|
स्त्री. स्त्री. बाहु ; हात . आदिशून्य तरोनि जावें । कैउतें बाहीं । - ज्ञा १० . १७८ . [ सं . बाहु ] ( खांद्यापासून मनगटापर्यंतचा ) सबंध हात . अंगरख्याचा हात ; अस्तनी . रक्तवस्त्रें भिजली बाही । - ऐपो १६१ . दाराच्या चौकटीचे दोन बाजूचे दोन उभे खांब . दारापासीं येवोनि त्वरित । बाह्यांसि लाविले दोन्ही हस्त । - महिकथा ५ . २३ . बाजू . कुंचे ढळती दोहीं बाहीं । - तुगा २७८ . ( व . ) मत ; बाजू . आमच्या बाहीं तो मेला . ०देणें खांदा देणें ; मदत करणें ; हातभार लावणें . ०धरल्याची धरणें - आश्रयास आलेल्याचें धर्मबुद्धीनें रक्षण करणें ; त्याची बाजू घेण्यांत अभिमान धरणें . बाह्या थापटणें , पिटणें , मारणें - लढण्याला तयार असल्याबद्दल दंड थोपटणें ; कुस्तीला तयार असणें . बाह्या फुरफुरणें , बाही फुरफुरणें , फुरारणें , उसासणें , उडणें - अंगांत लढण्याची खुमखुमी येणें ; मारामारीला उत्सुक असणें . लाज धरणें - आश्रयास आलेल्याचें धर्मबुद्धीनें रक्षण करणें ; त्याची बाजू घेण्यांत अभिमान धरणें . बाह्या थापटणें , पिटणें , मारणें - लढण्याला तयार असल्याबद्दल दंड थोपटणें ; कुस्तीला तयार असणें . बाह्या फुरफुरणें , बाही फुरफुरणें , फुरारणें , उसासणें , उडणें - अंगांत लढण्याची खुमखुमी येणें ; मारामारीला उत्सुक असणें . ०दार वि. पाठीराखा ; मदत करणारा ; बाजू घेणारा . हमी देणारा ; जामीन होणारा , राहणारा . ०दारी स्त्री. मदत ; पाठिंबा . जामिनकी ; हमी ; जिम्मेदारी . ( क्रि० करणें ). ०दुट्टा पु. चोळीच्या बाह्या होण्याइतका खणाचा किंवा कापडाचा तुकडा . चोळीच्या दोन्ही बाह्या , अस्तन्या . ०बळ न. मन गटांतील ताकद ; शरीरसामर्थ्य ; बाहुबल .
|