देवीची आरती - आवाहन ध्यान निवेदुनि आसन ...
देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.
आवाहन ध्यान निवेदुनि आसन ।
अर्ध्य पाद्यपूजा अर्चन वंदन ॥ १ ॥
जय जय आरती त्रिभुवनमाते ।
तन मन कुर्वंडी तव परि शांते ॥ धृ. ॥
आभरणादी चिरे सुमनधन ।
धूप दीप फल तांबूल अर्पण ॥ जय. ॥ २ ॥
वीणा टाळ मृदंग सुशोभित ।
उजळोनी आरती गाइन नाचत ॥ जय. ॥ ३ ॥
मंत्रपुष्पें बहु आणि प्रदक्षिणा ।
दिर्घ दंडवत आत्मनिवेदन ॥ जय. ॥ ४ ॥
शंकरसरस्वती वरदप्रसंगें ।
मोरेश्वर नामी तन्मय रंगे ॥ जय. ॥ ५ ॥
N/A
References : N/A
Last Updated : August 30, 2012
TOP