देवीची आरती - ओंवाळू आरती । महामाय...
देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.
ओंवाळू आरती । महामायापायीं प्रीति ॥
मनोभावें पूजा भक्ती ।अर्पूनियां हो ॥ धृ. ॥
सहस्त्रारी नानापरी । विचित्र कल्पोनि देव्हारीं ॥
विविधमनोपचारें बरी । पूजा द्रव्यानें हो ॥ १ ॥
पुष्पांजळी प्राणमेळा । जिवाशिवासहमेळीं ॥
सूक्ष्म काया पायाकमळी ।वाहोनिया हो ॥ २ ॥
कांही घडो काया पडो ।परि हें ध्यान न विसंडो ॥
तारो मारो अथवा बुडो ।दास हा हा अनन्य न्यायी ॥ ३ ॥
N/A
References : N/A
Last Updated : August 30, 2012
TOP