अवकाश महातेजीं । अलक्ष्यमुद्रा लागली सहजी ।
स्वरुपीं मिळाला जीऊजी । सदगुरुकृपें ॥३१॥
टीकाः
महातेजी अवकाश । सोहंतेजिया प्रकाश । तेथ अलक्ष अविनाश । लागली मुद्रा ॥१॥
सकार हकार जन्मस्थान । जेथ जाले सोहंगगनं । तेथ बाणली सहजखुण । सहस्त्रदळीं ॥२॥
सहजाची अलक्षमुद्रा । तेणें दाविलें अगोचरा । दृष्टीचिया अगोचरा । पहाणें जालें ॥३॥
येथ केवळ चिन्मयदृष्टि । आराअपणासी भेटी । आपणिया नयनपुटी । स्वरुप घालें ॥४॥
तेथ मिळालें जीवन । जाले आपणया दर्शन । परिपुर्ण समाधान । गुरुकृपें ॥५॥
सगुण निर्गुणाचिये पैल । सोहमात्मस्वरुप निखिल । तेथ जीवात्मपण विमल । मिळोनि गेले ॥६॥
जरी कां जाली गुरुकृपा ॥ चिन्मयाचा मार्ग सोपा । नयनीं चिन्मयाची खोपा । संती केली ॥७॥
नयनीं चिन्मयाचा मार्ग । तेथेचि निजत्वाचा योग । जीवशिव एकचि अंगा । होवोनि ठेले ॥८॥