Dictionaries | References

आंतून

   
Script: Devanagari

आंतून     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
From the inside of or from within.

आंतून     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   &
prep   From within.

आंतून     

शअ . क्रिवि . आंतल्या बाजूनें ; अंतर्भागापासून ; बाहेरुनच्या उलट . [ आंत + हून ]
०पाय   - ( मल्लविद्या ) जोडीदार आपल्या पाठीवर आपणास धरतो त्या वेळेस आपण खालीं वांकून आपल्या दोन्ही पायांतून त्याचे पाय काढून घेणें . जोडीदार आपल्या पाठीवरुन आपणास धरतो तेव्हां आपण झटक्यानें खालीं वांकून आपल्या दोन्ही हातांनीं जोडीदाराचा पाय घोट्याजवळ धरुन वर उचलावा व तो उचलतांना आपण जोडीदाराच्या मांडीवर बसावें म्हणजे जोडीदार चीत पडतो .
काढणें   - ( मल्लविद्या ) जोडीदार आपल्या पाठीवर आपणास धरतो त्या वेळेस आपण खालीं वांकून आपल्या दोन्ही पायांतून त्याचे पाय काढून घेणें . जोडीदार आपल्या पाठीवरुन आपणास धरतो तेव्हां आपण झटक्यानें खालीं वांकून आपल्या दोन्ही हातांनीं जोडीदाराचा पाय घोट्याजवळ धरुन वर उचलावा व तो उचलतांना आपण जोडीदाराच्या मांडीवर बसावें म्हणजे जोडीदार चीत पडतो .
०पाय   , ओढणें - एखादें कृत्य करीत असतां दुसर्‍यानें त्यास गुप्तपणें विरोध - प्रतिबंध करणें . नानांचे पाय आंतून ओढण्याचा विसूभाऊंचा यत्न होता . - अस्तंभा ११२ .
मोडणें   , ओढणें - एखादें कृत्य करीत असतां दुसर्‍यानें त्यास गुप्तपणें विरोध - प्रतिबंध करणें . नानांचे पाय आंतून ओढण्याचा विसूभाऊंचा यत्न होता . - अस्तंभा ११२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP