-
वि. १ चकचकीत ; चकाकणारें ; चक्क . २ ( ल . ) ( सढळपणानें ) सुंदर ; छान ; झोंकदार ; दिखाऊ . झक्क पहा .
-
f Sealed or closed state of the eyes. Giddiness. Thick, dark, and overspreading shade (of clouds), trees &c.
-
स्त्री. १ ( रत्नें , दागिने , धातु , रंग इ० कांची ) चमक ; चकाकी ; झकाकी ; तेजस्विता २ ( सोपें , रुपें इ० कांचा ) मुलामा ; जिल्हई . ३ पावसाची जोराची सर . ( क्रि० येणें ). ४ पक्ष्यांची झुंड ; ( टोळ इ० कांची ) धाड ; पक्ष्याची झडप ; झाप . ( क्रि० येणें ; पडणें ; मारणें ). वरौनि कापूरकेळीं । भ्रमरांची झांक ऊठिलीं । - शिशु ६०५ . ५ ( उन्हाची ) तिरीप ; झळ ; ऊन किंवा थंड हवेचा मारा . ( क्रि० लागणें ; बसणें ; येणें ; वरून जाणें ). ६ ( ल . ) चुंणूक ; भास ; लकेर . दुष्काळामुळें कहर उसळला नाहीं तर त्याची झाक मात्र दिसली . - विवि ८ . ७ . १३५ . ७ झुळूक ; छटा . म्हातारपणाची झाक मारते . ८ इतर अर्थी झांक पहा . [ झक ]
-
स्त्री. १ ( भूतबाधा , पित्त , उपासमार यांनी डोळयावर येणारी ) झांपड ; झाप ; तंद्रा . ( क्रि० पडणें ; येणें ; घालणें ). २ चक्कर ; भोंवळ ; घेरी . ३ ग्लानि ; गुंगी ; सुस्ती ; डोळे जड होणें व तारवटणें . ( क्रि० येणें ). ४ ( ढग , झाडें इ० कांची घनदाट ) अंधेरी ; छाया ; झांपड ; काळोख . ( क्रि० घालणें ; पडणें ). पावसानें झांक घातली परंतु पडत नाहीं . [ झांकणें पहा . तुल० गु . झांख = अंधेरी , काळोख ]
Site Search
Input language: