Dictionaries | References ए एकाच लेंडाचे कुडके, एक परमाळता नी एक घाणता Script: Devanagari Meaning Related Words एकाच लेंडाचे कुडके, एक परमाळता नी एक घाणता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) [ लेंड = डुकराच्या विष्टेचे गोळे. कुडके = तुकडे) एकाच घाणीतील दोन भाग घेतले तर त्यांतील एकाचा गोड वास व दुसर्याची घाण, असे कधी होते का? दोन्ही सारखेच घाण. दोन्ही एकाच वस्तूचे घटकअसल्यानें परिणामदृष्टीनें सारखेच आहेत. एका गृहस्थाचे दोघे मुलगे कमी जास्त प्रमाणांत दुर्गुणी असले आणि त्यांची लायकी एका वाक्यात सांगावयाची असली म्हणजे या म्हणीचा उपयोग करतात. तु०-उडदामाजी काळे गोरे। काय निवडावे निवडणारें।। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP