Dictionaries | References

वहिवाट

   
Script: Devanagari

वहिवाट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   of his conduct of affairs. 4 business, traffic, dealing. 5 Enjoying, using, wearing; enjoyment, use, wear. Ex. शंभर वर्षें ह्या वृत्तीची व0 मी करीत आलों; शालजोडी नेहमी वहि- वाटींत पाहिजे नाहीं तर कसर लागेल. 6 practice. Ex. तिकडेस जाण्यायेण्याची आमची व0 नाहीं मग ते कोठून अढळतील. 7 intercourse, conversancy or familiar acquaintance with.

वहिवाट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Administation or management of. business. using. practice. intercourse.

वहिवाट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन   Ex. आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.
   see : परंपरा

वहिवाट

  स्त्री. 
   कारभार ; व्यवस्था ; ( काम , धंदा इ० ) चालविण्याचा व्यापार . दिवाणगिरीची वहिवाट आम्ही करुं आणि जकातीची वहिवाट ते करतील .
   कारभारांतील , व्यवस्थेतील कौशल्य , हातोटी .
   कारभाराचा अहवाल ; कामाची नोंद ; वहिवाटपत्र .
   व्यवहार ; धंदा ; दळणवळण .
   उपभोग ; वापर ; भोगवटा . शंभर वर्षे या वृत्तीची वहिवाट मी करीत आलो . शालजोडी नेहमी वहिवाटींत पाहिजे , नाहींतर कसर लागेल .
   चाल ; रिवाज . तिकडेस जाण्यायेण्याची आमची वहिवाट नाही , मग ते कोठून आढळतील ?
   जाणेयेणे ; परिचय ; सहवास . [ सं . वह + वृत ; प्रा . वहावट्ट ]
०दार  पु. 
   कारभारी ; व्यवस्थापक ; ( इं . ) मॅनेजर . केसरी छापखान्याचे वहिवाटदार रा० धोंडोपंत विद्वांस यांजकडून २॥ हजार रुपये घेण्यांत आले . - के १० . ६ . ३० .
   प्रतिनिधी ; मुख्यत्यार ; एजंट ; मालकासाठी जबाबदारीने काम पाहणारा .
   ( वतनी कायदा ) वतनदारांपैकी प्रत्यक्ष काम पाहणारा वतनदार .
   ( गु . ) मामलेदार ; वसूलीकामगार .
   ( कायदा ) कोर्टाने नेमलेला कारभारी ; रिसीव्हर .
०हक्क  पु. ( कायदा ) चालू वहिवाटीने , भोगवट्याने प्राप्त होणारा हक्क . ( इं . ) प्रिस्क्रीप्शन . वहिवाटणे अक्रि .
   सहवास , संबंध , वहिवाट ठेवणे ; व्यवहार करणे . असा चोरा मोरा किती दिवस वहिवाटणार ? - सूर्यग्न १२९ .
   पार पडणे ; निभावणे ( संकट , नोकरी , वहिवाट इ० त ). म्हणूनीयां काळजी फार वाटे । कसे मोठे हे विघ्न वहीवाटे । ०कीर्तन १ . ६० .
   वहिवाटीखाली चालणे ; ताब्यांत , दिमतीत असणे . ती खोली त्या तिघांच्या वहिवाटीस लागली होती . विवि ८ . २ . २८ .
   संवय होणे . हा घोडा लष्करांत वहिवाटलेला आहे . - उक्रि .
   कारभार पहाणे ; व्यवस्था करणे , चालविणे . सरकारी हुद्देही त्याने सचोटीने वहिवाटल्यावरुन त्याचा लौकिक वाढत चालला . - नि २८२ .
   वापरणे ; उपभोग घेणे ; वहिवाट करणे .
   ठेवणे ; कामाला लावणे ; सरावाचा करणे .
   निवारणे ; बाजूला सारणे ( संकट इ० ).
   उपभोग घेणे ( स्त्रीचा ). वहिवाटी , वहिवटी - वि . वहिवाटींत , रोजच्या उपयोगांत असलेला ( दागिना इ० ). - स्त्री . वहिवाट . - ज्ञा ११ . ४ . २६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP