|
वि. चोर ; लबाड ; ठक . चटके गांवगुंड गारडी । येक आणिती कावडो । - दावि ४७४ . [ चट्ट करणारा ] पु. चाळा . चालेल जागता चटका । हा असाच घटकाघटका । - पाळणेसंग्रह पृ . १७ . [ घ्व . चटक ] पु. ( विणकाम ) सुताची , तारेची गोल गुंडाळी , लड . पु. १ दाह ; भाजणारी उष्णता ; तलखाई ; प्रखरता ; ( सूर्य , अग्नि किंवा तापलेला पदार्थ यांपासून उत्पन्न होणारी ); ताप . २ ऊन किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यानें घशाशीं होणारी आग ; अशी आग होण्याचा गुणधर्म . ( क्रि० लागणें ). ३ पोळल्यामुळें किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यामुळें होणार्या तात्कालिक वेदना , दु : खावेग . ( क्रि० बसणें ). ४ पोळल्यामुळें पडलेला डाग , जखम . ५ अंत : करणाला होणार्या वेदना ; मनस्ताप ; आधि ; चरका ; संताप ; मानसिक यातना ; चुटपूट ; रुखरुख . ( क्रि० बसणें , लागणें ). मी सोडुनि आलों तटका । तो जिवा लागला चटका । - मघ्व २२२० . ६ व्यंगोक्ति ; औपरोधिक मर्मभेदी भाषण ; प्रतिक्षेप ; टोमणा , टोला ; जिव्हारी लागणारी व झोंबण्यासारखी टीका . ( क्रि० मारणें ). ७ काळजी ; चिंता ; आस्था ; कळकळ ; पर्वा ; दरकार . मनासि चटका म्हणुनी तव पदीं लगबग येत बालिका । - स्वयंवर नाटक . ८ विरह ; दु : ख ; हुरहुर ; एखादी वस्तु परत मिळण्याविषयीं लागलेली उत्कंठा ; चटक ; चुटपुट ; ध्यास ; छंद ; तहान . ( क्रि० लागणें ; लावणें ; बसणें ). च च चटका लागतां पावसी पद उंच । - दावि २१३ . लोभ हरीचा लटका ... लावुनि गेला चटका . तो माळी दादव्या केला । तो विहिरींत पडून मेला । त्याचें कांहीं वाटत नाहीं मला । सख्याचा चटका लागुनि गेला । ९ सांडसानें दिलेला डाग ; चरका . ( क्रि० देणें ; लावणें ). बसतेचि चटके लावीत । शुध्दावरि मूर्खत्वें । १० मोरचूत वगैरे लावून सोनें अग्नींत तापविणें . ( क्रि० देणें ). ११ ( जहल्लक्षणेनें ) या कृत्यास लागणारी साधनसामुग्री , द्रव्यसाहित्य , साधनीभूत पदार्थाचा संच . १२ व्यापारांत ठोकर , तोटा , थप्पड , अद्दल . ( क्रि० बसणें ; लागणें ). जामीनकी विषयीं मला असा चटका बसला आहे कीं पुन्हां जन्मांत कोणास जामीन राहूं नये . १३ मिर्याचें तिखट ; तिखट चटणी ; विशेषत : हरभर्याची डाळ वाटून दहीं व ओल्या मिरच्या घालून करतात तो १४ ( कों . ) खमंग काकडी . १५ ( राहिलेल्या अर्थांसाठीं ) चटक , चरका पहा . [ सं . चट = जखम करणें ; म . चाटणें , झाजरणें , घसटून जाणें ] म्ह० ( व . चटकामटका तोंडाला फाटके कपडे चालतात अशा माणसाला म्हणतात .
|