मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
कामक्रोधदिक वैरी धूप...

देवीची आरती - कामक्रोधदिक वैरी धूप...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.


कामक्रोधदिक वैरी धूप जाळीतों ।
जंव जंव धूप जळे तंव तंव सुवास निघतो ॥ १ ॥
अनादि आदि माया ब्रह्मणि पंचारती करितो । 
पंचप्राण पंचक तत्वे पंचदेहसह तो ॥ धृ. ॥
त्रिविधताप त्रिकाळदीप सन्मुख लावीतों ।
शोक भय चिंता दैन्य स्वरूपी मावळतो । अनादि. ॥ २ ॥
उपहाराते भक्ती भावादिकांसी ठेवीतो ।
दया क्षमा शांति नमुनी नैवद्य देतो ॥ अनादि. ॥ ३ ॥
अमृतपान सत्रावी आणि प्रेम अर्पितो ।
अष्टांगे नमुनी मानस पूजा उल्हासें करितो ॥ अनादि. ॥ ४ ॥
आनंदाने सच्चिदानंदपरब्रह्म वाहतों ।
सगुण स्वरुपीं शांतादुर्गा कुळदैवत ध्यातो ॥ अनादि. ॥ ५ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP