श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २७

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


त्रिवेणीचे मुळ भामी । त्रिवेणीचे महासंगमीं ।

मसुरप्रमाण राऊळधामीं । चिन्मय विठ्ठल दिसताहें ॥२७॥

टीकाः

त्रिवेणीचे पहातां मुळ । महाशुन्याचिया । पैल । श्वेतश्यामरुप केवळ । गतिमान ॥१॥

वाटे तेजाचिये राशी । जीवनकळेसी प्रकाशी । रामकृष्णगति कैसी । जीवनकळी ॥२॥

जेथ नाम रामकृष्ण । एकी एक जाय मिळोन । तेचि महासंगमस्थान । त्रिवेणीचे ॥३॥

रामकृष्ण एकीकरण । बिदमात्र नीलवर्ण । स्वरुप जें अतिगहन । मसुरपरी ॥४॥

तेचि जयांचें राऊळ । रविशशीहोनि तेजाळ । तेथ अंसंख्य तेजोगोल । लुप्त होती ॥५॥

तेथ चिन्मय विठ्ठल । श्यामवर्न घननीळ । सोहप्रदीप केवल । सर्वगळा ॥६॥

सोहंतत्विया अवकाश । तेचि बोलिले चिदाकाश । तन्मय जो निजप्रकाश । चिन्मय ते ॥७॥

कोहं धारणा नीलप्रकाश । नुरला द्वैताद्वैत अभास । निजत्व ते अविनाश । सहस्त्रदळीं ॥८॥

सहस्त्रदळीं मति प्रकाशीं । ज्योति चिन्मय अविनाशी । नवलपरी जाणती कैसी । संतजन ॥९॥

नवल सोहं दीपाज्योत । जे कां निःशब्दा अतीत । जेथ विज्ञानासी अंत । होवोनि ठेला ॥१०॥

ज्योतीचे तेज अव्यक्ती शिवस्वरुप तें निभ्रांत । जें कां पहातां अनंत । ओतप्रोत ॥११॥

प्रकृति हे तेजापासोनि । उष्णशीतप्रकाशगुणी । तयांचिये यथार्थे मीलनी । जीवन तेज ॥१२॥

तेचि अवस्था प्रकृत । जीवभाव तो यथार्थ । विभक्तीकरणें उपाधिभुत । सौम्यज्वलनी ॥१३॥

केंद्रीकरणें प्रविष्ट । नाद प्रकाश समाविष्ट । रामकृष्ण तत्त्व निघोट । शुब्दरुप ॥१४॥

तेथ जहाले पहाणें । आकाशवलय प्रभावणें । तेजोष्णता पकाशगुणे । दीप जाल ॥१५॥

दावी दीपासी प्रकाश । दीष पहातां अविनाश । शुन्य कलिके निश्चयेस । सहस्त्रदळी ॥१६॥

सहस्त्रदळीया चोखट । पहातां प्रत्यय निघोट । सोहतंत्व दीप प्रगट चिन्मय विठ्ठल । दिसताहे ॥१७॥

धन्य धन्य ज्ञानेश्वर । खोलोनि दाविले अंतर । दवडीना मी पामर । म्हणोनियां ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP