Dictionaries | References

कथेतील कांदे कथेंत

   
Script: Devanagari

कथेतील कांदे कथेंत     

एका हरदासानें कीर्तन करीत असतां कांदे खाऊ नये असे सांगितले
पण घरी आल्‍यावर कांद्याची भजी खाल्‍ली. तेव्हां त्‍यास असे विरूद्ध आचरण कसे करतां? असे विचारल्‍यावर त्‍याने वरील उत्तर दिले. उपदेश करतांना जी गोष्‍ट सांगितली तिचा स्‍वतःच्या मनावर मुळीच परिणाम न होऊन ती आचरणांत न आणणारे काही लोक असतात. बोलतांना मोठा नीतीचा व धर्माचा आव आणावयाचा, पण करतांना उलट कृति करावयाची अशा लोकांसंबंधी ही म्‍हण वापरतात. तु०-पुराणांतील वांगी पुराणांत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP