मनाची चंचळता । मोडोनि स्वरुपीं पडला गुंता ।
मिळोनि गेलें आत्मया अनंता । मन मुकलें मनपणा ॥१८॥
टीकाः
जेथ उरलें नाहीं गगन । तेथ कैंचे शब्दपण । शब्दचि ना तेथ मन । कैंचे उरे ॥१॥
अवकाश अधिष्ठान । तेथेंचि जालें सुक्ष्म मन । शुद्ध संकल्प अतिगहन । महाशुन्यीं ॥२॥
रामकृष्णीं शुद्ध संकल्पा जे कां स्थिती निर्विकल्प । मनः संकल्पी विकल्प । उदेला कां ॥३॥
मनःसंकल्प नोहे शुद्ध । येरवी चिदानेदी बिद । स्वरुपी गुंतडा अगाध । जीवनाठायीं ॥४॥
शुद्धसंकल्प मनकमळी । जीवन चाले जीवनकळी । तेथ आपणचि जाली । विश्रांति की ॥५॥
स्वरुपीं गुंतलें मन । गुरुकृपेचें विज्ञान । परतले उन्मनपण । सनधान अखंड ॥६॥
शुब्दसंकल्प गेल विरोन । ऐसें रामकृष्णजीवन । श्वेतश्यामकळीं पुर्ण । आत्मया ऐसे ॥७॥
म्हणोनि आत्मा तो अनंत । जीवविला साक्षी जेथ । मिळोनि गेलियाजि तेथ । कैसेनि मन ॥८॥