श्रीतुकारामांची आरती - आरती तुकारामा । स्वामि सद...
इतर आरती संग्रह
आरती तुकारामा । स्वामि सद्गुरुधामा । सच्चिदानंदमूर्ती । पाय दाखवीं आम्हां ॥१॥
राघवें सागरांत । जड पाषाण तारिले । तैसे हे तुकोबाचे । अभंग रचियेले ॥२॥
तुकितां तुळणेसी । ब्रह्म तुकासी आलें । म्हणूनि रामेश्वरें । चरणीं मस्तक ठेविलें ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 18, 2017

TOP