मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
सद्‌गुरु सदय द्विदळी वसतो...

देवीची आरती - सद्‌गुरु सदय द्विदळी वसतो...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.

सद्‌गुरु सदय द्विदळी वसतो स्वयंज्योतिरुपा ।
दर्शन घेतां जीव शिव ऎक्यरूपीं पाहा ॥ १ ॥
जय जगदंबे सुखकर अंबे आरती करितों हे ।
प्रणवापासुनी द्विदलकमळी ओंवाळीन पाहे ॥ धृ. ॥
पंचप्राण पंचभूतात्मी पांचापंचवीस तो ।
सर्वत्रीं तो अधिकारी झाला सहजचि तो ॥ जय. ॥ २ ॥
मणिपुरद्वीपी सहस्त्रदळी जे श्री महामाया तूं ।
चैतन्यरुपी कर्ता कारण प्रकृतिपुरुष तूं ॥ जय. ॥ ३ ॥
सदाशिवजिवरूपी आत्मा समदृष्टी पाहासी ।
आनंद असती गुणप्रतापी परमानंदें वससी ॥ जय. ॥ ४ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP