|
स्त्री. १ डाळ ; द्विदल धान्य भरडून , फोलकटे काढून तयार करितात ती . २ दाळकण ; चुरी . ३ डाळीचे वरण . [ सं . दल ] ( वाप्र . ) पु. ( गो . ) एकावर एक लावून , रचून ठेवलेल्या वस्तूंचा समुदाय ; चळत . डाळणे पहा . दाळचे - सक्रि . ( गो . ) ( वस्तु इ० ) एकावर एक रचून ठेवणे ; डाळणे . घरांत आणल्यानंतर सर्व भारे भिंतीला टेकून दाळून ठेव . [ गो . दाळ = चळत ] ०गळणे शिजणे विकणे ( एखाद्याच्या ) लबाड्या , कावे , कपट , डावपेंच इ० फलद्रूप होणे ; भरभराटीस येणे ; काम साधणे ; लाग लागणे . सामान्यतः अकरणरुपी योजितात ( एखाद्याने ) दाळ नासणे व्यर्थ खाऊन गमाविणे १ ( मूल , बायको इ० कानी ) निरुपयोगी आळशी बनणे , २ उर्मट , बेमुर्वतखोर बनणे . आपल्या पोळीवर दाळ ओढणे स्वतःचाच फायदा करुन घेणे ; स्वार्थी , आपलपोटे बनणे . सामाशब्द - ०कण चुरी पुस्त्री . दाळीचे कण , चूर . ०गपु वि. १ डाळभात गट्ट करणारा . २ ( ल . ) गलेलठ्ठ ; लठ्ठनिरंजन ; मूर्ख . रजोगुणाचा पडला पडप । अवतारिकाचे नेणतां स्वरुप । दाळगपु हा वदतां भूप । अववे हांसती विनोदी । - दावि २५४ . [ दाळ = अन्न + ध्व . गप = खाण्याचा आवाज . ] ०गोटा पु. डाळींतील न भरडला गेलेला सबंध दाणा , गोटा . [ दाळ + गोटा ] ०पिठिया वि. अतिशय सौम्य स्वभावाचा ; गरीब ( मनुष्य ). [ दाळ + पीठ ] ०पीठ रोटी नस्त्री . साधे जेवण ; ( पोटाला अवश्य असलेली ) भाजीभाकर . ( क्रि० देणे ; चालविणे ; मिळविणे ). ०भाजी स्त्री. डाळ घालून केलेली भाजी ०भोपळा पु. भोपळा घालून केलेले डाळीचे वरण , आमटी ; डाळ घालून केलेली भोपळयची भाजी . ०वांगे न. वांगी घालून केलेले डाळीचे वरण .
|