Dictionaries | References

तांबूळ

   
Script: Devanagari
See also:  तांबूल

तांबूळ

  पु. विड्याच्या पानास चुना लावून , कात , सुपारी , वेलदोडा इ० घालून केलेली पट्टी ; विडा . तांबूले वोंठ रांऊ । हांसतां दांत दाऊं । - ज्ञा १३ . ५६३ . २ आपण चावून स्त्री , मूल इ० स देतात तो विडा . - शास्त्रीको . [ सं . तांबूल ]
०श्रावणी  स्त्री. गांवच्या महाजनास , देवस्कीकडे असलेल्या गांवच्या अधिकार्‍यास किंवा ग्रामदेवतेच्या इतर व्यवस्थापकास त्या गांवांत नुकतेच लग्न झालेल्या मनुष्याने देवतेप्रीत्यर्थ द्यावयाचा नजराणा , भेट . [ तांबूल + सं . श्रण = श्राणन = देणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP