मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह|
जयदेव जयदेव जय माय कृष्णे...

आरती कृष्णेची - जयदेव जयदेव जय माय कृष्णे...

निरंजनस्वामीकृत आरती


जयदेव जयदेव जय माय कृष्णे । अघतम संहारुनिया हरि मम भवतृष्णे ॥धृ॥
विष्णूच्या निजअंकीं प्रगटुनिया जाण ।
निर्मळ जळ तुंबळ खळ पर्वत भेदून ॥
पूर्वसमुद्रालागुनि केलेसें गमन ।
अघटित घटना तुझें न कळे विंदान ॥१॥
अगाध तवगुणमहिमा श्रुतिशास्त्रें गाती ।
त्रैलोक्याचे ठायीं वर्तें तव ख्याती ।
सर्वहि तीर्थें निशिदिनिं तवपायीं वसती ।
मुनिवर सुरवर येऊनि सुस्नान होती ॥२॥
दर्शनस्पर्शनमात्रें तापत्रय हरिसी ।
निजदासातें मुक्तिपद अक्षयीं देसी ।
सद्भावें निरंजन लागे चरणासी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP