श्रीभानुदासांचे अभंग - फुगडी

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्री कृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


८५

ऐक साजनी वो बाई । तुम्हा एवढें थोर नहीं । भाव केला घरजांवाई । खावयासी तूप सेवाई ॥१॥

फु फु फु फु फुगडी गे । तुम्ही आम्ही खेळु दोघी गे ॥ध्रु०॥

प्रपंच केला गोड सगळा गे । ज्ञान फुगडीवर समला गे । प्रेम तिचा चांगट गे सुदंर पहाता अलगट गे ॥२॥

शांती सोयरी सखी माझी गे । तिची बरी संगत काजी गे । तिचा हात धरितां गेली माझी गे । मोह ममतेची बीज माजी गे ॥३॥

फुगडी खेळतां हाता शिणला गे । अंतरीचा द्वैत भेद गेला गे । हृदयीं प्रकटला ज्ञानदीप गे । गेली अज्ञानाची झोंप गे ॥४॥

दया क्षमा तिची बहीण गे । तिशी म्यां धरीले कवळुन गे । फुगडी खेळतां आला शीण गे । गरगर भोंड गेली जिरुन गे ॥५॥

ऐशी फुगडी खेळले गे । परब्रह्मी सुख आगविले गे । भानुदास म्हणे रंगलों गे । जन्ममरण हरलों गे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP