरुनिपोसूंसकळ ॥ ऐसाकुटुंबकाबाडीकेवळ ॥ तोकामानये ॥१३॥
एकसद्गुरुवचनासीअव्हेरी ॥ जैसेंमनांतआलेंतैसेंचकरी ॥ ऐसाजोकेवळअहंकारी ॥ तोकामानये ॥१४॥
एकम्हणेसद्गुरुचीसेवाकेली ॥ परंतुआम्हासनाहींफळली ॥ ऐसीलोकांमध्येंकरीवाचाळी ॥ तोकामानये ॥१५॥
एकसर्वस्वींगौरवीइष्टमित्र ॥ सद्गुरुलावाहेतुलशीपत्र ॥ ज्याचाभावमैंदाच्यापरीविचित्र ॥ तोकामानये ॥१६॥
एकस्वधर्मनकरीसांगितला ॥ दाटूनिप्रवर्तेकुकर्माला ॥ मगबोललावीसद्गुरुला ॥ तोकामानये ॥१७॥
एकलज्जेनेंऐकेनिरुपण ॥ जेव्हांबैसेतेव्हांदुश्चितमन ॥ म्हणेकेव्हांसरेलघराजाईन ॥ तोका० ॥१८॥
एकम्हणेआह्मालागलासंसार ॥ तैसाचिसंतांसहीसोडीनाघोर ॥ ऐसेपाहेगुणदोषनिरंतर ॥ तोकामानये ॥१९॥
एकवृथापुष्टकेवलटोणपा ॥ तोंडींलागेबाबरदडपा ॥ कांहींकार्यसांगतांचढेकोपा ॥ तो० ॥२०॥
एकबोलेअखाडावाढवावयाला दाटूनिउपदेशदिधला ॥ म्हणेतधींच आह्मींटाकिला ॥ तोकामानये ॥२१॥
एकऐकेअध्यात्मचर्चेसी ॥ घराजाऊ निमारीस्त्रियेसी ॥ सद्गुरुचीफजीतीकरीऐसी ॥ तो० ॥२२॥
एकह्नणेदर्शनामध्येंकाय ॥ मनींध्यातोंसद्गुरुचेपाय ॥ कांहीकेल्याजवळउभानठाय ॥ तोकामानये ॥२३॥
एकउपदेशमात्रघेऊनि ॥ पुन्हांसद्गुरुलानपाहेनयनीं ॥ केवळअधमअधमाहूनि ॥ तोका० ॥२४॥
एकसांगेआह्मीशिष्यपुरातन ॥ आतांमेळविलेबहुतनूतन ॥ म्हणेकोण्हीआमुचारक्षीनामान ॥ तोका० ॥२५॥
येकसर्वदांअत्यंतमलीन ॥ नकरीशौचस्त्रानसंध्याआपण ॥ जेणेंलोकनिंदितीतैसेंवर्तन ॥ तोकामनये० ॥२६॥
येकम्हणेसांगाउपासना ॥ जेणेंपूर्णहोयसर्वकामना ॥ ज्यासीमोक्षाचीनाहींवासना ॥ तोका० ॥२७॥
एकम्हणेआम्हींगुरुकेलाहोता ॥ त्याचेंज्ञाननयेचिआमुच्याचित्ता ॥ म्हणेतुम्हीतरीकांहींसांगाआतां ॥ तोकामानये० ॥२८॥
एकम्हणेआम्हीसर्वातसमर्थ ॥ सद्गुरुलादेतोंउदंडअर्थ ॥ बोलेवरकडशिष्यतेव्यर्थ ॥ तोका० ॥२९॥
जारणमारणमोहन ॥ वश्यउच्चाटनस्तंभन ॥ याचामार्गसांगाम्हणेआपण ॥ तोकामानये० ॥३०॥
एकसांगेमजसारिखासाधक ॥ सद्गुरुपशींनाहींआणिक ॥ म्हणेम्यांअखाडाकेलासकलिक ॥ तोका० ॥३१॥
येकघटिकाभरीभक्तिकरी ॥ सवेंचिसद्गुरुवरीगुरुगुरी ॥ रडेपडेपिशाचछंदकरी ॥ तोकामानये० ॥३२॥
एकदीर्घद्वेषीघातकनिर्दय ॥ ज्यासकांहींपापाचेंनाहींभय ॥ कुतर्कीअविवेकीबोलेअप्रिय ॥ तोका० ॥३३॥
येकदेहाभिमानेंपडिलाघोरीं ॥ अखंडकुटुंबाचीचिंताकरी ॥ निद्रानलागेतळमळअंतरी ॥ तोकामानये० ॥३४॥
एकनधरीविषयकंटाळा ॥ नसेभक्तीचापूर्णजिव्हाळा ॥ अज्ञानेंजालाअसेआंधळा ॥ तो० ॥३५॥
एकम्हणेअन्नकोठेंमिळेना ॥ आमच्यानेंउद्योगहोईना ॥ सद्गुरुघरींकरुंकालक्रमणा ॥ तोका० ॥३६॥
एकसद्गुरुपाशींअसत्यबोले ॥ जोनीतीनेंसर्वथानचाले ॥ ज्यालासारासारकांहींनकळे ॥ तोकामानये० ॥३७॥
एकगोडबोलेमुखावरी ॥ मागेंसद्गुरुचीनिंदाकरी ॥ दुष्टचांडालजोनिर्धारीं ॥ तो० ॥३८॥
एकविषयासाठींयत्नकरी ॥ परमार्थटाकीप्रारब्धावरी ॥ कपाळींनाहींनिर्धारी ॥ तोकामानये ॥३९॥
एकगोष्टीनेंगौरवीनानापरी ॥ कधींसप्रेमेंपूजननकरी ॥ सद्गुरुचेंउच्छिष्टनपडेघरीं ॥ तोका० ॥४०॥
एकासीनाहींप्रपंचघोर ॥ रिकामाफिरेनकरीविचार ॥ जोसारीपाटखेळेनिरंतर ॥ तोकामानये ॥४१॥
एकबैसूनियासद्गुरुपाशीं ॥ काढीविनोदव्यवहारचर्चेसी ॥ आपुलेंहितविचारीनामानसीं ॥ तोका० ॥४२॥
वियोगकरुनिसदगुरुचा ॥ संगकरीदुष्टव्यवहारिकांचा ॥ चाकाट्यापिटितांश्रमेनावाचा ॥ तोका० ॥४३॥
ठेऊनियाविष्टेपासींचित्त ॥ कावळाबैसेराजहंसांत ॥ मुक्ताफळचारादेखोनिबहुत ॥ त्रासमानी ॥४४॥
ज्यासीअत्यंतप्रियविषय ॥ तोसंतांपासीबैसोनिकाय ॥ ज्ञानउपदेशकरावयाजाय ॥ तयेठाई ॥४५॥
जोभाग्यवंताच्यापोटाआला ॥ दाटूनिभीकमागावयाचालिला ॥ तैसाशिष्यजालातर्हीसद्गुरुला ॥ बोलकाय ॥४६॥
श्वानासीघातलेंक्षिप्राभोजन ॥ गाढवाअंगींचार्चिलाचंदन ॥ मर्कटासीरत्नसिंहासन ॥ व्यर्थहोय ॥४७॥
तैसाजोविषईआसक्तकेवळ ॥ त्यालाज्ञानउपदेशनिर्फळ ॥ खडकींबीजपेरिल्यापुष्कळ ॥ तेंवायांजाय ॥४८॥
उत्तमवीजखडकींपेरिलें ॥ कांहींपीकहोईनावायांगेलें ॥ तैसेंमूर्खासीज्ञानसांगितलें ॥ उपतिष्ठेना ॥४९॥
सच्छिष्यउत्तमभूमिकाजे ॥ तेथेंउत्तमज्ञानबीजपेरिजे ॥ मंत्रतंत्रादिकिडेलेंनपाहिजे ॥ तयेठायीं ॥५०॥
सुभूमिसच्छिष्यज्ञानसुकण ॥ तेथेंपर्जन्यतोवेदांतश्रवण ॥ मगजीवन्मुक्तिसुखसंपूर्ण ॥ पीकहोय ॥५१॥
पिकहातासीयेईजोंवरी ॥ साधनकरावेंतोंवरी ॥ हेचिनिगाजाणावीनिर्धारी ॥ सोडूंनये ॥५२॥
म्हणऊनिगोसावीनंदनाजाण ॥ अधिकारीअसावासुलक्षण ॥ जोमुमुक्षुसाधनसंपन्न ॥ तोचिसच्छिष्य ॥५३॥
नसांगतांभक्तिकरीतोउत्तम ॥ सांगितल्यावरीकरीतोमध्यम ॥ सांगितल्याहीनकरीअधम ॥ कनिष्ठतो ॥५४॥
सर्वस्वेंशरणसद्गुरुचरणां ॥ चित्तींनाहींअणिककामना ॥ रात्रंदिवसजोविसंबेना ॥ तोचि० ॥५५॥
झणिसद्गुरुरुलाहोईलविक्षेप ॥ याजहूनिनसेआणिकपाप ॥ असेंअंतरींवाहेभयअमुप ॥ तोचिसच्छिष्य ॥५६॥
ज्यालानित्यघडेसद्गुरुसेवन ॥ सदगुरुचामहोत्सावकरणें ॥ सद्गुरुसाठींशरीरकष्टविणें ॥ तोचिसच्छिष्य ॥५७॥
जोकरीसदगुरुचीउपासना ॥ सगुणसदगुरुचीमूर्तिआणिध्यानां ॥ सद्गुरुविणकांहींआवडेना ॥ तोचि० ॥५८॥
नानाविद्यासाधनेंमानीअसार ॥ म्हणेयेकगुरुचीभक्तिसार ॥ ऐसाज्यापाशींसारासारविचार ॥ तोचिस० ॥५९॥
येथिलसंपदास्वर्गीचेंवैभव ॥ यादोन्हीचेंजोकदांघेईनानांव ॥ म्हणेसदगुरुविणसर्ववाव ॥ तोचि० ॥६०॥
सदगुरुचाछंदज्याचियेमना ॥ इंद्रियेंलागलींसदगुरुभजनां ॥ तेथूनिकदांमागुतीफिरविना ॥ तोचि० ॥६१॥
जींशीतोष्णादिकदुःखेंअनेक ॥ तींस्वयेंसोसूनियासकलिक ॥ सदगुरुचीसेवाकरीआवश्यक ॥ तोचि० ॥६२॥
जोसदगुरुचरणींविनटला ॥ संसारभानविसरुनिगेला ॥ तेणेंपूर्णसमाधानपावला ॥ तोचिसच्छिष्य ॥६३॥
ज्याससदगुरुवचनींविश्वास ॥ अन्यश्रवणींसहजउदास ॥ ऐसाभक्तीचाजेथेंनिवास ॥ तोचिसच्छिष्य ॥६४॥
अखंडजोडूंसदगुरुचेपाय ॥ ज्यापुढेंमोक्षसुखतेंकाय ॥ ऐसीइच्छापूर्णजयाहोय ॥ तोचि० ॥६५॥
जोमिरविनाआपुलीश्लाघ्यता ॥ विरोनजायस्तवनकरितां ॥ मानीमिथ्यालाभक्तीर्तिमान्यता ॥ तोचिसच्छिष्य ॥६६॥
सर्वथाकोणासीदुःखदेईना ॥ जोक्षमावंतविकारपावेना ॥ अत्यंतप्रियवाटेसर्वजनां ॥ तोचिस० ॥६७॥
कदांनुलंघीसदगुरुचीमर्यादा ॥ स्नेहेंपोषकरीतसेसदां ॥ अर्पीसकलसंपदा ॥ तोचिसाच्छिष्य ॥६८॥
मातापितातीर्थकुलदैवत ॥ योगयागदानेंअनुष्ठानव्रत ॥ हेंकांहींचनेणेसद्गुरुरहित ॥ तोचि० ॥६९॥
जोबाह्यांतरींअसेनिर्मला ॥ परमार्थसाधनींअचल ॥ इंद्रियेंनकरीबाष्कल ॥ तोचि० ॥७०॥
जोदोषदृष्टीनेंपाहेविषयांसी ॥ कांहीअहंकारनाहींजयापासी ॥ स्मरेजन्ममृत्युजरादिदुखांसीतोचि० ॥७१॥
स्त्रीपुत्रादिकअसेलकल ॥ त्यांच्यासुखदुःखारहितकेवल ॥ इष्टानिष्टप्राप्तिनेंनव्हेविव्हल ॥ तोचि० ॥७२॥
जोभजलाचिभजेभगवंतीं ॥ नानाविघ्नेंयेतांपालटेनावृत्ती ॥ परमयेकनिष्ठाधरीचित्तीं ॥ तोचिस० ॥७३॥
स्थलपवित्रगंगातीरवन ॥ जेथेंदेवस्थानेंसाधुसज्जन ॥ तेथेंवासकरितसेनिशिदिन ॥ तोचि० ॥७४॥
देहेंद्रियाहूनिआत्माविलक्षण ॥ तयासीविवेकेंनिवडीआपण ॥ साधीआपरोक्षसाक्षात्कारपूर्ण ॥ तोचि० ॥७५॥
निरसीअविद्यातत्कार्यदुःखांसी ॥ मगपावेपूर्णब्रह्मानंदासी ॥ ऐशींज्ञानाचींसाधनेंजयापाशीं ॥ तोचि० ॥७६॥
निःशेषमिथ्याचितग्रंथिसुटे ॥ संचितप्रारब्धक्रियमाणआटे ॥ जयाचासकलसंशयफिटे ॥ तोचिसच्छिष्य ॥७७॥
ऐसाज्ञानयोगासीजोपावेस्वयें ॥ जिताचिमुक्तहोऊनिठाये ॥ जेथेंसदगुरुबोधफळेनिश्चयें ॥ तोचि० ॥७८॥
तुजलातिसर्याप्रकरणींजाण ॥ सांगितलेंअधिकारियाचेंलक्षण ॥ तेहेंदेखसीलज्यापाशीचिन्ह ॥ तोचिस० ॥७९॥
सात्त्विकप्रेमळविरक्तजगीं ॥ तोचिएकज्ञानउपदेशालागीं ॥ होयपरमार्थभाग्याचाविभागी ॥ अनायासें ॥८०॥
सर्वत्रकरणेंजलवर्षाव ॥ हासहजमेघाचाअसेस्वभाव ॥ परीउदकजेथेंखोलठाव ॥ तेथेंचिथांब ए ॥८१॥
तैसासदगुरुसर्वासीसांगेज्ञान ॥ तेंसच्छिष्याठाईउपतिष्ठेजाण ॥ नाहींतरीअधिकारियाविण ॥ वायांजाण ॥८२॥
जोभ्रष्टजालाशिष्यसदगुरुचा ॥ त्यासवाटानाहींज्ञानघनाचा ॥ तोचशुद्धजालियातयाचा ॥ विभागीहोय ॥८३॥
आणिसच्छिष्यजेअसती ॥ भावेंसद्गुरुलाशरणयेती ॥ तेहिहळूहळूज्ञानपावती ॥ क्रमेंकरुन ॥८४॥
पाहूनियांजैसाजीअधिकारी ॥ सदगुरुतैसाचउपदेशकरी ॥ तारीजडमूढभवसागरीं ॥ नानायुक्तीनें ॥८५॥
ऐसासदगुरुमहिमाअपार ॥ जाणोनिसच्छिष्यस्मरेउपकार ॥ विशेषभक्तीकरीनिरंतर ॥ तेंहीसांगेन ॥८६॥
श्रीगोपालोआश्रमरुपीगजानन ॥ ऐसेंबोलिलासदगुरुदयाघन ॥ तेणेंपावलागोसावीनंदन ॥ समाधान ॥८७॥
संपलेंपंचमप्रकरण ॥ जेथेंशिष्यलक्षणनिरुपण ॥ तोंचिबोलिलागोसावीनंदन ॥ यथामतीं ॥८८॥
इतिश्रीज्ञानामोदकग्रंथेगणेशागोसावीनंदनसंवादेशिष्यलक्षणनिरुपणंनामपंचमप्रकरणंसमाप्तम् ॥ ॥ ॥