कथामृत - आरती पहिली

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


(चाल-सुखकर्ता........)
जयदेव जयदेव जय स्वामीराया ।
अक्कलकोटनिवासी स्वामी यतिवर्या ॥धृ॥
तप्त सुवर्णापरि बा दिव्य तुझी कांती ।
सरळ नासिका शोभे, नेत्र हिरे गमती ।
दिव्य तुझे दर्शन दे सुजनां विश्रांती ।
दुर्जन बघता तुजसी अष्ट दिशा पळती ॥
जयदेव जयदेव.....
अक्कलकोट......                ॥धृ॥१॥
गंध केशरी शोभे तव निटिलावरती ।
कर्णकुंडलासम ती रुद्राक्षे डुलती ।
माला रुद्राक्षांची कंठी विलसे ती ।
ध्यान मनोहर ऐसे बघता जन रमती ।
जयदेव जयदेव.....
अक्क्लकोट.....            ॥धृ॥२॥
प्रसन्न मुखचंद्राचे तव दर्शन घडतां ।
शतजन्मांचे वाटे सार्थक होय अता ।
अजानुबाहू मूर्ती दिव्य तुझी बघता ।
हर्ष न माये ह्रदयीं, पद वंदन करिता ।
जयदेव....
अक्क्लकोट....              ॥धृ॥३॥
प्रसाद तव करिचा कीं लाभावा म्हणुन ।
अधिर जाहला आहे देवा भक्तगण ।
प्रेमभरे करिती तव आरति आर्तजन ।
दीनदयाळा सकलां द्या आशिर्वचन ।
जयदेव जयदेव....
अक्कलकोट.... ॥धृ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 15, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP