Dictionaries | References

भीक

   
Script: Devanagari

भीक

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

भीक

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  लाचारपणान कितेंय मागपाची क्रिया   Ex. हांगा भीक मागप कांय लोकां खातीरचो वेवसाय जाला
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)act)">कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : भिक्षा

भीक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ? भिकेवर लक्ष्य ठेवणें To have an eye to beggary, i. e. to be indolent, unthrifty &c. भिकेवर श्राद्ध with करणें or होणें Shráddh made upon alms, i. e. poor or scanty shráddh. hence fig. any business conducted or work performed upon given or borrowed materials and in a poor way. hence भिकेवर श्राद्ध कोठें होतें? An exclamation in expression of one's conviction of any utter inadequacy or insufficiency.

भीक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  alms. want or lack.
भाक न घालणें   despise exceedingly.
भीक लागणें.   be in great demand
भिकेचा डोहळा  m  A mean, low (trick, act, desire) considered as a prognostic of approaching poverty.
भिकेर श्राद्ध करणें   any business conducted or work performed upon given or borrowed materials and in a poor way.

भीक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

भीक

  स्त्री. 
   भिक्षा ; दानधर्म .
   अभाव ; कमताई ; उणीव ; वैगुण्य . सर्व गोष्टीची भीक आहे . [ सं . भिक्षा ; प्रा . भिक्खा ] म्ह
   भिकेची हंडीं शिंक्यास चढत नाहीं .
   भीक नको पण कुत्रा आवर . ( वाप्र . ) भीक असून दरिद्र कां , भीक असून दारिद्र कां , भीक असून द्र्य कां - भिक्षेकर्‍याचा धंदा पतकरल्यावर मग अडचण कां सोसावी ?
०काढणें   क्रि . अडचण सोसणें ; दारिद्र्य अनुभविणें .
०घालणें   क्रि .
   ( ल . ) वचकून असणें . तो माझ्यावर आपला अंमल चालवूं पाहतो , पण मी कोठें त्याला भीक घालायाला बसलों आहे !
   मोजणें ; मानणें ; जुमानणें . बायकांच्या धमकावणीला कां तुम्ही भीक घालणार ?
   मागीतलेली वस्तु देणें ; एखाद्याची विनति मान्य करणें ( हा प्रयोग नेहमीं नकारार्थी असतो ). मीं त्याला परोपरीनें विनविलें पण त्यानें माझ्या शब्दाला भीक घातली नाहीं .
    घालणें - क्रि . अतिशय तुच्छ लेखणें .
०लागणें   क्रि .
   फार मागणी असणें ; अतिशय चणचणीचा असणें .
   भिकेस मिळणें ; कमताई असणें . भिकेचा डोहळा - पु . दारिद्र्य आणणारी हलकट , नीच , भिकार खोड , कृत्य , इच्छा . ( क्रि० लागणें , आठवणें , होणें ) भिकेचे डोहळे होणें - क्रि . दारिद्र्यादि दुर्दशा येण्यापूर्वी तदनुरुप पूर्वीच्या संपन्न स्थितीस विरुद्ध अशा वासना होणें ( ज्या प्रकारची संतति व्हावयाची असते त्या प्रकारचे डोहाळे - वासना गर्भारपणीं बायकांना होतात यावरुन ). भिकवर लक्ष्य ठेवणें - भीक मागण्याचा प्रसंग येईल अशा रीतीनें वर्तन करणें . आळशी , उधळा इ० बनणें . भिकेवर श्राद्ध - न . भिक्षेवर केलेलें श्राद्ध ; भिकार , चुटपुटीत श्राद्ध .
   ( ल ) दिलेल्या , उसन्या घेतलेल्या , तुटपुंज्या सामग्रीवर भिकारपणानें चालविलेला धंदा , काम . ( क्रि० करणें , होणें ). सामाशब्द -
०दुःख  न. भीक मागण्याची दुःखकारक स्थिति .
०पायली  स्त्री. गांवकर्‍यांकडून महारास दिलें जाणारें धान्य .
०बरी  स्त्री. भिक्षा ; धर्म . ( क्रि० मागणें ). [ भीक द्वि ] भीक बाळी भिक बाळी स्त्री . पुरुषांचा उजव्या कानांत घालावयाचा मोत्याचा दागिना . पूर्वी ही भिक्षा मागून मिळविलेल्या सोन्याची अथवा त्या पैशांचें सोनें घेऊन त्याची करीत .
०मागता   माग्या - वि . भिक्षा मागणारा ; भिकारी . म्ह० भीक मागत्या दहा घरें . भिकणें -
   भिक्षा मागून मिळालेली एखादी वस्तु ; भिक्षा . ( क्रि० मागणें ).
   जोशी , भक्त , उपाध्याय इ० कांस दिलेलें बक्षीस , इनाम .
   धर्मादाय .
   धर्मादाय म्हणूस सरकाराकडून घेण्यांत येणारा कर .
   बलुतेंअलुतें ; बलुतेदार इ० स धान्य देणें .
   जकातीच्या उत्पन्नांतील पतकीस दिलेला हक्क .
   भिकारीपणा ; दारिद्र्य . ( क्रि० लागणें ).

भीक

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP