श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २६

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


अंगुष्ठप्रमाण राजपत्र चिठी । वारंवार लेहिलें ।

अर्धपठी सहजी समाधी परेतठी । योगिया लाभे ॥२६॥

टीकाः

योगियांचे योगिराज परमसिद्ध ज्ञानराज । राजपत्र चिठी सहज । लिहित जाले ॥१॥

स्वानंदसाम्राज्यचक्रवर्ती । जावेलु ज्ञानेश्वर निगुती । अंगुष्ठाप्रमाण जयाप्रति । सनद मिळाली ॥२॥

भुकेलिया भूक खादली । तहानेलिया तहानाचि प्याली अहोरात्र वारिया खेळी । ज्ञानाई ते ॥३॥

म्हणोनि जाली सहजसिद्धि । टाळी लागली ब्रह्मानंदी । परेतठीं सहज समाधि । योगियाची ॥४॥

अर्धपठी सनद जाली । तेणें विश्वासी केली साऊली । ऐसी ज्ञानेश्वर माऊली । विश्वाचिये ॥५॥

ज्यांची सरली उपाधी । ऐसी अखंड सहज समाधि । जयाकॄपें मोक्षपदीं । भक्त बैसे ॥६॥

सहस्त्रदळीं सोहं रुप । तयांत जे ॐ स्वरुप । तेथ अंगुष्ठमात्र प्रदिप । रारयंत्री ॥७॥

पंचमातृकेचे पैल । आणि अर्धमात्रेचे ऐल । सोहंदीप अति तेजाळ । अंगुष्ठमात्र ॥८॥

तेचि दिधली सनद । जेथ पुर्ण ब्रह्मानंद । ऐसे सदगुरु अगाध । निवृत्तीनाथ ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP