|
न. १ ज्याने खातां व बोलता येते तो शरीराचा अवयव ; मुख ; वदन ; तुंड . २ चेहरा ; हनुवटीपासून डोक्यापर्यंत मस्तकाचा दर्शनी भाग . ३ ( सामा . ) ( एखाद्या वस्तूचा ) दर्शनी भाग ; पुढचा - अग्रभाग ; समोरील अंग . या ओझ्याच्या तोंडी मात्र चांगल्या चांगल्या पेंढ्या घातल्या आहेत . ४ ( फोड , गळूं इ० कांचा ) छिद्र पाडावयाजोगा , छिद्रासारखा भाग ; व्रणाचे मुख . ६ ( एखाद्या विषयांत , शास्त्रांत , गांवांत , देशांत , घरांत ) शिरकाव होण्याचा मार्ग ; प्रवेशद्वार . ह्या घराचे तोंड उत्तरेस आहे . ७ ( ल . ) गुरुकिल्ली . उदा० एखाद्या प्रांताचे , देशाचे किल्ला हे तोंड होय . व्याकरण भाषेचे तोंड होय . ८ ( वारा इ० कांची ) दिशा ; बाजू . ९ धैर्य ; दम ; उमेद ; एखादे कार्य करण्याविषयीची न्यायतः योग्यता . १० एखाद्या पदार्थाचे ग्रहण किंवा त्या पदार्थाचा एखाद्या कार्याकडे विनियोग इ० कांचा आरंभ त्या पदार्थाच्या ज्या भागाकडून करितात तो भाग . भाकरीस जिकडून म्हटले तिकडून तोंड आहे . ११ ( युद्ध , वादविवाद इ० कांसारख्या गोष्टींची ) प्रारंभदशा . वादास आतां कुठे तोंड लागले . १२ ( सोनारी धंदा ) हातोड्याच्या सगळ्यांत खालच्या बाजूस अडिश्रीच्या बुडासारखा जो भाग असतो तो . याने ठोकलेला जिन्नस देतांनां तिची टोके जेथे जुळतात तो भाग . १४ . ( बुद्धिबळे ) डाव सुरु करण्याचा प्रकार ; मोहरा . वजीराच्या प्याद्याचे तोंड . [ सं . तुंड ; प्रा . तोंड ] ( वाप्र . ) ०आटोपणे सांभाळणे आवरणे - जपून बोलणे ; बोलण्याला आळा घालणे ; अमर्याद भाषण , अभक्ष्यभक्षण यांपासून निवृत्त होणे . ०आणणे ( आट्यापाट्यांचा खेळ ) शेवटची पाटी खेळून जाऊन पुन्हा एक एक खेळत येणे ; पाणी आणणे ; लोण आणणे . ०आंबट करणे - ( एखाद्याने ) असंतुष्ट , निराशायुक्त मुद्रा धारण करणे . तोंड आहे की तोंबरा खादाड किंवा बडबड्या माणसास उद्देशून वापरावयाचा , किती खातोस किती बोलतोस या अर्थाचा वाक्प्रचार . ०उतरणे ( निराशा , आजार इ० कांनी ) चेहरा म्लान होणे , सुकणे , फिका पडणे , निस्तेज होणे . ०उष्टे - ( अन्नाचा ) एखाद - दुसरा घांस , एक दोन घांस खाणे ; जेवणाचे नुसते नांव करणे . करणे - ( अन्नाचा ) एखाद - दुसरा घांस , एक दोन घांस खाणे ; जेवणाचे नुसते नांव करणे . ०करणे बडबड , वटवट , बकबक करणे ; उद्धटपणाने , निर्लज्जपणाने बोलणे . ०करुन - निर्लज्जपणे , आपला ( लहान ) दर्जा सोडून बोलणे . बोलणे - निर्लज्जपणे , आपला ( लहान ) दर्जा सोडून बोलणे . ०काळे - ( उप . ) एखादा ठपका , तोहमत अंगावर आल्यामुळे निघून , पळून , निसटून जाणे ; हातावर तुरी देणे ; दृष्टीस न पडणे ( केव्हा केव्हा तोंड हा शब्द वगळला तरी चालतो . जसे :- त्यांनी काळे केले . ) करणे - ( उप . ) एखादा ठपका , तोहमत अंगावर आल्यामुळे निघून , पळून , निसटून जाणे ; हातावर तुरी देणे ; दृष्टीस न पडणे ( केव्हा केव्हा तोंड हा शब्द वगळला तरी चालतो . जसे :- त्यांनी काळे केले . ) ०गोड - १ ( एखाद्याला ) लांच देणे ; खूष करणे . २ मेजवानी देणे ; गोड खावयास घालणे . करणे - १ ( एखाद्याला ) लांच देणे ; खूष करणे . २ मेजवानी देणे ; गोड खावयास घालणे . ०गोरेमोरे - ( कोणी रागे भरल्यामुळे , मनास वाईट वाटल्यामुळे ) निराशेची , लाजलेपणाची मुद्रा धारण करणे . करणे - ( कोणी रागे भरल्यामुळे , मनास वाईट वाटल्यामुळे ) निराशेची , लाजलेपणाची मुद्रा धारण करणे . ०घालणे ( दोघे बोलत असतां तिसर्याने ) संबंध नसतां मध्येच बोलणे . ०घेऊन - एखाद्याने एखाद्यावर सोंपविलेले काम न करता त्याने तसेच परत येणे . असे सर्वांनी न करावे . जो मामलेदार असे करुन तोंड घेऊन येईल त्याचे मुखावलोकन न करितां फिरोन सेवा न सांगता त्यास घरीच बसवावे . - मराआ २९ . येणे - एखाद्याने एखाद्यावर सोंपविलेले काम न करता त्याने तसेच परत येणे . असे सर्वांनी न करावे . जो मामलेदार असे करुन तोंड घेऊन येईल त्याचे मुखावलोकन न करितां फिरोन सेवा न सांगता त्यास घरीच बसवावे . - मराआ २९ . ०घेणे १ बोंबलत सुटणे ; ताशेरा झाडणे ; बोंबलपट्टी करणे . २ तोंडातून लाल गळावी म्हणून पारा इ० तोंड आणणारी औषधे घेणे . तोंड देणे पहा . मी वैद्याकडून तोंड घेतले आहे . तोंडचा वि . १ विरुद्ध , उलट दिशेचा ; समोरुन येणारा ( वारा , ऊन , भरती इ० ). २ ज्याची कर्तबगारी केवळ तोंडातच , बोलण्यातच आहे , क्रियेत दिसून येत नाही असा . तोंडचा - शिपाई - कारकून - सुग्रण - खबरदार . ३ तोंडाने सांगितलेला , निवेदन केलेला ; तोंडी केलेला ( व्यवहार , हिशेब , पुरावा इ० ). याच्य उलट लेखी . तोंडचा , तोंडीचा घास काढणे हिरुन घेणे १ ( एखाद्याची ) अगदी आटोक्यात आलेली वस्तु , पदरी पडावयास आलेला लाभ हिसकावून घेणे . २ ( एखाद्यास ) अतिशय प्रेमाने , ममतेने वागविणे , प्रसंगविशेषी आपण उपाशी राहून दुसर्यास खावयास देणे . तोंडचा गोड आणि हातचा जड बोलण्यांत गोड व अघळपघळ , पण प्रत्यक्ष पैशाची मदत करण्यांत पूज्य . तोंडचा चतुर वि . बोलण्यांत पटाईत ; वाक्पटु . तोंडचा जार पु . नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या तोंडांतील फेस ; चिकटा ; ओठावरचा जार ; जन्मप्रसंगीचा तोंडावरचा पातळ पापुद्रा ( विशेषतः तुझ्या , त्याच्या तोंडचा जार वाळला नाही . = तूं , तो अजून केवळ बालकच आहेस . अशा वाक्यांत उपयोग . ) तोंडचा नीट वि . १ बोलून भला , चांगला ; बोलकाचालका ; सौजन्ययुक्त . २ युक्तायुक्त विचार करुन बोलणारा . ३ हजरजबाबी ; अस्खलित बोलणारा . तोंडचा फटकळ वि . शिवराळ ; उघडतोंड्या ; अश्लील , शिवराळ भाषण करणारा . तोंडचा रागीट वि . जहाल ; तिखट ; कडक भाषण करणारा . तोंडचा शिनळ वि . १ इष्कबाज , फंदी म्हणून नांव मिळविण्याची इच्छा करणारा ; स्त्रियांची खोटी खुषमस्करी करणारा ; स्त्रियांच्या कृपेची खोटीच फुशारकी मारणारा . २ निर्गल व अश्लील भाषण करणारा ; शिवराळ . तोंडची , तोंडाची गोष्ट स्त्री . सहजसाध्य , अतिशय सोपी गोष्ट , काम . वाघ मारणे तोंडची गोष्ट नव्हे . तोंड चुकविणे हातून एखादा अपराध घडला असतां कोणी रागे भरेल या भीतीने , काम वगैरे टाळण्यासाठी चुकारतट्टूपणाने एखाद्यापासून आपले तोंड लपविणे ; दृष्टीस न पडणे ; छपून असणे . ०चे - क्रिवि . प्रत्यक्षाप्रत्यक्ष ; तोंडाने ; बोलाचालीने . तोंडी - क्रिवि . प्रत्यक्षाप्रत्यक्ष ; तोंडाने ; बोलाचालीने . ०चे व्यवहार - केवळ तोंडाने बोलून , बोलाचालीने झालेला , होणारा व्यवहार , धंदा . याच्या उलट लेखी व्यवहार . तोंडी व्यवहार - केवळ तोंडाने बोलून , बोलाचालीने झालेला , होणारा व्यवहार , धंदा . याच्या उलट लेखी व्यवहार . ०चे - न . ( को . ) गुरांच्या तोंडास व पायांस होणारा रोग . पायचे - न . ( को . ) गुरांच्या तोंडास व पायांस होणारा रोग . ०चे - पुअव . कागदांवर आंकडेमोड न करितां मनांतल्यामनांत कांही आडाख्यांच्या मदतीने करावयाचे हिशेब . तोंडचे , तोंडावरचे पाणी पळणे ; उडणे , तोंड कोरडे पडणे - १ ( भीतीमुळे ) चेहरा फिक्का पडणे ; बावरुन , घाबरुन जाणे . २ ( भीति इ० कांमुळे ) तोंडांतील ओलावा नाहीसा होणे . तोंड टाकणे - टाकून बोलणे - १ ( क्रोधावेशाने ) अपशब्दांचा वर्षाव करणे ; निर्भत्सना करुन बोलणे ; खरडपट्टी काढणे ; अद्वातद्वा बोलणे . तूं नोकर माणसावर उगीच तोंड टाकलेस . २ ( घोडा इ० जनावरांने ) चावण्यासाठी तोंड पुढे करणे . ह्या घोड्याला तोंड टाकण्याची भारी खोड आहे , ती घालविली पाहिजे . ठेचणारा - फाडणारा - वि . ( एखाद्या ) उद्धट , बडबड्या माणसास गप्प बसविण्याची हातोटी ज्यास साधली आहे असा ; उद्दामपणाने , गर्वाने बोलणार्या व्यक्तीस रोखठोक उत्तर देऊन चूप बसविणारा . [ तोंड + ठेचणे ] हिशेब - पुअव . कागदांवर आंकडेमोड न करितां मनांतल्यामनांत कांही आडाख्यांच्या मदतीने करावयाचे हिशेब . तोंडचे , तोंडावरचे पाणी पळणे ; उडणे , तोंड कोरडे पडणे - १ ( भीतीमुळे ) चेहरा फिक्का पडणे ; बावरुन , घाबरुन जाणे . २ ( भीति इ० कांमुळे ) तोंडांतील ओलावा नाहीसा होणे . तोंड टाकणे - टाकून बोलणे - १ ( क्रोधावेशाने ) अपशब्दांचा वर्षाव करणे ; निर्भत्सना करुन बोलणे ; खरडपट्टी काढणे ; अद्वातद्वा बोलणे . तूं नोकर माणसावर उगीच तोंड टाकलेस . २ ( घोडा इ० जनावरांने ) चावण्यासाठी तोंड पुढे करणे . ह्या घोड्याला तोंड टाकण्याची भारी खोड आहे , ती घालविली पाहिजे . ठेचणारा - फाडणारा - वि . ( एखाद्या ) उद्धट , बडबड्या माणसास गप्प बसविण्याची हातोटी ज्यास साधली आहे असा ; उद्दामपणाने , गर्वाने बोलणार्या व्यक्तीस रोखठोक उत्तर देऊन चूप बसविणारा . [ तोंड + ठेचणे ] ०तोडणे ( ना . ) एखादी वस्तु मिळविण्याकरितां एखाद्याच्या पाठीस लागणे ; त्याच्यापुढे तोंड वेंगाडणे . ०दाबणे लाचलुचपत देऊन ( एखाद्याने ) गुप्त बातमी फोडू नये म्हणून , प्रतिकूल बोलू नये म्हणून ( त्यास ) लांच देऊन त्याचे तोंड दाबण्याची , वश करण्याची क्रिया . तो गावकामगारांची तोंडदाबी करतो . - गुजा २१ . [ तोंड + दाबणे = बंद करणे ] ०दिसणे एखाद्याची केलेली निर्भत्सना दुसरी बाजू न कळतां लोकांच्या नजरेस येणे व आपणच वाईट ठरणे ( पण ज्याची निर्भर्त्सना केली असेल त्याचे वर्तन सुधारण्याची आशा नसणे . ) मी तुला रागे भरलो म्हणजे माझे तोंड मात्र दिसेल , पण तूं आपला आहे तसाच राहणार . ०देणे १ पारा वगैरे देऊन तोंडांच्या आतील त्वचा सुजविणे ; तोड आणविणे . वैद्यबोवा म्हणाले की त्याला तोंड दिले आहे . २ सैन्याच्या अग्रभागी राहून शत्रूवर हल्ला करणे . ३ ( एखाद्याचा ) प्रतिपक्षी होऊन राहणे ; लढावयाला सिद्ध होणे . ४ ( आट्यापाट्यांचा खेळ ) शेवटची पाटी खेळून परत येणार्या गड्याकडे पाटी धरणाराने तोंड फिरविणे . ५ एखाद्या गोष्टीला न भितां तींतून धैर्याने पार पडण्याची तयारी ठेवणे . ०धरणे १ अन्नसेवन करण्याची तोंडाची शक्ति आजार वगैरे कारणांमुळे नाहीशी होणे . त्याचे तोंड धरले आहे , त्याला चमच्याचमच्याने दूध पाजावे लागते . २ ( एखाद्याची ) बोलण्याची शक्ति नाहीशी करणे . ३ ( एखाद्याला आपल्या ) तावडीत , कबजांत आणणे . मी त्याचे तोंड धरले आहे , तो आता काय करणार ! ०धुवून - ( उप . ) एखाद्याची विनंति कधीहि मान्य होणार नाही असे म्हणून फेटाळून लावताना योजण्याचा तिरस्कारदर्शक वाक्प्रचार . येणे - ( उप . ) एखाद्याची विनंति कधीहि मान्य होणार नाही असे म्हणून फेटाळून लावताना योजण्याचा तिरस्कारदर्शक वाक्प्रचार . ०निपटणे ( आजार , उपवास इ० कारणांमुळे एखाद्याचे ) गाल खोल जाणे , चेहरा सुकणे . महिनाभर हे मूल तापाने आजारी होते , त्याचे तोंड पहा कसे निपटले आहे ते . ०पडणे १ सुरुवात होणे . लढाईस तोंड पडले आहे २ ( गळू इ० कांस ) छिद्र पडणे ; फुटणे ; वाहूं लागणे . ०पसरणे वेंगाडणे १ खिन्नपणाची , केविलवाणी मुद्रा धारण करणे . १ हीनदीनपणाने याचना करणे . ०पाघळणे १ न बोलाविण्यास , वेढा फोडण्यास प्रारंभ करणे ; भांडणास सुरुवात करणे . ०पाहणे १ ( एखाद्याच्या ) आश्रयाची , मदतीची अपेक्षा करुन असणे . आम्ही पडलो गरीब , म्हणून आम्हाला सावकाराची तोंडे पाहण्याची पाळी वारंवार येते . २ ( एखाद्याने ) स्वतःच्या शक्तीचा , कर्तृत्वाचा अजमास करणे . तू असे करीन म्हणतोस , पण आधी आपले तोंड पहा ! ३ बोलणाराचे भाषण नुसते ऐकणे , पण त्याने सांगितलेले करावयास किंवा केलेला बोध अनुसरावयास प्रवृत्त न होतां स्वस्थ बसून राहणे . म्हणती हाणा , मारा , पाडा , घ्या , काय पाहतां तोंडा ! - मोद्रोण ३ . १२५ . ०पाहात बसणे काय करावे , कसे करावे या विवंचनेत असणे . ०पिटणे बडबड करणे . पश्चिमद्वारीचे कवाड । सदा वार्याने करी खडखड । तैशी न करी बडबड । वृथा तोंड पिटीना । - एभा १० . २३१ . ०फिरणे १ आजाराने , पदार्थाच्या अधिक सेवनाने तोंडाची रुची नाहीशी होणे ; तोंड वाईट होणे . २ तोंडातून शिव्यांचा वर्षाव होऊ लागणे . तो रागावला म्हणजे कोणावर त्याचे तोंड फिरेल ह्याचा नेम नाही . ०फिरविणे १ तोंडाची चव नाहीशी करणे . २ शिव्यांचा वर्षाव करीत सुटणे . तो रागावला म्हणजे तुमच्यावर देखील तोंड फिरवावयाला कचरणार नाही . ३ ( वितळत असलेला किंवा तापविला जात असलेला धातु इ० काने ) रंगामध्ये फरक दाखविणे , रंग पालटणे . ह्या तांब्याने अद्याप तोंड फिरविले नाही , आणखी पुष्कळ आंच दिली पाहिजे . ४ दुसर्या दिशेकडे पाहणे ; विशिष्ट गोष्टीकडे लक्ष न देतां इतर गोष्टींकडे प्रवृत्ति दाखविणे . ५ गतीची दिशा बदलणे ; दुसर्या दिशेला , माघारे वळणे . ०फुटणे १ थंडीमुळे तोंडाची बाह्य त्वचा खरखरीत होणे , भेगलणे . २ ( एखाद्याची ) फजिती उडणे ; पत नाहीशी होणे ; नाचक्की होणे ; अभिमान गलित होण्याजोगा अपमान , शिक्षा इत्यादि होणे . ०बंद - १ जीभ आवरणे ; जपून बोलणे . २ ( एखाद्याला ) लांच देऊन गप्प बसविणे , वश करुन घेणे . करणे - १ जीभ आवरणे ; जपून बोलणे . २ ( एखाद्याला ) लांच देऊन गप्प बसविणे , वश करुन घेणे . ०बंदावर - खाण्याला किंवा बोलण्याला आळा घालणे . तू आपले तोंड बंदावर राखिले नाहीस तर अजीर्णाने आजारी पडशील . राखणे - खाण्याला किंवा बोलण्याला आळा घालणे . तू आपले तोंड बंदावर राखिले नाहीस तर अजीर्णाने आजारी पडशील . ०बांधणे लांच देऊन ( एखाद्याचे ) तोंड बंद करणे ; ( एखाद्याने ) गुप्त गोष्ट फोडू नये म्हणून पैसे देऊन त्यास गप्प बसविणे . ०बाहेर - १ तोंड दाखविणे ; राजरोसपणे समाजांत हिंडणे ( बहुधा निषेधार्थी प्रयोग ). तुरुंगातून सुटून आल्यावर त्याने आज दोन वर्षात एकदाहि तोंड बाहेर काढले नाही . २ फिरण्यासाठी , कामकाजासाठी घराबाहेर पडणे . काढणे - १ तोंड दाखविणे ; राजरोसपणे समाजांत हिंडणे ( बहुधा निषेधार्थी प्रयोग ). तुरुंगातून सुटून आल्यावर त्याने आज दोन वर्षात एकदाहि तोंड बाहेर काढले नाही . २ फिरण्यासाठी , कामकाजासाठी घराबाहेर पडणे . ०बिघडणे तोंड बेचव होणे ; तोंडास अरुचि उत्पन्न होणे ; विटणे . - ०भर भरुन बोलणे भीड , संकोच , भीति न धरतां मनमोकळेपणाने भरपूर , अघळपघळ बोलणे . ०भरुन घालणे - ( एखाद्याचे ) तोंड साखरेने भरणे ; ( एखाद्याच्या ) कामगिरीबद्दल , विजयाबद्दल संतोषादाखल त्याचे तोंड साखरेने भरणे ; ( एखाद्याच्या ) कामगिरीबद्दल गोड , भरपूर मोबदला देणे . साखर घालणे - ( एखाद्याचे ) तोंड साखरेने भरणे ; ( एखाद्याच्या ) कामगिरीबद्दल , विजयाबद्दल संतोषादाखल त्याचे तोंड साखरेने भरणे ; ( एखाद्याच्या ) कामगिरीबद्दल गोड , भरपूर मोबदला देणे . ०मागंणे ( आट्यापाट्यांचा खेळ ) लोण घेऊन परत जातांना पाटीवरील गड्यांस आपणाकडे तोंड फिरविण्यास सांगणे . तोंड मागितल्यावर पाटीवरील गडी आपले तोंड फिरवितो त्यास तोंड देणे म्हणतात . ०माजणे १ मिष्टान्न खावयाची चटक लागल्याने साध्या पदार्थाबद्दल अरुचि उत्पन्न होणे . २ शिव्या देण्याची , फटकाळपणाने बोलण्याची खोड लागणे . ०मातीसारखे शेणासारखे होणे ( आजाराने ) तोंडाची चव नाहीशी होणे ; तोंड विटणे , फिरणे ; अन्नद्वेष होणे . ०मिचकणे दांत , ओठ खाणे . ०तोंड - १ तोंडाच्या आतल्या बाजूच्या त्वचेस फोड येऊन ती हुळहुळी होणे व लाळ गळू लागणे . २ ( कर . ) लहान मूल बोलू लागणे . आमच्या मुलाला तोंड आले आहे . = तो बोलावयास लागला आहे . येणे - १ तोंडाच्या आतल्या बाजूच्या त्वचेस फोड येऊन ती हुळहुळी होणे व लाळ गळू लागणे . २ ( कर . ) लहान मूल बोलू लागणे . आमच्या मुलाला तोंड आले आहे . = तो बोलावयास लागला आहे . ०रंगविणे १ विडा खाऊन ओंठ तांबडे लाल करुन सोडणे . ०लागणे ( लढाई , वादविवाद , अंगीकृत कार्य इ० कांस ) सुरवात होणे . तेव्हा युद्धास तोंड लागले . - इमं २९० . लावणे १ ( वादविवाद इ० कांस ) सुरवात करणे . २ प्यावयासाठी एखादे पेय ओंठाशी नेणे . ३ ०वाईट - निराशेची मुद्रा धारण करणे . करणे - निराशेची मुद्रा धारण करणे . ०वाईट - १ निराशेची मुद्रा येणे . २ ( ताप इ०कांमुळे ) तोंडास अरुचि येणे . होणे - १ निराशेची मुद्रा येणे . २ ( ताप इ०कांमुळे ) तोंडास अरुचि येणे . ०वांकडे - १ वेडावून दाखविणे . २ नापसंती दर्शविणे . करणे - १ वेडावून दाखविणे . २ नापसंती दर्शविणे . ०वाजविणे एकसारखे बोलत सुटणे ; निरर्थक बडबड करणे ; बकबकणे ; वटवट करणे ; भांडण करणे . ०वासणे १ निराशेने , दुःखाने तोंड उघडणे व ते बराच वेळ तसेच ठेवणे . २ याचना करण्यासाठी तोंड उघडणे , वेंगाडणे . ०वासून - शक्तिच्या क्षीणतेमुळे , उत्साह , तेज , वगैरे नष्ट झाल्यामुळे , गतप्राण झाल्यामुळे आ पसरुन पडणे . तो पडला सिंहनिहतमत्तद्विपसाचि तोंड वासून । - मोगदा ५ . २५ . पडणे - शक्तिच्या क्षीणतेमुळे , उत्साह , तेज , वगैरे नष्ट झाल्यामुळे , गतप्राण झाल्यामुळे आ पसरुन पडणे . तो पडला सिंहनिहतमत्तद्विपसाचि तोंड वासून । - मोगदा ५ . २५ . ०वासून - अविचाराने बोलणे . ऐसे स्वल्पसंख्यांपासी कां गे वदलीस तोंड वासून । - मोउद्योग १३ . २०५ . बोलणे - अविचाराने बोलणे . ऐसे स्वल्पसंख्यांपासी कां गे वदलीस तोंड वासून । - मोउद्योग १३ . २०५ . ०तोंड - दीन मुद्रेने आणि केविलवाण्या स्वराने याचना करणे . विचकणे - दीन मुद्रेने आणि केविलवाण्या स्वराने याचना करणे . ०वेटाविणे वेडाविणे - ( काव्य ) ( एखाद्यास ) वेडावून दाखविण्यासाठी त्याच्यापुढे तोंड वेडेवाकडे करणे . ०शेणासारखे - ( लाजिरवाणे कृत्य केल्याने ) तोंड उतरणे ; निस्तेज होणे ; काळवंडणे . पडणे - ( लाजिरवाणे कृत्य केल्याने ) तोंड उतरणे ; निस्तेज होणे ; काळवंडणे . ०संभाळणे जपून बोलणे ; जीभ आवरणे ; भलते सलते शब्द तोंडातून बाहेर पडू न देणे ; अमर्याद बोलण्यास आळा घालणे . ०सुटणे चरांचरां , फडाफडा , अद्वातद्वा बोलू लागणे . ०सुरु - बडबडीला शिव्यांना सुरवात होणे . होणे - बडबडीला शिव्यांना सुरवात होणे . ०सोडणे १ फडांफडां , अद्वातद्वा बोलूं लागणे . ०सुरु - बडबडीला , शिव्यांना सुरुवात होणे . होणे - बडबडीला , शिव्यांना सुरुवात होणे . ०सोडणे २ फडांफडां , अद्वातद्वा बोलू लागणे ; अमर्याद बोलणे . २ अधाशासारखे खात सुटणे ; तोंड मोकळे सोडणे . ०हाती हातावर धरणे तोंड सोडणे ( दोन्ही अर्थी ) पहा . तोंडाचा खट्याळ फटकळ फटकाळ फटकूळ वाईट शिनळ वि . शिवराळ ; तोंडाळ ; अश्लील बोलणारा . तोंडाचा खबरदार बहादर बळकट वि . बोलण्यांत चतुर , हुषार ; बोलण्याची हातोटी ज्याला साधली आहे असा . तोंडाचा गयाळ , तोंड गयाळ वि . जिभेचा हलका ; चुरचोंबडा ; लुतरा ; बडबड्या ; ज्याच्या तोंडी तीळ भिजत नाही असा . तोंडाचा गोड वि . गोड बोलणारा ; गोडबोल्या . म्ह ०तोंडचा गोड हाताचा जड = गोड व अघळपघळ भाषण करणारा पण प्रत्यक्ष कांहीहि मदत न करणारा ; फार थोडे बोलणारा ; अस्पष्ट भाषण करणारा ; तोंडाचा तिखट वि . खरमरीत , स्पष्ट , झोंबणारे , कठोर भाषण करणारा . तोंडाचा तोफखाना सुटणे ( एखाद्याची ) अद्वातद्वा बोलण्याची क्रिया सुरु होणे ; शिव्यांचा वर्षाव होऊ लागणे . तोंडाचा पट्टा सोडणे ( एखाद्याने ) शिव्यांचा भडिमार सुरु करणे ; जीभ मोकळी सोडणे ; ( एखाद्याची ) खरडपट्टी आरंभिणे . तोंडाचा पालट पु . रुचिपालट ; तोंडास रुचि येईल असा अन्नांत केलेला फेरबदल ; अन्नांतील , खाण्यातील फरक , बदल . तोंडाचा बोबडा वि . बोंबडे बोलणारा ; तोतरा . तोंडाचा मिठा वि . गोडबोल्या ; तोंडचा गोड पहा . तोंडाचा हलका वि . चुरचोंबडा ; भडभड्या ; विचार न करितां बोलणारा ; फटकळ . तोंडाचा हुक्का होणे ( व . ) तोंड सुकून जाणे . तोंडाची चुंबळ स्त्री . दुसर्यास वेडावून दाखविण्याकरिता चुंबळीसारखी केलेली ओठांची रचना ; वांकडे तोंड . तोंडाची वाफ दवडणे १ मूर्खास उपदेश करतांना , निरर्थक , निरुपयोगी , निष्फळ भाषण करणे . २ ज्यावर विश्वास बसणार नाही असे भाषण करणे ; मूर्खपणाने बोलणे ; वल्गना करणे ; बाता मारणे . ( या वाक्प्रचारांत दवडणे बद्दल खरचणे गमविणे , फुकट जाणे , घालविणे , काढणे इ० क्रियापदेहि योजतात . ) तोंडाचे बोळके होणे ( म्हातारपणामुळे ) तोंडातील सर्व दांत पडणे . तोंडाचे सुख न . तोंडसुख पहा . ( वरील सर्व वाक्प्रचारांत तोंडाचा या शब्दाऐवजी तोंडचा हा शब्दहि वापरतात . ) तोंडात खाणे , मारुन घेणे १ गालांत चपराक खाणे ; मार मिळणे . २ पराभूत होणे ; हार जाणे . ३ फजिती झाल्यानंतर शहाणपणा शिकणे ; नुकसान सोसून धडा शिकणे ; बोध मिळविणे . तोंडांत जडणे थोबाडीत , गालांत बसणे ( चपराक , थप्पड इ० ). तोंडात तीळभर न राहणे अगदी क्षुद्र अशी गुप्त गोष्टहि पोटांत न ठरणे ; कोणतीहि लहानसहान गोष्ट गुप्त ठेवू न शकणे . तोंडात तोंड घालणे १ ( ल ) प्रेम , मैत्री इ० कांच्या भावाने वागणे ; मोठ्या प्रेमाचा , मित्रपणाचा आविर्भाव आणून वागणे . २ एकमेकांचे चुंबन घेणे . तोंडात देणे ( एखाद्याच्या ) थोबाडीत मारणे ; गालांत चपराक मारणे ; तोंडात बोट घालणे ( ल . ) आश्चर्यचकित , थक्क होणे ; विस्मय पावणे . तोंडात भडकावणे तोंडांत देणे पहा . तोंडांत माती घालणे खाण्यास अन्न नसणे ; अतिशय हाल , कष्ट सोसावे लागणे . तोंडांत मांती पडणे १ ( एखद्याची ) उपासमार होणे . २ मरणे . तोंडांत शेण घालणे ( एखाद्याची ) फजिती करणे ; ( एखाद्यास ) नांवे ठेवणे ; खरडपट्टी काढणे . तोंडात साखर असणे ( गो . ) ( एखाद्याचे ) तोंड , वाणी गोड असणे ; गोड बोलत असणे . तोंडात साखर पडणे ( एखाद्याला ) आनंदाचा प्रसंग , दिवस येणे . तोंडातून ब्र काढणे ( तोंडातून ) अधिक - उणे अक्षर काढणे , उच्चारणे . आंतल्याआंत चूर होऊन मेले पाहिजे , तोंडातून ब्र काढण्याची सोय नाही . - विकारविलसित . तोंडाने पाप भरणे , तोंडे पाप घेणे लोकांची पातके उच्चारणे ; लोकांचे दोष बोलून दाखविणे ; वाईट बोलण्याची हौस यथेच्छ पुरवून घेणे ; लोकांची पापे उच्चारुन जिव्हा विटाळणे . कैसी वो मानुसे । सपाइनि परंवंसे । तोंडे पाप घेती कांइसे । वायां वीण । - शिशु २१६ . तोंडापुढे क्रिवि . अगदी जिव्हाग्री ; मुखोद्गत . तोंडापुरता , तोंडावर गोड वि . मधुर पण खोटे बोलणारा ; दुतोंड्या ; वरवर गोड बोलणारा व आंतून कपटी असलेला ; उघडपणे प्रिय भाषण करणारा व मनांत निराळेच असणारा . तोंडापुरता मांडा भूक लागेल एवढीच पोळी . २ ( ल . ) जेमतेम गरज भागेल एवढाच जरुर त्या वस्तूचा पुरवठा . तोंडावर मारप ( गो . ) ( एखाद्याच्या ) पदरांत चूक बांधणे ; वरमण्यासारखे उत्तर देणे . तोंडार ल्हायो उडप ( गो . ) फार जलद , अस्खलित बोलणे ; लाह्या फुटणे . तोंडाला काळोखी आणणे लावणे बेअब्रू , नापत करणे . तोंडाला टांकी दिलेली असणे देवीच्याअ खोल वणांनी तोंड भरलेले असणे ; तोंडावर देवीचे वण फार असणे . तोंडाला पाणी सुटणे ( एखादी वस्तु पाहून तिच्यासंबंधी ) मोह उत्पन्न होणे ; हांव सुटणे . तोंडाला पाने पुसणे फसविणे ; चकविणे ; छकविणे ; भोळसाविणे ; भोंदणे ; तोंडावरुन हात फिरविणे . त्याच्यावर देखरेख करावयाला चार माणसे होती , पण त्याने सर्वांच्या तोंडाला पाने पुसून आपला डाव साधला . तोंडाला फाटा फुटणे मूळ मुद्दा सोडून भलतेच बोलत सुटणे ; हवे तसे अमर्याद भाषण करुं लागणे . तोंडावर तुकडा टाकणे ( एखाद्याने ) गप्प बसावे , प्रतिकूल बोलू नये म्हणून त्याला थोडेसे कांही देणे . तोंडावर ला तोंड देणे १ ( एखाद्यास ) विरोध करणे ; विरुद्ध बोलणे . २ ( एखाद्यास ) उद्धटपणाने , अविनयाने , दांडगेपणाने उत्तर देणे ; उत्तरास प्रत्युत्तर देणे . तोंडावर तोंड पडणे दोघांची गांठ पडून संभाषण , बोलाचाल होणे . तोंडावर थुंकणे ( एखाद्याची ) निर्भत्सना , छीःथू करणे ; धिक्कार करणे . तोंडावर देणे तोंडात देणे पहा . काय भीड याची द्या की तोंडावरी । - दावि ३०२ . तोंडावर नक्षत्र पडणे ( एखाद्याने ) तोंडाळपणा करणे ; शिवराळ असणे ; नेहमी अपशब्दांनी तोंड भरलेले असणे . ह्याजकरिका तोंडावर नक्षत्र पडलेल्या पोरास म्या बोलाविले म्हणून हे मला शब्द लावित नाहीत . - बाळ २ . १४२ . तोंडावर पडप ( गो . ) थोबाडीत ( चपराक ) बसणे , पडणे . तोंडवर सांगणे बोलणे ( एखाद्याच्या ) समक्ष , निर्भीडपणे , बेडरपणे सांगणे , बोलणे . तोंडावरुन तोंडावर हात फिरविणे ( एखाद्यास ) गोड बोलून , फूसलावून भुलथाप देऊन फसविणे ; भोंदणे ; छकविणे . तोंडाशी तोंड देणे ( हलक्या दर्जाच्या व्यक्तीने वरिष्ठाशी ) आपला दर्जा विसरुन , बरोबरीच्या नात्याने , अविनयाने बोलणे , व्यवहार करणे . तोंडास काळोखी स्त्री . मुखसंकोच ; ओशाळगत ; गोंधळून गेल्याची स्थिति ; बेअब्रू ; कलंक . तोंडास काळोखी , काजळी लागणे ( एखाद्याची ) बेअब्रू , नाचक्की होणे ; दुष्कीर्ति होणे ; नांवाला कलंक लागणे . तोंडास काळोखी , काजळी लावणे ( एखाद्याचे ) नांव कलंकित करणे ; बेअब्रू करणे . सुनेने माझ्या तोंडाला काळोखी लावली . तोंडास कुत्रे बांधलेले असणे ताळतंत्र सोडून , अद्वातद्वा , अपशब्द बोलणे ; शिव्या देणे . त्याने तर जसे तोंडाला कुत्रेच बांधले आहे . तोंडास खीळ घालणे निग्रहपूर्वक , हट्टाने मौन धारण करणे . तोंडास तोंड न . वादविवाद ; वाग्युद्ध ; हमरीतुमरी ; धसाफसी . - क्रिवि . समक्षासमक्ष ; समोरासमोर ; प्रत्यक्ष . तोंडास तोंड देणे १ तोंडाशी तोंड देणे पहा . २ मार्मिकपणे , खरमरीतपणे उत्तर देणे . तोंडास पाणी सुटणे ( एखाद्या वस्तूबद्दल , गोष्टीबद्दल ) लोभ , मोह उत्पन्न होणे ; तोंडाला पाणी सुटणे पहा . पोर्तुगीज लोकांची बढती पाहून तिकडच्या दुसर्या साहसी लोकांच्या तोंडास पाणी सुटले . - बाजी . तोंडास तोंड न दिसणे ( पहांटेस ) तोंड न ओळखतां येण्याइतका अंधेर असणे ( झुंजुमुंजु पहाटेविषयी वर्णन करितांना हा वाक्प्रचार योजतात . ) अद्याप चांगले उजाडले नाही , तोंडास तोंड दिसत नाही . तोंडास तोंडी बसणे ( श्लोक , शब्द इ० ) स्पष्ट , बिनचूक भरभर