|
पु. न. मोहोळ ; मधमाशांचें पोळें . मोहाची माशी - स्त्री . मधमाशी . मोहाचा मध , मेण - मोहोळाचा मध , मेण वगैरे . पुस्त्री . चेहरा ; हजामत . - बदलापूर ३७ . १०५ . [ मुख ] पु. एक वृक्ष ; याच्या फुलांपासून दारु काढतात . [ सं . मधु , मधुक ; प्रा . महु ; उरि . बं . महु ] मोहतेल , टेल - न . मोहटीपासून , मोहाच्या बियांपासून काढलेलें तेल ; मोहाळ . [ मोहटी + तेल ] मुर्च्छा ; बेशुद्धि ; चित्तभ्रम ; भुरळ ; भारणी ; मोहन ; भुलावण ; भूल . प्रेम ; माया , दया , कींव , सहानुभूति इ० ना चेतविणार्या विषयांचा क्षुब्ध लोभ ; मोहन . द्रोणाला दुःशासन कथितां दे भीष्म हानि मोहातें । - मोभीष्म ११ . १३२ . सदसदविवेकबुद्धीचा , जाणिवेचा लोप ; विस्मरण ; घोटाळा ; मतिभ्रम ; भुलवण . निजदोषें व्यसनातें पावुनि मोहीं निमग्न नससी कीं । - मोकर्ण १ . ६ . अज्ञान ; मूर्खपणा ; आत्मज्ञानाचा अभाव असल्यामुळें जगांतील सर्व विषय , सर्व दृश्य जगत खरें आहे असा भास होऊन त्याचा उपभोग व वैषयिक सुख घेण्याकडे प्रवृत्ति होणें . आवड ; शोक ; प्रीति ; प्रेमाचें वेड ; प्रेमाचा अतिरेक . परिभूपपुत्र मोहें केला पहिल्या परीस ही अंध । - मोरोपंत . चूक . [ सं . मुह ] मोहक - वि . भुरळ पाडणारें ; भ्रम उत्पन्न करणारें ; गुंतविणारें ; गुंगविणारें . आकर्षक ; रमविणारें ; चित्त हरण करणारें . [ सं . ] ०पाश पु मोहरुप जो पाश तो ; संसाराचें जाळें ; भ्रामक विषयांचें बंधन . मोहजाल पहा . ०यंत्र न. नळा ( शोभेच्या दारुचा ); फुलबाजी . मोहयंत्री सुमनमाला । अग्निपुष्पें भासती डोळा । फुलें म्हणती अबळा । पाहता डोळां ते राखा । - एरुस्व १५ . ११८ . मोहा , मोहाचा वि . मोहक किंवा उत्कृष्ट गुणाचा -( एक प्रकारच्या नारळाबद्दल किंवा सुपारीबद्दल उपयोग ). मोहाचा नारळ नारळी , माड , सुपारी पुस्त्री . ज्यांची गोडी इतर नारळ , सुपारीपेक्षां अधिक असते तो नारळ , सुपारी इ० . या नारळाचें खोबरें गोड असून तें खाल्ल्यावर चोथा रहात नाहीं ; सुपारीहि गोड असते . - कृषि ७०३ . मोहाथिणें क्रि . ( काव्य ) मोहनी पाडणें ; भुरळ किंवा भुलवण पडणें ; भुलून जाणें ; मोहीत होणें . अवश्य म्हणोनि तीर्थेश्वरी मोहाथिली अनुवादे । मोहाळणें क्रि . मोह पावणें . मोहित वि . मोह पावलेला ; भुललेला ; भुरळ पडलेला ; मोहानें व्याप्त असा ; लुब्ध . मोहरात्रि स्त्री . श्रावण वद्य अष्टमी . ( या रात्रीं कृष्णानें कंसदूतास मोह पाडला यावरुन ). मोहजाल , जाळ न . मायेच्या योगानें संसारांत उत्पन्न होणारा मोहाचा पाश ; संसाराच , जगांतील पसार्याचें जाळें ; कुटुंब , इष्टमित्र , मालमत्ता व इतर भ्रामक विषय यांची भूल , भुरळ . तां घेतले ये मज मोहजाळीं । - सारुह १ . १९ . मोहणें उक्रि . भुलणें ; व्यामोह उत्पन्न होणें , करणें ; भुलविणें ; भुलणें ; चित्त भ्रमणें , भ्रमविणें . मन मोहिलें नंदाच्या नंदनें । मोहन वि . १ मोहविणारें ; आकर्षक . २ भुलविणारें ; भूल पाडणारें ; भ्रामक . एक म्हणे कुब्जेनें लाविला चंदन । त्यांत कांहीं घातलें मोहन । तरीच भुलला जगज्जीवन । कौटिल्य पूर्ण केलें तिनें । - ह २१ . १७७ . - न . ( वैद्यक ) गुंगी आणणें ; भूल देणें ; बेहोष पाडणें . - ज्ञा १३ . ९९५ . भुरळ मूर्च्छा ; भ्रम . गुंगी , निद्रा आणणारें औषध . मोहनभूत - न . एक प्रकारचें भूत , पिशाच . मोहनमाळ , माला - स्त्री . सोन्याच्या मण्यांची गळ्यांत घालावयाची एक विशिष्ट माळ . मोहनास्त्र - न . एखाद्या इसमावर मोहनी टाकण्याचें अस्त्र ; जें शत्रूवर सोडलें असतां त्याला मूर्च्छा येते असें एक अस्त्र . मोहनी , मोहिनी - स्त्री . भूल ; भुलावण ; मोहन . मोह घालण्याचीं कृत्यें ; वश करण्याचीं किंवा भूल घालण्याचीं , भुलविण्याचीं कृत्यें ( क्रि० घालणें ). एखाद्यास भुलविण्याकरितां उपयोगांत आणण्याचे मंत्र . विष्णूनें अमृतमंथनाच्या वेळीं घेतलेलें सुंदर स्त्रीचें रुप . [ सं . मुह = बेशुद्ध होणें ] मोहिनी - स्त्री . मोहन ; प्रलोभन ; भुलवण ; भुरळणें ; चित्तभ्रम ; बुद्धिभ्रम ; मोह करणारी . समुद्रमंथनप्रसंगीं भगवंतानीं जें मोहिनीचें रुप घेतलें होतें तें ; भुरळ पाडणारी . कथा भुवन मोहिनी अशि न मोहिनी होय ती । - केका १०३ . [ सं . मुह ] मोहिरें - न . ( महानु . ) मोहक वस्तु ; मोहविणारें तो दाउनि माया वेषाचें मोहिरें । जेथ चरित्रें करी - ऋ ४२ .
|