श्रीरामायनमः
॥ जोसर्वातीतसर्वप्रकाशक ॥ गोपालाश्रमरुपीगणनायक ॥ म्हणेगोसावीनंदनाआईक ॥ सावधानें ॥१॥
अध्यारोपआणिअपवादजाण ॥ त्याचेंकीजेलआतांनिरुपणा ॥ ज्याबोधेंमिथ्यासंसारबंधन ॥ दूरीहोय ॥२॥
आधींसांगतोंतुजअध्यारोप ॥ वस्तूचेठाईंअवस्तूचाआरोप ॥ हेंचिजाणकेवलतयाचेंरुप ॥ निश्चयेंसी ॥३॥
वस्तुम्हणिजेसच्चिदानंदघन ॥ नित्यशुद्धबुद्धमुक्तनिर्गुण ॥ निर्विकारअद्वैतचैतन्यपूर्ण ॥ परब्रह्म ॥४॥
अवस्तुम्हणजेअज्ञानादिक ॥ जडदृश्यमिथ्यानामरुपात्मक ॥ व्यष्टिसमष्टिरुपसकलिक ॥ समुदाय ॥५॥
जैसासर्परज्जूचाविवर्त ॥ तैसेंब्रह्मीसर्वमायिकनिश्चित ॥ जाणविवर्ताचेंहीरुपव्यक्त ॥ तैसेंअसे ॥६॥
शुद्धचैतन्याच्याठाईंकेवल ॥ भासेअन्यथारौप्यविश्वसकल ॥ यासीभिन्नतानसोनिनिखल ॥ चैतन्याविण ॥७॥
याजलाचिम्हणावेंविवर्त ॥ नसताब्रह्मींआरोपभासत ॥ जेवींशुक्तीचेठाईरजत ॥ निलिमाव्योमीं ॥८॥
मिथ्याजडदृश्यदेहेंद्रियवृत्ती ॥ सर्वपदार्थअचेतनअसती ॥ आपुल्याव्यापारींप्रवर्तती ॥ जयाचेसत्तेनें ॥९॥
ऐसेंचैतन्यब्रह्मअधिष्ठान ॥ जेंसकलवृत्तीचेंकारण ॥ म्हणऊनिसर्वीसर्वपणें ॥ तेंचियेक ॥१०॥
सकलअचेतनातेंआवरी ॥ असेमिथ्यासंबंधेनिर्विकारी ॥ स्वसत्तास्फूर्तीनेबाह्यांतरीं ॥ व्यापूनिया ॥११॥
ब्रह्मीजडप्रपंचजिओअध्यस्थ ॥ त्याचेगुणदोषासीनाहीलिंपत ॥ जरीअबिन्नअसोनिसर्वगत ॥ निर्विकार ॥१२॥
सत्याचेठाईअसत्याचेंभान ॥ याचनांवेंअध्यारोपणजाण ॥ हाहीअपवादबोधेंकरुन ॥ नाहींसाहोय ॥१३॥
आतांअपवादाचेंसांगूंलक्षण ॥ रज्जुविवर्तसर्परज्जूचिजाण ॥ तैसेंवस्तुविवर्तअवस्तूशींपूर्ण ॥ वस्तुमात्र ॥१४॥
म्हणिजेसर्वप्रपंचाचानिरास ॥ असेकेवलअवघाचिद्विलास ॥ निरुपाधिकब्रह्मस्वप्नकाश ॥ अद्वयत्वें ॥१५॥
जोनिर्विकारनिखिलज्ञानघन ॥ ज्यासीनाहींक्रियाआणिचलन ॥ सर्वैद्रियव्यापारेंप्रतीयमान ॥ जरीअसे ॥१६॥
इंद्रियव्यापारेंभासेचंचल ॥ तरीतेंअसेअक्रियअचल ॥ सर्वातीतसर्वव्यापककेवल ॥ चिन्मयजें ॥१७॥
प्रकाशींसकलहीविश्वकल्पित ॥ मायेंकरुनसर्वातेधरीत ॥ नभास्सेसत्यअधिष्ठानरहित ॥ मिथ्याभ्रम ॥१८॥
जरीसत्ययेकअसेआपण ॥ तरीआपल्याठाईभासेस्वप्न ॥ तैसेंचैतन्यअधिष्ठानाविण ॥ नसेकांहीं ॥१९॥
जैसारज्जूच्याठाईसर्पकल्पित ॥ त्यासीव्यापकपूर्णरज्जुशाश्वत ॥ सर्पअसतांनसतांनिश्चित ॥ रज्जूचिकीं ॥२०॥
रज्जूविणससर्पकोठेंचिनदिसे ॥ तैसेंचैतन्यावेगळेंकांहीनसे ॥ सकलविश्वाच्याबाह्यांतरींअसे ॥ व्यापूनिया ॥२१॥
जेंमिथ्यारोपितचराचर ॥ तेंसर्वहीब्रह्मचियेकसार ॥ सुवर्णतेंनानाअलंकार ॥ तैसेंअसे ॥२२॥
मृत्तिकाचिघटादिसकल ॥ आणिपटतोतंतूचिनिखिल ॥ जाणशुक्तिकाचिरजतकेवल ॥ जलचिवीचि ॥२३॥
तैसेंजेंजेंकांहींभासेकल्पित ॥ तेंअधिष्ठानब्रह्मयेकचिसत्य ॥ ऐसेंसर्वात्मकब्रह्मअखंडित ॥ तेतूंजाण ॥२४॥
हाबोधठसावतांकैंचाभेद ॥ केवळअद्वैतसच्चिदानंद ॥ याजलाचिबोलिजेअपवाद ॥ वेदांतमतें ॥२५॥
दृढव्हावयानिरुपण ॥ आतांसांगिजेलपंचीकारण ॥ गोपालाश्रमरुपीगजानन ॥ म्हणेऐसा ॥२६॥
येथेंसंपलेंअष्टमप्रकरण ॥ जेथेंअध्यारोपापवादलक्षण ॥ तेंचिबोलिलागोसावीनंदन ॥ यथामतीं ॥२७॥
इतिश्रीज्ञानमोदकग्रंथेगणेशगोसावीनंदनसंवादे ॥ अध्यारोपपवादनिरुपणंनामअष्टमप्रकरणं ॥ श्रीरस्तु ॥