म्हणण्याइतका पाठ होणे . तो श्लोक दहा वेळा पुस्तकांत पाहून म्हण , म्हणजे तो तुझ्या तोंडी बसेल . तोंडास येईल ते बोलणे विचार न करिता , भरमसाटपणाने वाटेल ते बोलणे ; अद्वातद्वा , अपशब्द बोलणे . तोंडास तोंडी लागणे १ ( एखाद्याच्या ) तोंडास तोंड देणे ; उलट उत्तरे देणे . २ हुज्जत घालणे ; वादविवाद करण्यास तयार होणे . तोंडासमोर क्रिवि . १ ( एखाद्याच्या ) समक्ष ; समोर ; डोळ्यादेखत . २ अगदी मुखोद्गत ; जिव्हाग्री . तोंडापुढे पहा . हा श्लोक अगदी माझ्या तोंडासमोर आहे . तोंडास हळद लागणे ( एखाद्यास ) दोष देणे , नापसंती दर्शविणे अशा अर्थी हा वाक्प्रचार योजितात . तोंडासारखा वि . ( एखाद्याची ) खुशामत , स्तुति इ० होईल अशा प्रकारचा ; एखाद्याच्या खुशामतीकरितां त्याच्या मतास जुळता . तोंडासारखे बोलणे ( एखाद्याची ) स्तुति , खुशामत करण्याकरिता त्याच्याच मताची , म्हणण्याची री ओढणे ; त्याचे मन न दुखवेल असे बोलणे . तोंडी आणणे देणे -( रोग्यास ) लाळ गळण्याचे , तोंड येण्याचे औषध देऊन तोंड आणणे . तोंडी काढणे १ ओकारी देणे ; वांती होणे . २ ( एखाद्यास ) त्याने केलेले उपकार बोलून दाखवून टोमणा मारणे . तोंडी खीळ पडणे तोंड बंड होणे ; गप्प बसणे भाग पडणे . अवघ्या कोल्यांचे मर्म अंडी । धरितां तोंडी खीळ पडे । तोंडी घास येणे ( एखाद्यास घांसाभर अन्न मिळणे ; चरितार्थाचे साधन मिळणे ; पोटापाण्याची व्यवस्था होणे . तोंडी तीळ न भिजणे १ ( तापाने , संतापून ओरडण्याने , रडण्याने ) तोंड शुष्क होणे , कोरडे पडणे . २ एखादी गुप्त गोष्ट मनांत न राहणे , बोलून टाकणे ; तोंडी तृण धरणे ( एखाद्याने ) शरण आलो असे असे कबूल करणे ; शरणागत होणे ; हार जाणे ( दांती तृण धरणे असाहि प्रयोग रुढ आहे ). तोंडी देणे ( एखाद्यास एखाद्या माणसाच्या , कठिण कार्याच्या ) सपाट्यांत , तडाख्यांत , जबड्यांत , तावडीत लोटणे , देणे ; हाल , दुःख सोसण्यास ( एखाद्यास ) पुढे करणे . तोंडी तोंडास पान पाने पुसणे ( एखाद्यास ) छकविणे ; लुबाडणे ; भोंदणे ; अपेक्षित लाभ होऊ न देणे ; स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेऊन दुसर्यास तोंड पहावयास लावणे . त्याने आपल्या नळीचे वर्हाड केले आणि सर्वांच्या तोंडी पान पुसले . तोंडी माती घालणे ( एखाद्याने ) अतिशय दुःखाकुल , शोकाकुल होणे . ऊर , माथा बडवून , तोंडी माती घालू लागली . भाब ७५ . तोंडी येऊन बुडणे नासणे ( एखादी वस्तू , पीक इ० ) अगदी परिपक्वदशेस , परिणतावस्थेस येऊन , ऐन भरांत येऊन , नाहीशी होणे , वाईट होणे . तोंडी येणे १ ( पारा इ० औषधाने ) तोंड येणे . २ ऐन भरांत , परिपक्व दशेस , पूर्णावस्थेस येणे . तोंडी रक्त , रगत लागणे १ वाघ इ० हिंस्त्र पशूला माणसाच्या रक्ताची चटक लागून तो माणसावर टपून बसणे . २ ( ल . ) लांच - लुचपत खाण्याची चटक लागणे . तोंडी लागणे ( एखाद्यास एखाद्या वस्तूची , खाद्याची चव प्रथमच कळून त्या वस्तूची त्यास ) चटक लागणे ; आवड उत्पन्न होणे . ह्याच्या तोंडी भात लागला म्हणून यास भाकर आवडत नाही . तोंडी लागणे १ ( एखाद्याच्या ) तोंडास तोंड देणे ; उद्धटपणाने , आपला दर्जा विसरुन उलट जबाब देणे . २ हुज्जत घालणे ; वादविवादास प्रवृत्त होणे ; तोंडास लागणे पहा . सुज्ञ आहेत ते दूषकांच्या तोंडी लागत नसतात . - नि ३ ( युद्ध , भांडण इ० कांच्या ) आणीबाणीच्या ठिकाणी , आघाडीस , अग्रभागी असणे . तोंडी लावणे न . जेवतांना तोंडास रुचि आणणारा भाजी , चटणी इ० सारखा मधून मधून खावयाचा चमचमीत पदार्थ . तोंडी लावणे १ जेवतांना भाजी , चटणी इ० चमचमीत पदार्थाने रुचिपालट करणे . आज तोंडी लावावयाला भाजीबिजी काही केली नाही काय ? २ विसारादाखल पैसे देणे . तोंडे मागितलेली किंमत स्त्री . ( एखाद्या वस्तूची ) दुकानदाराने सांगितलेली व झिगझिग वगैरे न करितां गिर्हाइकाने दिलेली किंमत . तोंडे मानलेला मानला वि . ( तोंडच्या ) शब्दाने , वचनाने मानलेला ( बाप , भाऊ , मुलगा इ० ); धर्माचा , पुण्याचा पहा . तोंडे वाकडी करणे वेडावून दाखविणे ; वेडावणे . लहान तोंडी मोठा घास घेणे १ ( एखाद्याने ) आपल्या आवाक्याबाहेरचे काम हाती घेणे . २ ( वडील , वरिष्ठ माणसांबरोबर ) न शोभेल असे , मर्यादा सोडून , बेअदबीने बोलणे ; वडील माणसांस शहाणपण शिकविणे . जळो तुझे तोंड ( बायकी भाषेत ) एक शिवी . स्त्रिया रागाने ही शिवी उपयोगांत आणतात . म्ह ० १ तोंड बांधून ( दाबून ) बुक्क्यांचा मार = एखाद्याचा विनाकारण छळ होऊन त्यास त्याविरुद्ध तक्रार करतां न येणे ; एखाद्यास अन्यायाने वागवून त्याविरुद्ध त्याने कागाळी केल्यास त्यास बेगुमानपणे शिक्षा करणे . बायकांचा जन्म म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार , म्हणतात ते अक्षरशः खरे आहे . - पकोघे २ ( गो . ) तोंडाच्या बाता घराबाईल भीक मागता = बाहेर मोठ्मोठ्या गप्पा मारतो पण घरी बायको भीक मागते . सामाशब्द - तोंड उष्ट न . एखादा - दुसरा घांस खाणे ; केवळ अन्न तोंडास लावणे ; तोंड खरकटे करणे . [ तोंड + उष्टे ] ०ओळख स्त्री. परस्परांचा विशेष परिचय नसता , चेहरा पाहूनच अमुक आहे असे समजण्याजोगी ओळख ; ( एखाद्याची ) चेहरेपट्टी लक्षांत राहून तीवरुनच त्याला ओळखता येणे ; नांव वगैरे कांही माहीत नसून ( एखाद्याची ) केवळ तोंडावळाच ओळखीचा असणे . एखाद्याला वाटेल की बाळासाहेबांशी त्याची तोंडओळखच आहे . - इंप ३७ . ०कडी स्त्री. आंतील तुळ्यांची तोंडे बाहेर भिंतीतील ज्या तुळईवर ठेवतात , ती सलग तुळई . २ कौलारु छपराचे वासे ज्या सलग तुळईवर टेकतात ती छपराच्या शेवटी , टोंकास असलेली तुळई . ३ गुरांचे दावे जिला बांधतात ती कडी . ५ ( जमाखर्चाच्या वहीतील जमा आणि खर्च या दोहोबाजूंचा मेळ === अशा दुलंगीने , ( दुहेरी रेषेने ) दाखविण्याचा प्रघात आहे . वहीची खात्याची - तारखेची - तोंडकडी असा शब्दप्रयोग करितात . ( क्रि० मिळणे ; जुळणे ; येणे ; उतरणे ; चुकणे ; बंद होणे ). [ तोंड + कडी ] ०कळा स्त्री. चेहर्यावरील तजेला ; कांति ; तेज ; टवटवी . ( प्र . ) मुखकळा . [ तोंड + कळा = तेज ] ०काढप ( गो . ) उपदंश झालेल्या रोग्यास एक प्रकारचे औषध देऊन त्याच्या तोंडांतून लाळ वाहवितात तो प्रकार . ह्या औषधाने तोंड बरेच सुजते . [ तोंड + गो . काढप = काढणे ] ०खुरी स्त्री. ( ना . ) गुरांचा एक रोग . ०खोडी वि. तोंडाळ ; टाकून बोलणारा ; तोंड टाकणारा ; अशी संवय असलेला . परम अधम रुक्मी हा महा तोंडखोडी । - सारुह ३ . ७८ . [ तोंड + खोड = वाईट संवय ] ०घडण स्त्री. तोंडाची ठेवण ; चेहरेपट्टी ; तोंडवळा . या मुलाची बापासारखी तोंडघडण आहे . [ तोंड + घडण = रचना ] ०घशी सी क्रिवि . १ जमीनीवर पडून तोंड घासले जाईल , फुटेल अशा रीतीने . ( क्रि० पडणे ; पाडणे ; देणे ). तो तोंडघसीच पडे करता दंतप्रहार बहु रागे । - मो . २ . ( आश्रय तुटल्याने ) गोत्यांत ; पेचांत ; अडचणीत ; फजिती होईल अशा तर्हेने ; फशी ( पडणे ). [ तोंड + घासणे ] ०घशी - दुसरा तोंडघशी पडे असे करणे . देणे - दुसरा तोंडघशी पडे असे करणे . ०चाट्या वि. खुशामत करणारा ; थुंकी झेलणारा ; तोंडासारखे बोलणारा . ०चाळा पु. १ तोंड वेडेवाकडे करुन वेडावण्याची क्रिया . २ वात इ० कांच्या लहरीने होणारी तोंडाची हालचाल , चाळा . ०चुकाऊ वू व्या , तोंडचुकारु चुकव्या वि . ( कामे इ० कांच्या भीतीने ) दृष्टि चुकविणारा ; तोंड लपविणारा ; नजरेस न पडे असा . [ तोंड + चुकविणे ] ०चुकावणी स्त्री. ( एखाद्यापासून ) तोंड लपविण्याची , स्वतःस छपविण्याची क्रिया . ०जबानी स्त्री. तोंडाने सांगितलेली हकीगत , दिलेली साक्ष , पुरावा . - क्रिवि तोंडी , तोंडाने . [ तोंड + फा . झबान ] ०जाब पु. तोंडी जबाब . ०झाडणी स्त्री. तिरस्कारपूर्ण उद्गारांनी झिडकारणे ; खडकावणे ; खरडपट्टी काढणे . ०देखणा ला वि . आपल्या अंतःकरणात तसा भाव नसून दुसर्याचे मन राखण्याकरिता त्याला रुचेल असा केलेला ( व्यवहार , भाषण , गो इ० ); खुशामतीचा ; तोंडासारखा ; तोंडपुजपणाचा . प्राणनाथ , मला ही तोंडदेखणी बोलणी आवडत नाहीत . - पारिभौ ३५ . [ तोंड + देखणे = पाहणे ] ०देखली - स्त्री . दुसर्याची मर्जी राखण्याकरिता केलेले , खुशामतीचे भाषण . गोष्ट - स्त्री . दुसर्याची मर्जी राखण्याकरिता केलेले , खुशामतीचे भाषण . ०निरोप पु. तोंडी सांगितलेला निरोप . कृष्णास ते हळूच तोंडनिरोप सांगे । - सारुह ४ . ९ . ०पट्टा पु. ( बायकी ). तोंडाचा तोफखाना ; अपशब्दांचा भडिमार ; संतापाने , जोरजोराने बेबंदपणे बोलणे . [ तोंड + पट्टा = तलवार ] ०पट्टी स्त्री. ( शिवणकाम ) तोंडाला शिवलेली पट्टी . योग्य तेवढी तोंडपट्टी कातरावी . - काप्र . १४ . ०पाटिलकी आपण कांही न करता बसल्या जागेवरुन लुडबुडेपणाने दुसर्यांना हुकुमवजा गोष्टी , कामे सांगणे ( पाटलाला बसल्या जागेवरुन अनेक कामे हुकूम सोडून करुन घ्यावी लागतात त्यावरुन ). २ ( उप . ) लुडबुडेपणाची वटवट , बडबड ; तोंडाळपणा . दुसरे काही न झाले तरी नुसती तोंडपाटिलकी करण्यास कांही हरकत नाही . - आगर ३ . ६१ . [ तोंड + पाटिलकी = पाटलाचे काम ] ०पाठ वि. पुस्तकाच्या सहाय्यावाचून केवळ तोंडाने म्हणता येण्यासारखा ; मुखोद्गत . [ तोंड + पाठ = पठण केलेले ] ०पालट पुस्त्री . १ ( अरुचि घालविण्याकरितां केलेली वाटाघाट ; ( वडिलांशी , गुरुंशी ) उद्धटपणाने वाद घालणे ; उलट उत्तर देणे ; प्रश्न इ० विचारुन अडवणूक करणे . गुरुंसी करिती तोंडपिटी । - विपू १ . ५७ . २ ( दगडोबास शिकविण्याकरिता , विसराळू माणसास पुन्हा पुन्हा बजावण्याकरिता , थिल्लर जनावरास हाकलण्याकरिता करावी लागणारी ) व्यर्थ बडबड , कटकट , वटवट . [ तोंड + पिटणे ] ०प्रचिती प्रचीति स्त्री . खुशामत करण्याकरिता ( एखाद्याच्या ) व्यक्तिमाहात्म्यास , भाषणास , अस्तित्वास मान देणे ; आदर दाखविणे . [ तोंड + प्रचीति ] ०प्रचीत क्रिवि . १ तोंडासारखे ; खुषामतीचे ; तोंडापुरते ( भाषण , वर्तन इ० करणे ). २ माणूस ओळखून , पाहून ; माणसामाणसांत तारतम्य ठेवून ( बोलणे , चालणे , वागणे ). ०प्रचीत - चालणारा - वागणारा - वि . माणसामाणसांत तारतम्य ठेवून चालणारा , बोलणारा , वागणारा . बोलणारा - चालणारा - वागणारा - वि . माणसामाणसांत तारतम्य ठेवून चालणारा , बोलणारा , वागणारा . ०फलाटकी फटाली स्त्री . तोंडाची निरर्थक बडबड , वटवट ; टकळी . [ तोंड + ध्व . फटां ! द्वि . ] ०फटाला ल्या वि . मूर्खपणाने काही तरी बडबडणारा ; बकणारा ; वटवट करणारा . [ तोंड + ध्व . फटां ! ] ०फट्याळ वि. तोंडाचा फटकळ ; शिवराळ ; तोंडाळ ; बातेफरास ; अंगी कर्तृत्व नसून लंब्या लंब्या बाता झोंकणारा . ०फट्याळी स्त्री. शिवराळपणा ; तोंडाळपणा ; वावदूकत . [ तोंडफट्याळ ] बडबड्या , बडव्या वि . निरर्थक वटवट , बडबड करणारा ; गाडीच्या चाकाच्या तुंब्यावरील बाहेरील बाजूचे लोखंडी कडे , पट्टी . आंतील बाजूच्या कड्यास कटबंद असे म्हणतात . [ तोंड + बंद = बांधणी ] ०बळ न. वक्तृत्वशक्ति ; वाक्पटुता ; वाक्चातुर्य . आंगबळ न चांगबळ देरे देवा तोंडबळ . ०बळाचा वि. ज्याला बोलण्याची हातोटी , वक्तृत्वकला साधली आहे असा ; तोंडबळ असलेला ; भाषणपटु ; जबेफरास . ०बाग स्त्री. ( राजा . ) चेहेरेपट्टी ; चेहर्याची ठेवण , घडण ; मुखवटा . ०बांधणी स्त्री. १ तोंडबंद पहा . २ ( ढोरांचा धंदा ) कातड्याच्या मोटेच्या सोंडेच्या टोंकाकरिता बाजूला शिवलेला गोट . - भडभड्या वि . तोंडास येईल ते बडबडत , बकत सुटणारा ; बोलण्याची , बडबडण्याची हुक्की , इसळी ज्यास येते असा ; भडभडून बोलणारा . ०भर वि. तोंडास येईल तेवढा ; भरपूर . हॅमिल्टन यांनी खर्चवाढीबद्दल तोंडभर मागणी केली होती . - केले १ . १९८ . ०मार स्त्री. १ रोग्यावर लादलेला खाद्यपेयांचा निर्बंध , पथ्य . २ एखाद्यास बोलण्याकरिता तोंड उघडू न देणे ; भाषणबंदी . ३ ( ल . ) ( एखाद्याच्या ) आशा , आकांक्षा फोल ठरविणे ; ( एखाद्याचा केलेला ) आशाभंग ; मनोभंग ; निराशा . ( क्रि० करणे ). ०मारा पु. १ शेतीच्या कामाच्या वेळी पिकांत वगैरे काम करताना गुरांच्या तोंडाला जाळी , मुंगसे , मुसके बांधणे . २ ( एखाद्यास ) केलेली भाषणबंदी ; खाद्यपेयांचा निर्बंध . ३ ( प्र . ) तोंडमारे , तोंडमार अर्थ ३ पहा . ०मिळवणी स्त्री. १ जमा आणि खर्च यांचा मेळ ; तोंडे मिळविण्यासाठी मांडलेला जमाखर्च . २ ऋणको व धनको यांच्यातील हिशेबाची बेबाकी , पूज्य . ३ मेळ . - शर . ०मिळवणी - न . ( जमाखर्च ) कच्चे खाते ( याचे देणे येणे सालअखेर पुरे करुन खुद्द खात्यांत जिरवितात ). खाते - न . ( जमाखर्च ) कच्चे खाते ( याचे देणे येणे सालअखेर पुरे करुन खुद्द खात्यांत जिरवितात ). ०लपव्या वि. तोंड लपविणारा ; छपून राहणारा ; दडी मारुन बसणारा . ०लाग पु. शिंगे असलेल्या जनावरांच्या तोंडास होणारा रोग ; यांत लाळ गळत असते . ०वळख स्त्री ( प्र . ) तोंडओळख पहा . ०वळण वळा नपु . चेहरा ; चर्या ; मुद्रा ; चेहर्याची घडण , ठेवण ; रुपरेखा ; चेहरामोहरा ; चेहरेपट्टी ; मुखाकृति ; मुखवटा . [ तोंड + वळ = रचना ] ०वीख न. ( ल . ) तोंडाने ओकलेले , तोंडातून निघालेले , विषारी , वाईट भाषण , बोलणे . [ तोंड + विष ] ०शिनळ शिंदळ - वि . अचकटविचकट , बीभत्स बोलणारा ; केवळ तोंडाने शिनकळी करणारा . ०शेवळे न. मुंडावळ . - बदलापूर २७७ . [ तोंड + शेवळे = शेवाळे ] ०सर क्रिवि . तुडुंब ; तोंडापर्यंत ; भरपूर . ०सरता वि. अस्खलित , तोंडपाठ न म्हणता येण्यासारखा ; अडखळत अडखळत म्हणतां येण्यासारखा ( श्लोक , ग्रंथ इ० ). - क्रिवि . घसरत , घसरत ; अडखळत ; चुका करीत ; कसेबसे ; आठवून आठवून . [ तोंड + सरणे ] ०सुख न. १ एखाद्याने केलेल्या अपकाराचे शरीराने प्रतिकार करण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे केवळ तोंडाने यथेच्छ शिव्यांचा , अपशब्दांचा भडिमार करुन त्यांत सुख मानणे . २ जिव्हा मोकाट सोडून वाटेल तसे बोलण्यांत मानलेले सुख ; यथेच्छ व अद्वातद्वा केलेले भाषण ; ( एखाद्याची ) खरडपट्टी काढणे , हजेरी घेणे ; ( एखाद्यावर ) शिव्यांचा , अपशब्दांचा भडिमार करणे . ०सुटका स्त्री. १ जिभेचा ( बोलण्यातील ) स्वैरपणा ; सुळसुळीतपणा ; वाक्चापल्य ; जबेफराशी ; ( भाषण इ० कांतील ) जनलज्जेपासूनची मोकळीक . २ भाषणस्वातंत्र्य ; बोलण्याची मोकळीक . ३ तोंडाळपणा ; शिवराळपणा . ४ ( पथ्य , अरुची , तोंड येणे इ० कांपासून झालेली ) तोंडाची सुटका , मोकळीक ; तोंड बरे होणे ; खाण्यापिण्याला स्वातंत्र्य . [ तोंड + सुटणे ] ०हिशेबी वि. अनेक रकमांचा मनांतल्या मनांत चटकन हिशेब करुन सांगणारा बुद्धिमान ( मनुष्य ); शीघ्रगणक . तोंडागळा वि . ( तोंडाने ) बोलण्यात , वक्तृत्वशक्तीत अधिक . की शेषाहूनि तोंडागळे । बोलके आथी । - ज्ञा ९ . ३७० . [ तोंड + आगळा = अधिक ] तोंडातोंडी क्रिवि . १ समोरासमोर ; २ बोलण्यांत ; बोलाचालीत . [ तोंड द्वि . ] तोंडाळ वि . १ दुसर्यावर तोंड टाकणारा ; शिवराळ ; भांडखोर . लटिके आणी तोंडाळ । अतिशयेसी । दा - २ . ३ . १० . २ बडबड्या ; वाचाळ . [ तोंड ] म्ह ० हाताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाही = शिवराळ माणसापेक्षा चोर पुरवतो . तोंडाळणे उक्रि . बकबक करुन गुप्त गोष्ट फोडणे ; जीभ पाघळणे . [ तोंडाळ ] तोंडातोंड क्रिवि . तोंडापर्यंत ; कांठोकांठ ; तुडुंब ; तोंडसर . तोंडोळा पु . तोंडवळा ; चेहरेपट्टी . [ तोंड + ओळा , वळा प्रत्यय ]
|