Dictionaries | References

संपादणी

   
Script: Devanagari
See also:  संपादणूक

संपादणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

संपादणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Acquiring; accomplishing. Supporting a part assumed.

संपादणी

  स्त्री. १ अर्जन ; मिळविणें ; पैदास ; कमाई ; साधना ; सिध्दि . २ बतावणी ; निर्वाह ; निभावणूक ; वेळ मारून नेणें ; पुढें केलेली सबब , सोंग पार पाडून नेणें , निभावणें . आपुलेचि बोल वाउगे । त्याची संपादणी करणें लागे । - दा १ . ६ . २१ . तुम्ही लटक्याच वार्ता सांगोन । संपादणी करतां गे । - ह २७ . १८ . समर्थपणें हे करा संपादणी । नसतेंचि मनीं धरिल्याची । - तुगां १२९९ . ३ नक्कल ; सजावट ( हरिदास एखाद्या गोष्टीची करतो तशी ); योग्य तर्‍हेनें उभारणी . ४ पात्राचें सोंग ; सोंगाची बतावणी ; हुबेहुब नक्कल ; सोंगास अनुसरून हावभाव . नट जेंवी करी जाया वेषें संपादणी . । - सिसं ५ . १४३ . ५ व्यवस्था ; समारंभाची साधना , सिध्दि ; योग्य तर्‍हेनें कार्याची उठावणी , पार पाडणें . [ सं . सम् ‍ + पद् ‍ ] संपादणें - उक्रि . १ अर्जन करणें ; मिळविणें ; प्राप्त करून घेणें . २ सिध्दि करणें ; तडीस नेणें ; पार पाडणें ; उरकणें . ३ बतावणी करणें . नट नाटय बरें संपादूं जाणसी वो । - तुगा १४२ . संपादन - न . १ संपादणें ; मिळविणें ; जोडणें ; प्राप्ति . २ सिध्दि ; साधना ; कार्यपूर्ति . ३ बतावणी ; निभावणी . संपादनी , संपादनूक - वि . संपादणी , संपादणूक पहा . संपादित - वि . मिळविलेलें ; प्राप्त ; सिध्द .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP