मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|चतुःश्लोकी भागवत| कथासूत्र चतुःश्लोकी भागवत सदगुरुवंदन गुरुमहिमा गुरुदास्याचें महिमान आत्मनिवेदन कथासूत्र ब्रह्मदेवाची कथा ज्ञानप्राप्ति भगवत्प्राप्ति सृष्टिरचना भगवंताचा धांवा हरिकृपा चित्तशुद्धी अनुतापयुक्त ब्रह्मदेव तपाचें महिमान तप याचा अर्थ तप म्हणजे काय तप आरंभिलें आत्मज्ञान वैकुंठमहिमा वैकुंठ स्थिति हरिभक्तांचे स्वरुप पतिव्रतांचें निवासस्थान हरिगुणसंकीर्तन श्रीविष्णूची स्तुति पार्षदगण सृष्टीची निर्मिती नारायणाला नमन ब्रह्मदेवाला वर तपस्सामर्थ्य ज्ञानाची व्याख्या आत्मज्ञान माया छाया माया छाया व माया मायेचा निरास ग्रंथाची स्तुति माझी प्राप्ति व्यतिरेकाचें लक्षण मताचें सामर्थ्य समाधि अहंकारशून्य गुरुचें लक्षण चार श्लोक सृष्टिपूर्व गुह्यज्ञान जनार्दनकृपा प्रजापति नारद भागवताची दहा लक्षणें भागवताची दहा लक्षणें ब्रह्मज्ञानी गुरुकृपा नारदाचें दर्शन शुकयोगींद्र ब्राह्मणाचें सामर्थ्य राजा परीक्षित संताकडे क्षमायाचना भागवत सार चतुःश्लोकी भागवत - कथासूत्र मराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत. Tags : bhagavatekanathasantएकनाथभागवतसंत श्रोत्यांना विनंती व कथासूत्र Translation - भाषांतर आतां अवधारा ग्रंथकथन । कल्पादि हें पुरातन । हरिब्रह्मयांचें जुनाट ज्ञान । तेथें अवधान श्रोतीं द्यावें ॥२५॥ जेणें संतोषती ज्ञानसंपन्न । सुखें सुखरुप होती मुमुक्षुजन । तें हें हरिब्रह्मयांचें ज्ञान । तेथें अवधान श्रोतीं द्यावें ॥२६॥ जो जडमूढ होता तटस्थ । तो चौश्लोकीं जाण नेमस्त । ब्रह्मा केला ज्ञानसमर्थ । तो अगाध ज्ञानार्थं अवधारा ॥२७॥ पावोनि चतुः श्लोकीचें ज्ञान । ब्रह्मा झाला ज्ञानसंपन्न । करितां सृष्टीचें सर्जन । तिळभरी अभिमान बाधीना ॥२८॥ त्या ज्ञानाची रसाळ कथा । मर्हाटीया सांगेन आतां । येथें अवधान द्यावें श्रोतां । हे विनवणी संतां सलगीची ॥२९॥ पूर्ण सलगी दिधली स्वामी । ह्नणोनि निः शंक झालों आह्मी । परी जें जें बोलेन ज्ञानांग मी । तें सादर तुह्मी परिसावें ॥३०॥ ऐसे प्रार्थुनी श्रोतेजन । प्रसन्न केले साधुसज्जन । पुढील कथेचें अनुसंधान । एका जनार्दन सांगेल ॥३१॥ N/A References : N/A Last Updated : September 19, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP