देवीची आरती - शिव मनभ्रमर कमलिनी ज...
देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.
शिव मनभ्रमर कमलिनी जय आदीशक्ती ।
षण्मुखगज मुखनती जय जय अव्यक्ती ॥
भवगद मेषजलतिके दासप्रिय भक्ति ।
रचत मसत्वां न कळे अगम्य तव शक्ति ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय जय श्रीअंबे ॥
ओवाळूं आरती तुज भावे जगदंबे ॥ धृ. ॥
मोठा दुष्ट महीतळिं महिषासुर झाला ।
फोडुनि निर्जरप्रतिमा त्रासवि विप्राला ॥
भोगित सुंदर स्वबळे नृपतींच्या बाळा ।
हरिहरब्रह्मा पाहुनि पळताती ज्याला ॥ जय. ॥ २ ॥
त्रासविले गोब्राह्मण हे तुजला कळलें ।
तत्क्षणिं भक्त हितास्तव प्रेंमळ मन वळलें ॥
अरिचमुमंडळ भडभड तव क्रोध जळलें ।
चरणतळें महिषासुर घुंगरडें माळिलें ॥ जय. ॥ ३ ॥
होउनि विजयी निर्जर स्थापियले स्वपदा ।
ऎसी तूं निजदासा नेसी दिव्य पदा ॥
अनन्य चिंतुनी तुजला गाती नित्य पदा ।
दास म्हणे त्यां विपत्ति बाधेनास कदा ॥ जय. ॥ ४ ॥
N/A
References : N/A
Last Updated : August 30, 2012
TOP