मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह| आरती सप्रेम जय जय विठ्ठल ... इतर आरती संग्रह आरती सप्रेम जय जय विठ्ठल ... वेदांचे जें गुह्य शास्त्र... ओंवाळू आरती सद्गुरु रामदा... ओम जय जगदिश हरे स्वामी जय... जय जय नवनाथांचा । जय ज्ञा... जयदेव जयदेव जय चिन्मय चंद... जयदेव जयदेव जय पंचायतना ॥... आतां स्वामी सुखें निद्रा ... गुण आणि गंभीर रणधीर । तया... क्षार उदक देउनी मधुरता आल... शेजारत्या सुखें निद्रा करी आतां स्व... जय जय लक्षुमिकांता शेषशाय... जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांत... जयदेव जयदेव जय भरवराया । ... आरती रामदासा नित्यानंद वि... जयदेव जयदेव जय माय कृष्णे... जयजय वो यतिवर्या सच्चित् ... जयदेव जयदेव जय भगवद्गीते ... जयदेव जयदेव जय अद्वयमूर्त... आरती गुरुची जयजयाची ज्ञानदेवा आदि देव... जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्... श्रीज्ञानेश्वरांची आरती आरती तुकारामा । स्वामि सद... कारुण्यमृतसरिते, कोटिसुगु... भानुदासाच्या कुळीं महाविष... आरती रामदासा । भक्त विरक्... जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री ... या अधिकमासी श्रीपुरुषोत्त... ओवाळू आरती । आता पुरुषोत्... मंगलमूर्ती मंगल वदन त्रिन... जयदेवी जयदेवी जय श्रीसत्य... करितों प्रेमें तुज नीरांज... जय देव जय देवी जय भगवद्ग... जय देव जय देव जय श्रीशशिन... उभा दक्षिण पंथे काळाचा का... अश्वपती पुसता झाला । नार... आरती संतमंडळी । हातीं घ... धन्य धन्य योगी सर्व जगांत... जय जय श्रीगुरुशरभंगा । आर... जयदेव , जयदेव , जय सिद्धे... जय जय श्रीशिवकाशीविश्वेश... जयदेवी, जयदेवी, जय देववंद... जय शिखरेश्वरि भगवंते । भ... जयजय आदिमाये , अनुसूये !... जयदेव, जयदेव, जय दक्षिणके... जयदेव जयदेव जय भार्गवरामा... दशावताराची आरती - आरती सप्रेम जय जय विठ्ठल ... Dashavtar Arati - Prayer to Lord Vishnu's Ten Avatara Tags : आरतीदशावतार दशावताराची आरती Translation - भाषांतर आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥ धृ. ॥ अंवऋषी कारणे गर्भवास सोशीसी । वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी । मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी । हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ १ ॥ रसा तळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।परोपकारासाठी देवा कांसव झालासी ॥ दाढें धरुनी पृथ्वी नेता वराहरुप होसी । प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥ पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी । भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळी नेसी ॥ सर्व समर्पण केले म्हणउनि प्रसन्न त्या होसी । वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ॥ ३ ॥ सगस्त्रार्जुन मातला जमंदग्नीचा वध केला । कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला ॥ नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला । सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ ४ ॥ मातला रावण सर्वा उपद्रव केला । तेहतिस कोटी देव बंदी हरलें सीतेला ॥ पितृवचना लागीं रामें वनवास केला । मिळोनी वानर सहित राजाराम प्रगटला ॥ ५ ॥ देवकी वसुदेव बंदी मोचन त्वां केलें । नंदाघरि जाऊन निजसुख गोकुळा दिधले ॥ गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले । गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ ६ ॥ बौद्ध कलंकी कवियुगी झाला अधर्म हा अवघा । सांडुनि नित्यधर्म सोडुनि नंदाची सेवा ॥ म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा । बहिरवि जान्हवि द्याचि निजसुखा नंदसेवा ॥ ७ ॥ N/A N/A Last Updated : August 30, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP