|
स्त्री. ( ऊंस वगैरेस दिलेले ) पहिले पाणी . जींत पेरणी केली जाते अशी , वहीत जमीन . लागवडीखालची जमीन . लागणजमीन , लागणशेत , लागणवावर . लागवड ; जमीनीची वहिवाट . पिशाच्चबाधा . बाधा ; रोगग्रस्तता ; देवी , अमांश , कॉलरा , प्लेग इ० नी पछाडलेली माणसे , जनावरे इ० ; किंवा अशांची संख्या . - न . ( कों . ) एकदां पीक घेऊन पुन्हां पीक घेण्यासाठी पहिल्या जाग्यावरुन उपटून दुसरीकडे लावतात ते झाड ; फांदी ; रोप . मला मिरचीची २५ लागणे ठेव . [ लागणे ] ०दार वि. मिरासदार ; ठिकाणदार ; जमीनीचा मालक . जमीन प्रथम लागवडीस आणणारा . जमीन करणारा ; ( मालक , खंडकरी ); प्रत्यक्ष जमीनीत राबणारा . ( ल . ) उपकारबद्ध ; ऋणको ; मिधा ; जो एखाद्याचे कांही देणे लागतो असा . मी कोणाचा लागणदार नाही .
|