Dictionaries | References न नवस Script: Devanagari Meaning Related Words नवस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 नवस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A vow.नवसकरणें To pray and vow for; to seek with all earnestness.नवस पुरणें To have one's vow answered or complied with.नवस फेडणें To pay or fulfil a vow.नवसास पावणे To meet and grant the object of a vow.नवसें मागितलें मुळावर आलें I have vowed and prayed (for a child &c.), and it is come into the मूळनक्षत्र (so that I must die). Said when a thing insistingly prayed for proves to be one's bane. नवस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun इच्छित कार्य सिद्धीस जावे म्हणून देवाची प्रार्थना करून कार्यसिद्धी झाल्यास देवाला वस्तू अर्पण करण्याची प्रतिज्ञा Ex. गावकरी इथल्या पीराला नवस बोलतात ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকামনা gujમાનતા hinमन्नत kanಮುಡಿವು kasنِیاز kokआंगवण malവഴിപാട് oriଯାଚଜ୍ଞା panਸੁੱਖ telమొక్కుబడి urdنذر , منت , نیاز , صدقہ नवस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ इच्छित कार्य सिद्धीस जावे म्हणून देवाची प्रार्थना करुन कार्यसिद्धि झाल्यास देवास ( एखादी ) वस्तु अर्पण करण्याची प्रतिज्ञा . दूर प्रिय जन वसती । देखाया करिति नित्य नवस नव सती । - मोकृष्ण ४७ . ७७ . २ त्या प्रतिज्ञेतील अर्पणविषयभूत पदार्थ . [ सं . नमसित ; प्रा . णमसिअ ; णवसिअ . ( सं . नमस = अनुकूल ; कृपादृष्टियुक्त ) ] म्ह ० ( व . ) नवसाचा भोपळा चारीवाटा मोकळा = नवस करुन झालेल्या मुलाच्या दुर्वर्तनाबद्दल म्हणतात . २ जरी नवसे पुत्र होती । तरी कां करावा लागे पती । - तुगा . ( वाप्र . ) ( एखादी गोष्ट इ० काविषयी - बद्दल - करितां - साठी - स्तव , एखाद्या गोष्टीचा ) नवस करणे - एखादी गोष्ट सिद्धीस नेण्याबद्दल ईश्वरास प्रार्थणे व कांही वस्तु अर्पण करण्याचा संकल्प करणे . २ ( ल . ) ( एखाद्या गोष्टीबद्दल ) मोठ्या उत्कंठेने याचना करणे ; ती गोष्ट अत्यंत उत्सुकतेने इच्छिणे .०देणे ( व . ) मार देणे .०पुरणे ( एखाद्याचे ) इष्ट कार्य ( नवस केल्यामुळे ) सिद्धीस जाणे .०फळास - इष्ट मनोरथ सिद्धीस जाणे . आजि पुरले नवस । - तुगायेणे - इष्ट मनोरथ सिद्धीस जाणे . आजि पुरले नवस । - तुगा०फेडणे नवस फळाला आल्यावर , पूर्ण झाल्यावर देवास वस्तु इ० अर्पण करण्याची जी प्रतिज्ञा केली असेल ती पार पाडणे . - साचा वि . नवसाने प्राप्त झालेला मुलगा . ( हा पुढे वाईट निघाल्यास त्याला उद्देशून योजण्याचा वाक्प्रचार ). - सास पावणे ( नवस केलेल्या देवतेने नवस करणाराचे ) मनोरथ पूर्ण करणे . नवसे मागितले , मुळावर आले ई मुलगा व्हावा म्हणून नवस केला त्याप्रमाणे मुलगा झाला पण तो आईबाबांच्य मुळावर आला या अर्थी ) अतिशय उत्सुकतेने इच्छिलेली वस्तु नुकसानकारक झाल्यास हा वाक्प्रचार योजतात ; ( व . ) नवसाचा नार्या . सामाशब्द -०देव पु. ज्यास नवस केला असेल तो देव ; नवसाला पावलेला देव . वृद्धाचारीचे पूजिले देव । नवसदेवाहि दिधले गौरव । - दावि ३३ .०नवसणे नवस करणे ; नवसण पहा . कवण नवस नवसूं आतां । कृष्ण नाथ प्राप्तीसी । - एरुस्व २ . ४२ .०सायास पु. ( एखाद्या कार्याच्या सिद्धीकरितां करावा लागणारा ) नवस ; ईश्वराधना व शारीरिक कष्ट इ० ; दुःखकष्ट ; हालअपेष्टा ; प्रयत्न इ० . [ नवस + आयास ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP