|
स्त्री. १ जीभ ; रसनेंद्रिय . जगामध्यें जगमित्र। जिव्हेपासीं आहे सूत्र । - दा १९ . २ . १९ . २ ( ल . ) अग्नीची ज्वाळा . ३ जिभेच्या आकाराची वस्तु . [ सं . जिह्वा ] ( वाप्र . ) वाप्र . जिव्हेस टाचा देणें . १ न खाणें . २ इंद्रियदमन करणेम . ३ न बोलणें . ०खाणें रागानें , त्वेषानें जीभ चावणें . ०वांकडी १ गैरसावधपणानें बोलणें . २ अर्धांगवायूनें जीभ लटकी पडणें . पडणें १ गैरसावधपणानें बोलणें . २ अर्धांगवायूनें जीभ लटकी पडणें . ०विटाळणें १ जिव्हेचें रसज्ञान नष्ट करणें . ३ नालायक , वाईट मनुष्याची एखाद्याला शिफारस करणें , मध्यस्थी करणें . ०हातीं १ फार शिवीगाळ करणें . २ अतिशय बरळणें . ३ अधाशीपणानें खाणें . जिव्हेला आढावेढा असणें - बोलण्याची मनाई , आडकाठी असणें ; बोलण्याला आडपडदा असणें ; इतर वाकप्रचारासाठीं जीभ पहा . सामाशब्द - जिव्हाग्र - न . १ जिव्हेचा शेंडा , टोंक . २ ( चुकीनें ) जिव्हार . ती काठी त्याचे जिव्हाग्रीं आहे . जिव्हाछेद - पु . जीभ कापणें . ( खरेपणा सिध्द करण्यासाठीं योजितात ). धरणें १ फार शिवीगाळ करणें . २ अतिशय बरळणें . ३ अधाशीपणानें खाणें . जिव्हेला आढावेढा असणें - बोलण्याची मनाई , आडकाठी असणें ; बोलण्याला आडपडदा असणें ; इतर वाकप्रचारासाठीं जीभ पहा . सामाशब्द - जिव्हाग्र - न . १ जिव्हेचा शेंडा , टोंक . २ ( चुकीनें ) जिव्हार . ती काठी त्याचे जिव्हाग्रीं आहे . जिव्हाछेद - पु . जीभ कापणें . ( खरेपणा सिध्द करण्यासाठीं योजितात ). ०दंश पु. ( जिभेला झोंबणारें , चटका बसणारें ) तोंडीलावणें . आणि राखेहूनि कोरडे । आंत बाहेरी येके पाडें । तो जिव्हादंशु आवडे । बहुतया । - ज्ञा १७ . १४४ . [ सं . ] ०दोष पु. १ भाषणांतील दोष . २ जिभेंतील दोष ; अडखळणें . ०मूलीय वि. क , ख वर्णोपूर्वीचा विसर्गोच्चार . याची अर्धविसर्गपूर्वक ककार अशी व्याख्या केली आहे . उदा० अन्त : करण ; दु : ख इ ००रूढ वि. वाटेल तेव्हां पाठ म्हणून दाखवितां येणारा ; जिव्हाग्रीं असणारा ; सदांसिध्द ; अगदीं तयार . ०रोग पु. १ जिभेवरील सूज , फोड . २ ( सामा . ) जिभेला झालेला रोग . ०स्तंभवात पु. जिभेचा अवष्टंम ; जीभ लुली पडणें . जिव्हेचा जड - वि . १ स्पष्ट , पूर्ण शब्दोच्चार करावयास असमर्थ ; बोलण्यांत खोड असणारा . २ अबोल्या ; फार बोलावयास नको असा .
|