श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग ७

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


अंगुष्ठप्रमाण रारा यंत्र । उर्ध्व लक्षुनि अर्घमात्र ।

भेदिला मसुरप्रमाण नेत्र । चिन्मय स्वरुप पहावया ॥७॥

टीका

पंचमातृकांचेवर । पाहिलें हे रासायंत्र । ज्या उपरि अर्धमात्र । चित्कला ते ॥१॥

जेथ आकाशाची लावणीं । जालीं दृश्याची पेरणीं । श्वेतश्याम कलारुपिणी । शीत उष्ण ॥२॥

अर्धमात्रेचिया अरुते । रारा यंत्र पाहिलें तें । त्याचे तेजें अर्धमात्रेते । लक्षिले उर्ध्व ॥३॥

ललाटाचिया तटी । ब्रह्मारंघ्राचे ऐलपटी । रारायंत्र चित्कळा दिठी । अंगुष्ठमात्र ॥४॥

जेतुंली पहातां हंसस्थिति । तेजोरुपत्मप्रचीति । सोहं हंसाची अनुवृत्ति । उजाळली ॥५॥

प्राण पातला हंसगति । म्हणोनि चालिली अनुवृत्ति ऐशी साक्षात्कार स्थिति । तेजोमय ॥६॥

तेणें लक्षिली अर्धमात्र । साक्षी आत्मा जो स्वतंत्र । तेणें भेदिलासे नेत्र । मसुरप्रमाण ॥७॥

आपणासि पहाया आपण । भेदिलेंसें शुन्यपण । जेणे आथिलेअसेंद्वैतैपण । आत्मसुखा ॥८॥

मग ते चिन्मय पडले गांठी । पाहतां शुन्यांचें शेवटी । नीलबिंदुमात्र दृष्टी । लक्षितांचि ॥९॥

जेथ पहाणें विसावलें । गगनाचें देखणें आटलें । पहाणेपण तें निमालें । सकळ दृश्य ॥१०॥

जरि का उदयीं जाय तरंग । तरी सिंधु तो अभंग । लक्ष्य लक्षतां प्रसंग । उरेल कायीं ॥११॥

लक्ष्य लक्षी स्थिरावले । तरी तें अलक्ष्यचि जालें । जेणें स्वरुप देखिलें । चिन्मयाचे ॥१२॥

चंद्रसुर्य शिणले नयन । जेथ गेले हारपोन । चैतन्य विश्रांतिकारण । पातलें जेथ ॥१३॥

जीवनांचे करोनि मंथन । जे निर्गुणाची जले सगुण । सोहंतत्वीं गगनीं गहन । भरोनि ठेलें ॥१४॥

नीलबिंदूचिया पोंटीं । चिंदकाशाचिये दिटी । चिन्मय स्वरुपाची गोठीं पहातां दिसे ॥१५॥

जीवशिवांची मिळणी होवोनियां सोहंगगनीं । जीवन प्रगट सगुणपणीं । चिन्मय ते ॥१६॥

तेथ साक्षात्कार स्वरुप । जेणें नुरलासे संकल्प । समाधानचि अपाप । होवोनि ठेले ॥१७॥

ज्ञानराज हे दृष्टी लाधली । तेचि पाहिजे साधिली । सदगुरुनाथें कृपा केली । तरीच घडे ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP