Dictionaries | References

कांटे

   
Script: Devanagari

कांटे

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  सूय वा खिळो हांचे भशेन तोंकाची वस्तू   Ex. रामान वंयेक कांटे लायले
HYPONYMY:
नांगी घडयाळीचे कांटे साळी-कांटो
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

कांटे

  न. १ पावसाळ्यांत उप्तन्न होणारा लहान किडा ; काट अर्थ १ पहा . काणीट . २ जोंधळा तूर पिकणारी काळी जमीन , जोंधळ्याची एक जात . - नामको
  पु. कंटक ( अव .)
०आसण  पु. एक जातीचें कांटेरी झड .
०कडी  पु. कड्या असलेला लगाम कांटे लगामाचा एकप्रकार लगाम पहा .
लगाम  पु. कड्या असलेला लगाम कांटे लगामाचा एकप्रकार लगाम पहा .
०कणंग  न. कणगर फळ .
०कुट्याचा   सराट्याचा - वि . कांटेरी ( झाडझुडुप ); कटि असलेला ; कंटकयुक्त .
०कुयरी  स्त्री. कुयरीची एक जात . कुव ( वा ) - कुवारी - कोरफड - स्त्री . कोरफड ; कुवारकांडें . ( कंटक + कुमारी )
०कुवळा  पु. एक झाड . लॅ . सायडेरोक्झिलॉन टोमेन्टोसम .
०केकत   ती . पुस्त्री रानकेवडा ; घायपात . ' काटे केकतीचे झाडाला आंत जन्मला केवडा । '
०कोर वि.  कडक ; तडीस नेण्यांत , अमलांत आणण्याचे कामीं शिस्तवार ; निष्ठुर . २ रेखलेला ; नेमका ; बरोबर ; बिनचुक ; रीतसर रतिभरहि चुक नाहीं असा ; मेहनतीनें केलेला . ३ बाईक सुक्ष्म , नाजुक जेथें तिळाएवढी हिचुक खपायाची नाहीं असें ( काम ) - क्रिवि . बरोबर ठाकठिकीनें योग्य प्रमाणांत करणें , वर्तणें . ( कांटा + कोर )
०कोहळ   कोहळ - न . ( व .) कोहळा , कोहाळा .
०गहुं  पु. ( व .) गव्हाचा एकप्रकार ( आकोला , खामगांव या भागांत होतो .)
०गारी  स्त्री. छाटाछाटी ; कापाकापी . ( काटणें )
०घर  न. ज्याचें अंगावरील कवच कांट्यांनी व्यापलें आहे असा किडा . ' कोसले अथवा कोट घरें । नाना पृष्ठिभागीं चालती घरें । - दा . ९ . ७ . ४ .
०चिर्णी  स्त्री. ( गो .) कुळकण्यांचा भत्ता .
०चुंबक   पुन . विलायती किंवा पांढरा धोत्रा . उंटांना हा फार आवडतो . हा चेंचून कांटा मोडलेल्या जागीं बांधला असतां कांटा बाहेर निघतो .
०डोळें  पु. ( अव .) अतिशय खुपतात अशाप्रकारे डोळे येणें . याच्या उलट शेणेडोळे , हे नुसते सुजतात व अतिशय पु येतो .
०तोल वि.  अगदी बरोबर वजन असलेला ; काट्यांने तोललेला ; विनचुका ; बरोबर नेमका . २ फार नाजुक .
०धोत्रा  पु. पिवळा धोत्रा . विलायती धोतरा . हें झाड दोन हात उंचीएं असुन त्यावर सर्वत्र कांटें असतात . बीं बंदुकांच्या दारुपमाणे काळें असतें व मुळास चौक म्हणतात . इं . यलो स्टँमोनियम . - वगु २ . ३१ .
०बुरड  स्त्री. ( गो .) पुष्कळ कांटे असलेली मासळी .
०भाजी  स्त्री. एक पालेभाजी , कांटेमाठ ( लँ ) अमरंथस स्पिनोसस .
०भोंवरी  स्त्री. ज्याचें फळ भोंवर्‍या प्रमाणें असून त्यास कांटे असतात असे एक कांटेरी झाड .
०मोडणावळ  स्त्री. १ शेतांच्या जमीनीची पाहाणी करीत असतां मामलेदाराच्या पायांत कांटा मोडल्यामुळे घरटीं जोअ दंड वसुल करण्यात येत असे तो . - मोल . २ कदाचित कांटेरी झाडेंझुडपें तोडून टाकण्याकरितां त्यांवर बसविलेला सरकारी कर .
०रा   री - वि . कांट्यांनी भरलेली , ज्यावर कांटे आहेत असा . - पु . एक लहान कांटैरी झाड . याला पांढरी सुंदर फुलें येतात .
०रिंगणी   स्त्री एक कांटेरी , जमीनीसरपत वाढणारें झुडुप याला वांग्यासारखें फळ येतें ते औषधीं आहे .
०री वि.  कांट्यांनी भरलेलें ०रीतार - जिला लोखंडाचें कांटे मधून मधुन बसविलेले असतात अशी कुंपणास बसविलेले तार . इं . बार्ब्डवायर .
०रें  न. ( राजा .) कंटकयुक्त करवंदीचें वगैरे शिरें , फांदी .
०लगाम  पु. कंटकयुक्त लगाम .
०वन  न. अरण्य , जंगल ( ज्यांत कंटेरी झाडे पुष्क्ळ आहेत असें ).
०वाळिक  न. ( क .) कांटे असलेलें वाळुक .
०शेवती  स्त्री. शेवंती नावाच्या फुलझाडाची एकजात पांढरी शेवती गुलाबी शेवंती अगर शेवंतीगुलाब . गुलाबाप्रमाणें हिच्या झाडास कांटे असतात . याची पानें गुलाबाप्रमाणें कात्रेदार असून त्यास राखडीच्या आकाराचें लहानएक पाकळीच्या घेराचें पांढरे फुल येतें . ही झाडें हिमालयांत होतात . - वगु . २ . ३२ . - तीप्र - ४० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP